शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
विदर्भकराचा इम्पॅक्ट! PBKS ला शह देण्यासाठी RR नं खेळलेली 'ती' चाल ठरली मॅचचा टर्निंग पॉइंट
4
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
5
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
6
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
7
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
8
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
9
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
10
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
11
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
12
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
13
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
14
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
15
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
16
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
17
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
18
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
19
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
20
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
Daily Top 2Weekly Top 5

मंडई खाजगीकरणाचा विषय हाणून पाडला स्थायी सभा : डिझाईन करण्याआधीच मक्तेदाराला दिले पैसे

By admin | Updated: July 10, 2015 23:13 IST

सोलापूर :

सोलापूर :
शहरातील मंडई खाजगीकरणाचा प्रशासनाने घातलेला घाट नगरसेवक आनंद चंदनशिवे यांनी स्थायी समितीत शुक्रवारी हाणून पाडला. वादळी चर्चेनंतर सभापती पद्माकर काळे यांनी हा विषय चर्चेसाठी सर्वसाधारण सभेकडे पाठविण्याचा निर्णय घेतला.
सभापती पद्माकर काळे यांच्या अध्यक्षतेखाली स्थायी समितीची सभा झाली. जिल्‘ातील ज्येष्ठ नेते व माजी खासदार प्रतापसिंह मोहिते-पाटील यांना श्रद्धांजली वाहून सभा तहकूब करण्यात आली. पुन्हा अर्ध्या तासाने सभा घेण्यात आली. सभेत प्रशासनाने दाखल केलेला मंडई विभाग खाजगीकरणाचा विषय चर्चेला आला. मंड्या तोट्यात असल्याने खाजगीकरण करणे गरजेचे असल्याचे मत अनिल पल्ली, दिलीप कोल्हे यांनी व्यक्त केले. मात्र आनंद चंदनशिवे यांनी जोडभावीपेठ, लक्ष्मी मंडई, सुपर मार्केट या मंड्या बीओटीवर बांधण्याची तयारी झाली आहे. कस्तुरबा मंडईचाही ११ मजली बांधकामाचा प्रस्ताव तयार आहे. असे असताना खाजगीकरण कसे करता येईल? असा सवाल केला. मंडई विभागाची दररोजची उलाढाल १४ लाख दाखविली आहे. पण थकबाकी किती याचा हिशोब दिलेला नाही. ओटे, गाळे वसुलीची मोठी रक्कम येणे बाकी असल्याचे निदर्शनाला आणून दिले. चर्चेअंती हा विषय सर्वसाधारण सभेकडे पाठविण्याचा निर्णय झाला.
त्यानंतर नगरोत्थानमधील २७ कोटींच्या तीन रस्त्यांची कामे आवताडे कन्स्ट्रक्शनला देण्याच्या विषयावर वादळी चर्चा झाली. सुरेश पाटील यांनी आयुक्तांनी घेतलेल्या धाडसी निर्णयाचे कौतुक केले. मात्र प्रशासनाने केलेल्या चुका चव्हाट्यावर आणल्या. या रस्त्यांचा प्रकल्प अहवाल एका कंपनीने तर डिझाईन दुसर्‍या कंपनीने बनविल्याचे प्रस्तावात नमूद आहे. पण रस्त्यांचे डिझाईन उपलब्ध नसताना प्रशासनाने संबंधित ठेकेदाराला १ कोटी २0 लाख रुपये कसे अदा केले? असा सवाल उपस्थित केला. यावर सुमारे दोन तास वादळी चर्चा चालली. बहुमताने हे विषय मंजूर करण्यात आले.
इन्फो....
स्थायी सभा बंदिस्त
स्थायी समितीच्या आजच्या सभेत मंडई विभागाचे खाजगीकरण व नगरोत्थानमधील तीन रस्त्यांचा ठेका देण्याचा विषय होता. त्यामुळे सभापती काळे यांनी सभागृह व कार्यालयात सदस्य वगळता सर्वांना प्रवेश बंद केला होता. कार्यालयास आतून कडी घालण्यात आली होती.