पक्ष कार्यालयांचा बदलला ‘माहोल’

By Admin | Updated: November 9, 2015 00:41 IST2015-11-09T00:41:21+5:302015-11-09T00:41:21+5:30

पाटण्यातील राजकीय पक्षांच्या मुख्यालयांतील ‘माहोल’ रविवारी काही तासांत बदललेला दिसला. भाजप कार्यालयात सकाळी फटाके, मिठाई वाटली गेली; पण संध्याकाळ होईपर्यंत कार्यालयासमारे जणू स्मशानशांतता पसरली.

Party offices changed 'Mahol' | पक्ष कार्यालयांचा बदलला ‘माहोल’

पक्ष कार्यालयांचा बदलला ‘माहोल’

पाटणा : पाटण्यातील राजकीय पक्षांच्या मुख्यालयांतील ‘माहोल’ रविवारी काही तासांत बदललेला दिसला. भाजप कार्यालयात सकाळी फटाके, मिठाई वाटली गेली; पण संध्याकाळ होईपर्यंत कार्यालयासमारे जणू स्मशानशांतता पसरली. दुसरीकडे सकाळी शांत दिसलेल्या पाटण्यासारख्या वीरचंद पटेल मार्गावरील राजद व जदयूच्या कार्यालयांत संध्याकाळी दिवाळी साजरी झाली. सर्वाधिक जल्लोष राजद कार्यालय व लालूप्रसाद- राबडीदेवींच्या निवासस्थानी पाहायला मिळाला. सुमारे दशकभरानंतर या ठिकाणी असा जल्लोष दिसला.
महाआघाडीच्या कार्यालयासमोर मात्र दिवाळी साजरी झाली. पाटणा जंक्शन आणि आजूबाजूच्या भागांत उत्साहाचे वातावरण दिसले. हा भाग यादव आणि मुस्लिमबहुल म्हणून ओळखला जातो. पाटणा जंक्शनवर अनेक लोक ट्रेन पकडण्याच्या घाईतही निवडणुकीचे निकाल पाहताना दिसले. (प्रतिनिधी)

Web Title: Party offices changed 'Mahol'