pariksha pe charcha pm office deleted tweets related advice of pm modi to students on tough exam | परीक्षा पे चर्चा: सोशल मीडियावर खिल्ली आणि टोलेबाजी; अखेर ‘ते’ ट्विट मागे

परीक्षा पे चर्चा: सोशल मीडियावर खिल्ली आणि टोलेबाजी; अखेर ‘ते’ ट्विट मागे

ठळक मुद्देपरीक्षा पे चर्चा संदर्भातील काही ट्विट्स मागेसोशल मीडियावर टीका, खिल्ली आणि टोलेबाजीकुणाल कामरानेही केली होती टीका

नवी दिल्ली:पंतप्रधाननरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी देशातील विद्यार्थ्यांशी बुधवारी संवाद साधला होता. पंतप्रधान मोदींनी  ‘परीक्षा पे चर्चा २०२१’ (pariksha pe charcha) या कार्यक्रमात विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांना दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमाद्वारे मार्गदर्शन केले. या संवादावेळी बोलताना पंतप्रधान मोदी यांनी विद्यार्थ्यांना कठीण प्रश्नाला आधी सामोरे जावे, असा सल्ला दिला. मात्र, यावरून सोशल मीडियावर खिल्ली, टीका आणि टोलेबाजी करण्यात आली. अखेर पंतप्रधान मोदींनी दिलेले सल्ल्याचे ट्विट्स मागे घेण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. (pariksha pe charcha pm office delet tweets related advice of pm modi to students on tough exam)

परीक्षा पे चर्चा’ या कार्यक्रमात पंतप्रधानांनी विद्यार्थ्यांना अवघड प्रश्न आधी सोडवण्याच्या दिलेल्या  सल्ल्याची समाजमाध्यमावर विरोधी पक्ष व इतरांनी खिल्ली उडवल्यानंतर त्याबाबत पंतप्रधान मोदी यांच्या हवाल्याने दिलेले ट्विट संदेश केंद्र सरकारच्या प्रेस इनफॉर्मेशन ब्युरो आणि पंतप्रधान मोदी कार्यालयाने काढून टाकले आहेत.

पुढीलवेळी अर्णबच्या आधी रविश कुमारांना मुलाखत द्या; कुणाल कामराची मोदींवर टीका

सोपे प्रश्न आधी सोडवा तर अवघड नंतर सोडवा

परीक्षेत शिक्षक व पालक ‘सोपे प्रश्न आधी सोडवा तर अवघड नंतर सोडवा’ असे नेहमी सांगत असतात. पंतप्रधान म्हणून आधी अवघड विषयांना हात घालत असतो. सकाळी उठतो तेव्हा कठीण गोष्टींचा सामना करण्यासाठी सदैव तयार असतो, असे पंतप्रधान मोदी म्हणाले होते. यावर,  मोदी यांनी नेमका उलटा सल्ला दिला, अशी प्रतिक्रिया समाजमाध्यमावर उमटली. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेले सल्ल्याचे ट्विट्स डिलीट केल्याची माहिती मिळाली आहे. 

कुणाल कामरांची मोदींवर टीका

जे आवडते ते आपण आधी करतो, विद्यार्थी सहज, सोप्या आणि त्यांना आवडणाऱ्या विषयाचा जास्त अभ्यास करतात आणि कठीण विषयाला घाबरतात. उलट कठीण गोष्टींना आधी सामोरे जा. परीक्षेत असे म्हटले जाते की, सोपे आधी सोडवा, पण मी तर म्हणेन जे कठीण आहे त्याचा निपटारा सर्वात आधी करायला हवा, असे मोदी म्हणाले होते. यावर, असे असेल तर पुढीलवेळी अर्णब गोस्वामीला मुलाखत देण्याऐवजी रविश कुमार यांना मुलाखत देण्याचा प्रयत्न करुन बघावा, असे खोचक ट्विट कुणाल कामराने केले आहे.

दरम्यान, ‘परीक्षा पे चर्चा २०२१’ हा कार्यक्रम पंतप्रधान आणि पंतप्रधान कार्यालयाच्या सर्व समाजमाध्यमांवर थेट प्रसारित करण्यात आला. या कार्यक्रमासाठी १३ लाखांहून अधिक शिक्षक, विद्यार्थी आणि पालकांनी नोंदणी केली होती. या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी प्रथमच सर्व जगातील इच्छुकांना निमंत्रित करण्यात आले होते. 
 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: pariksha pe charcha pm office deleted tweets related advice of pm modi to students on tough exam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.