'जनता माफ करणार नाही', पंतप्रधान मोदींचा चहा विकतानाच्या एआय व्हिडिओवरुन भाजपची जोरदार टीका
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2025 15:04 IST2025-12-03T14:49:13+5:302025-12-03T15:04:39+5:30
व्हिडिओमध्ये पंतप्रधान मोदी निळ्या रंगाचा कोट आणि काळी पँट परिधान केलेले दिसत आहेत. त्यांच्या हातात एक किटली आणि चहाचा ग्लास आहे. मागे आंतरराष्ट्रीय ध्वज आणि भारतीय ध्वज दिसत आहे.

'जनता माफ करणार नाही', पंतप्रधान मोदींचा चहा विकतानाच्या एआय व्हिडिओवरुन भाजपची जोरदार टीका
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एक एआय जनरेटेड व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओवरुन काँग्रेस आणि भाजपमध्ये नवीन वाद सुरू झाला आहे. या व्हिडिओमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी रेड-कार्पेट कार्यक्रमात चहा विकत असल्याचे दाखवण्यात आले आहे. काँग्रेस नेत्या रागिनी नायक यांनी तो इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. यामध्ये त्यांनी "आता हे कोणी केले?", अशी कॅप्शन दिली आहे. हा व्हिडीओ समोर आल्यानंतर काही वेळातच भाजपने काँग्रेसवर टीका केली. हा पंतप्रधानांचा अपमान असल्याचे म्हटले.
कर्नाटकच्या राज्यपालांच्या नातसुनेचा गंभीर आरोप! पतीकडून ५० लाख हुंड्यासाठी छळ, टेरेसवरून धक्का दिला
व्हिडिओमध्ये पंतप्रधान मोदी निळ्या रंगाचा कोट आणि काळी पँट घातलेले दिसत आहेत. त्यांच्या हातात एक चहाची किटली आणि चहाचा ग्लास आहे. त्यांच्या मागे आंतरराष्ट्रीय झेंडे आणि भारतीय ध्वज दाखवण्यात आला आहे. व्हिडीओ एआय-जनरेटेड आहे. भाजप प्रवक्ते शहजाद पूनावाला यांनी व्हिडिओवर जोरदार टीका केली. "रेणुका चौधरी यांनी संसद आणि सैन्याचा अपमान केल्यानंतर, आता रागिनी नायक यांनी मोदींच्या 'चायवाला' पार्श्वभूमीची खिल्ली उडवली आहे, असे त्यांनी म्हटले आहे. काँग्रेस "ओबीसी समुदायातून येणाऱ्या मेहनती पंतप्रधानांना स्वीकारण्यास असमर्थ आहे, असंही शहजाद पूनावाला म्हणाले.
काँग्रेसने १५० हून अधिक वेळा मोदींचा अपमान केला असल्याची त्यांनी आरोप केला. त्यांच्या आईलाही लक्ष्य करण्यात आले. देश हे कधीही माफ करणार नाही.
एआय व्हिडिओंवरून यापूर्वीही वाद
पूनावाला यांनी सप्टेंबरमध्ये बिहार काँग्रेसने शेअर केलेल्या एआय व्हिडिओचा संदर्भ दिला होता, यामध्ये पंतप्रधान मोदी त्यांच्या दिवंगत आईशी स्वप्नात बोलताना दिसत होते. या व्हिडिओमुळे राजकीय गोंधळ उडाला आणि पाटणा उच्च न्यायालयाने काँग्रेसला तो व्हिडिओ सोशल मीडियावरून काढून टाकण्याचे आदेश दिले.
अब ई कौन किया बे 🥴🤣 pic.twitter.com/mbVsykXEgm
— Dr. Ragini Nayak (@NayakRagini) December 2, 2025