शहरं
Join us  
Trending Stories
1
'काँग्रेसचा अजेंडा; पण तुम्ही ना कलम 370, ना CAA...', पीएम मोदींचे काँग्रेसला ओपन चॅलेंज
2
"...तर काँग्रेसनं सांगावं, 'याचा' अर्थ काय?" मनमोहन सिंगांच्या वक्तव्यावरून अमित शाह यांचा हल्लाबोल
3
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
4
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
5
प्रभू श्रीराम आणि शिव शंकरांवरील खर्गेंचं 'ते' वक्तव्य, पंतप्रधान मोदी म्हणाले अत्यंत 'खतरनाक'; योगीही भडकले
6
India's T20 World Cup Squad Press Conference - शिवम दुबेची निवड का केली? रोहित शर्माने कारण सांगितलं, पण प्लेइंग इलेव्हनबाबत मोठं विधान 
7
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
8
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
9
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
10
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
11
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
12
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य
13
Amit Shah : "भारत जोडो यात्रेचा समारोप 4 जूनला काँग्रेस 'ढूंढो' यात्रेने होईल"; अमित शाह यांचा घणाघात
14
ब्रिजभूषण यांचा पत्ता कट; BJP ने त्यांच्या मुलाला दिले तिकीट, रायबरेलीचाही उमेदवार जाहीर
15
रस्त्यावर पाणीच पाणी, वीजपुरवठाही खंडित… मुसळधार पाऊस, वादळी वाऱ्याचा UAEला तडाखा!
16
Champions Trophy 2025 मध्ये भारतीय संघाचे सर्व सामने 'लाहोर'मध्ये; PCB ने ICC ला सोपवला ड्राफ्ट
17
चेन्नईतील श्रीदेवीचं आलिशान घर! जिथे जान्हवीचं गेलं बालपण, आता राहता येणार रेन्टवर
18
“उत्तर मुंबईकरांचा मिळणारा प्रतिसाद महायुतीच्या महाविजयाची नांदी”; पीयूष गोयल यांना विश्वास
19
लॉटरी खेळण्याच्या व्यसनापायी 'त्याने' ऑफिसच्या पैशांवरच मारला डल्ला; असा झाला पर्दाफाश
20
मोबाईलचोरामागे पोलीस धावला... टोळीने घेरलं... पाठीत इंजेक्शन टोचलं... उपचारादरम्यान मृत्यू

फोन टॅपिंगवरून संसदेचे कामकाज तहकूब; सलग दुसऱ्या दिवशी दोन्ही सभागृहांत गोंधळ

By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2021 6:31 AM

पेगासस फोन टॅपिंग प्रकरणावरून मंगळवारी दुसऱ्या दिवशीही संसदेच्या दोन्ही सभागृहांत गोंधळ झाला.

शीलेश शर्मा

लोकमत न्यूज नेटवर्क 

नवी दिल्ली : पेगासस फोन टॅपिंग प्रकरणावरून मंगळवारी दुसऱ्या दिवशीही संसदेच्या दोन्ही सभागृहांत गोंधळ झाला. परिणामी लोकसभेचे कामकाज अनेकदा व नंतर पूर्ण दिवसभरासाठी स्थगित करावे लागले. राज्यसभेत सभापती एम. व्यंकय्या नायडू यांनी मोठ्या चतुराईने कोंडी दूर करण्यासाठी दुपारनंतर कोरोना वर चर्चा करण्यास मंजूरी देत कामकाज चालवले. परंतु, संपूर्ण विरोधी पक्षाने संसदेच्या दोन्ही सभागृहांचे कामकाज होऊ न देण्याचा निर्णय घेतला व याला विरोधी पक्ष नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी दुजोरा दिला. लोकसभेचे कामकाज आता गुरुवारपर्यंत तहकूब करण्यात आले आहे.  संसद परिसरात तृणमूल काँग्रेससह अनेक पक्षांनी प्रदर्शन केले.

सुरजेवाला यांचा आरोप

नरेंद्र मोदी - अमित शहा ही जोड़ी पेगाससच्या मदतीने माजी पंतप्रधान देवेगौड़ा, तत्कालीन मुख्यमंत्री कुमारस्वामी, उप मुख्यमंत्री परमेश्वर, सिद्धारामैया, डी. के. शिवकुमार यांच्या फोनची टॅपिंग करून काँग्रेस -जेडीएस सरकार पाडण्याच्या प्रयत्नांत होती. मल्लिकार्जुन खरगे, डी. के. शिवकुमार, सिद्धरामैया आणि रणदीप सुरजेवाला यांनी थेट आरोप केला की, याच टॅपिंगच्या आधारे कर्नाटक, अरुणाचल प्रदेश आणि मध्य प्रदेशमधील सरकारे पाडली गेली. 

टॅग्स :ParliamentसंसदCentral Governmentकेंद्र सरकार