शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

पर्रीकर लवकरच केंद्रीय मंत्रिमंडळात

By admin | Updated: November 5, 2014 17:14 IST

गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळण्याची शक्यता बळावली आहे. रा.स्व.संघाने हिरवा झेंडा दाखविल्यानंतर या शक्यतेला बळकटी मिळू लागली आहे.

हरीश गुप्ता, नवी दिल्लीगोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळण्याची शक्यता बळावली आहे. रा.स्व.संघाने हिरवा झेंडा दाखविल्यानंतर या शक्यतेला बळकटी मिळू लागली आहे.पर्रीकर यांनी ३० आॅक्टोबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली, त्यावेळी त्यांच्या सहभागाचे संकेत मिळाले. अरुण जेटली सध्या अर्थमंत्रालयाच्या जबाबदारीत व्यग्र आहेत. त्यांच्याकडील संरक्षण खाते पर्रीकर यांना दिले जाईल. पर्रीकर हे दिल्लीहूनच गोव्याच्या कारभाराकडे लक्ष ठेवणार असून नव्या मुख्यमंत्र्यांना मार्गदर्शन करतील. पर्रीकर यांनी सदर प्रस्तावावर विचार करण्यासाठी वेळ मागितल्यामुळे मंत्रिमंडळाचा विस्तार लांबणीवर पडला. मोदी १२ नोव्हेंबर रोजी विदेश भेटीवर जात आहेत, तत्पूर्वीच हा अंक पार पडेल. रा. स्व. संघाचा पाठिंबादिल्लीहून परतल्यानंतर पर्रीकर यांनी रा.स्व. संघाच्या नागपूर येथील मुख्यालयात संपर्क साधून सरसंघचालक मोहन भागवत यांच्याशी चर्चा केली. दिल्लीला पर्रीकर सारखी प्रामाणिक आणि एकात्म व्यक्ती पाठविली जाण्यास संघाने अनुकूलता दर्शविली असून अद्याप निर्णय व्हायचा असल्याचे सूत्रांनी म्हटले. अनेक मंत्र्यांवर असलेला कामाचा ताण, दुसरी बाब म्हणजे झारखंड, बिहार आणि महाराष्ट्राला आणखी प्रतिनिधित्व देण्याची गरज पाहता मंत्रिमंडळात किमान १० ते १२ नव्या चेहऱ्यांचा समावेश केला जाईल.माजी अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांचे पुत्र खा. जयंत सिन्हा यांचे स्थान पक्के मानले जाते. राजीवप्रताप रुडी, मुख्तार अब्बास नकवी यांच्या गळ्यातही मंत्रिपदाची माळ पडेल.