पापा की परी... सावधान! स्कुटरच्या हँडलमधून साप निघाला साप, तरुणीने उडीच मारली...
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2025 12:30 IST2025-08-19T12:29:57+5:302025-08-19T12:30:16+5:30
समस्त महिला वर्गालाच नाही तर पुरुषांचीही भंबेरी उडेल अशी घटना उत्तर प्रदेशच्या हापुडमध्ये घडली आहे.

पापा की परी... सावधान! स्कुटरच्या हँडलमधून साप निघाला साप, तरुणीने उडीच मारली...
कारच्या बॉनेटमध्ये, स्कूटरच्या किंवा मोटरसायकलच्या बॉनेटमध्ये अनेकदा साप दडून बसल्याचे व्हिडीओ आपण पाहत असतो. पण स्कूटरच्या हँडलमधून साप बाहेर पडला तर तुमची काय अवस्था होईल? समस्त महिला वर्गालाच नाही तर पुरुषांचीही भंबेरी उडेल अशी घटना उत्तर प्रदेशच्या हापुडमध्ये घडली आहे.
सोमवारी दुपारी एक तरुणी कामासाठी घराबाहेर पडली होती. अनवरपूरहून ती पिलखुवाला जात होती. स्कूटर बाहेर काढली आणि काही अंतर चालविली. अचानक स्कूटरच्या हँडलमधून सापाचे डोके बाहेर आले. तरुणी चालत्या स्कूटरवर प्रचंड घाबरली आणि साप हातावर येऊ लागताच तशीच स्कूटरवरून उडी मारली.
सापही घाबरून परत आतमध्येच शिरला. तरुणीला थोडी दुखापत झाली आहे. जोरजोरात किंचाळू लागल्याने तिच्या ओरडण्याचा आवाज ऐकून आजूबाजूचे लोक घटनास्थळी पोहोचले. त्यांनी तिला शांत करत स्कूटरमध्ये लपलेल्या सापाला बाहेर काढले. एकंदरीतच हा प्रकार अंगावर शहारे आणणारा आहे.