'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2025 19:51 IST2025-09-20T19:49:54+5:302025-09-20T19:51:58+5:30
Pawan Khera slams Pakistan: 'आपली वायुसेना सर्व राफेल विमाने दाखवले, तेव्हाच गोष्टी स्पष्ट होतील.'

'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
Pawan Khera slams Pakistan: पाकिस्तानने "ऑपरेशन सिंदूर" दरम्यान भारतीय लढाऊ विमानांना पाडल्याचा दावा केला होता. याबाबत आता काँग्रेस नेते पवन खेडा यांची प्रतिक्रिया आली आहे. त्यांनी पाकिस्तानचे दावा पूर्णपणे खोटा असल्याचे सांगितले. तसेच, विश्वास व्यक्त केला की, भारतीय वायुसेना लवकरच या दाव्याचे खंडन करेल आणि सर्व राफेल विमानांची माहिती सार्वजनिक करुन पाकिस्तानचा खोटारडेपणा जगासमोर आणेल.
पाकिस्तान नेहमी खोटे दावे करतो
मीडियाशी संवाद साधताना पवन खेडा म्हणाले की, पाकिस्तानने काही विमानाचे टेल नंबर दिले आहेत. मात्र, पाकिस्तान नेहमी खोटे दावे करतो, भारतीय वायुसेनादेखील प्रत्येक वेळी त्यांचा खोटेपणा जगासमोर आणते. आपल्या वायुसेनेने राफेल दाखवले, तर सर्व गोष्टी स्पष्ट होतील आणि पाकिस्तानचा खोटारडेपाणा उघडा पडेल.
पाकिस्तानला तात्काळ उत्तर द्या
पाकिस्तान नेहमी अशा प्रकारचे दावे करुन आपल्या सेनेचे मनोबल खच्ची करण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे भारत सरकारने पाकिस्तानला तात्काळ उत्तर द्यावे, पुराव्यांसह पाकिस्तानचे दावे खोडून काढावे, अशी मागणी त्यांनी केंद्र सरकारकडे केली.
हमें ख़बरों से पता चला है कि पाकिस्तान ने राफेल के टेल नंबर दिए हैं।
— Congress (@INCIndia) September 20, 2025
मुझे लगता है कि इंडियन एयरफोर्स इन दावों का खंडन करेगी और जब तमाम राफेल दिखाएगी, तब पाकिस्तान के होश ठिकाने आ जाएंगे।
इंडियन एयरफोर्स पाकिस्तान का मुंह बंद कराना जानती है।
हमारी सरकार से भी गुजारिश है कि… pic.twitter.com/Xc8JDPrRyf
अमेरिकेच्या H-1B व्हिसा शुल्कवाढीवर टीका
अमेरिकेकडून H-1B व्हिसाचे शुल्क वाढविण्यावर प्रतिक्रिया देताना खेडा म्हणाले की, अमेरिकेत काम करणाऱ्या आपल्या तरुणांना दरवर्षी 1 लाख डॉलर्स द्यावे लागतील. हे आपल्या सरकारचे सर्वात मोठे अपयश आहे. राहुल गांधींनी आधीच केंद्र सरकारला या संदर्भात इशारा दिला होता, पण सरकारने कोणतीही कारवाई केली नाही.
पाकिस्तान-सौदी करारावर काँग्रेसची प्रतिक्रिया
सरकार म्हणते की, अजून "ऑपरेशन सिंदूर" संपलेले नाही. पाकिस्तानसोबतचे भारताचे सध्याचे संबंध कसे आहेत, हे माहिती असूनही सौदी अरेबिया पाकिस्तानसोबत सुरक्षा करार करत आहे. ज्यांना मिठी मारतात, ते आपल्याला काय देतात? केंद्र सरकारने या प्रश्नाचे उत्तर द्यावे, अशी प्रतिक्रिया पवन खेडा यांनी दिली.