शहरं
Join us  
Trending Stories
1
बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
2
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
3
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
4
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
5
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
6
लोकसभेच्या जागा आता ८५० हाेणार? महिला आरक्षणासाठीही केंद्राचे पाऊल, १३१ व्या घटनादुरुस्तीचा सरकारचा प्रस्ताव
7
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
8
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
9
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
10
‘तार्किक विसंगती’ हा शब्दप्रयोग फक्त बंगालमध्ये वापरला जातो, ममता बॅनर्जींचा आरोप
11
पश्चिम बंगालमध्ये २९४ मतदारसंघांत २,९२६ जणांचे भवितव्य पणाला, दोन टप्प्यात होणार मतदान
12
होर्मुझमधील युद्ध ठरेल अमेरिकेसाठी ‘वॉटरलू’?
13
कुंकी चौधरीच्या आईची हिमंता सरमांविरुद्ध तक्रार, अपमानजनक टिप्पणी केल्याचा आरोप
14
प्रत्येक कुटुंबाला १० लाखांचा आरोग्य विमा : राहुल गांधी
15
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
16
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
17
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
18
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
19
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
20
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
Daily Top 2Weekly Top 5

लोकांवर विचारसरणी लादली जातेय

By admin | Updated: October 18, 2015 02:08 IST

काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर थेट लक्ष्य साधताना त्यांचे सरकार लोकांवर आपली विचारसरणी लादण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप केला.

बक्सर (बिहार) : काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर थेट लक्ष्य साधताना त्यांचे सरकार लोकांवर आपली विचारसरणी लादण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप केला.बिहार विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने येथे आयोजित पक्षाच्या प्रचार सभेत त्या बोलत होत्या. मोदी सरकारच्या कार्यकाळात सांप्रदायिक उन्माद निर्माण करण्यात येत असल्याचा आरोप करून गांधी म्हणाल्या, अफवांवरून निर्दोष लोकांचे बळी जात आहे. यामुळे देशाची लोकशाही आणि सामाजिक सलोखा धोक्यात आला आहे. सहा दशकांच्या काँग्रेस शासनावर मोदींकडून वारंवार होणाऱ्या हल्ल्यांचा त्यांनी यावेळी खरपूस समाचार घेतला. काँग्रेसने देशात लोकशाही बळकट करण्याचा सातत्याने प्रयत्न केला आणि मोदी यांचे पंतप्रधानपदी विराजमान होणे हे त्याचेच फलित आहे. याउलट केंद्रातील भाजपाप्रणीत सरकार मात्र लोकशाही मूल्यांपासून भरकटले आहे. लोकांवर आपली विचारसरणी थोपून हे सरकार लोकशाहीसाठी मोठा धोका निर्माण करीत असून सांप्रदायिक तणाव निर्माण करण्यात येत आहे, असे प्रत्युत्तर गांधी यांनी दिले. दादरीत गोमांस खाल्ल्याच्या अफवेवरून एका मुस्लीम इसमाची झालेली हत्या, बुद्धिजीवींवरील वाढलेले हल्ले आदी घटनांचा उल्लेख त्यांनी केला. (वृत्तसंस्था)पंतप्रधान अपयशी ठरलेत- महागाई आकाशाला भिडली असून सर्वसामान्य लोकांना जगणे कठीण झाले आहे.- महिला व युवापिढीला दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्यास पंतप्रधान अपयशी ठरले आहेत.- काँग्रेसने ६० वर्षात काय केले अशी विचारणा केली जाते. आमच्या पक्षाने अनेक क्षेत्रात क्रांतिकारक बदल केले. काँग्रेसने या देशाची एकता, अखंडता आणि वारसा जपून ठेवला.- बिहार विधानसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात येत्या २८ आॅक्टोबरला ५० जागांवर मतदान होणार आहे.