शहरं
Join us  
Trending Stories
1
US-Iran Ceasefire: इराण-अमेरिका संघर्षात मोठी घडामोड, ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामाच्या मुदतीत वाढ, नाकेबंदी मात्र कायम
2
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
3
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
4
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
5
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
6
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
7
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
8
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
9
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
10
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
11
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
12
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
13
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
14
लेख: तुमचा पिझ्झा पोहोचविणारा उन्हात होरपळतो आहे, सावधान!
15
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
16
आजचा अग्रलेख: हे नुकसान कसे मोजणार?
17
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
18
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
19
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
20
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
Daily Top 2Weekly Top 5

पंकजा मुंडेंना बोलघेवडेपणा भोवण्याची शक्यता

By admin | Updated: October 21, 2014 04:38 IST

दिवंगत भाजपा नेते गोपीनाथ मुंडे यांच्या प्रतिमेच्या आधारावर मुख्यमंत्रिपदाची महत्त्वाकांक्षा बाळगणाऱ्या पंकजा मुंडेंना बोलघेवडेपणाची किंमत चुकवावी लागू शकते

हरीश गुप्ता, नवी दिल्लीदिवंगत भाजपा नेते गोपीनाथ मुंडे यांच्या प्रतिमेच्या आधारावर मुख्यमंत्रिपदाची महत्त्वाकांक्षा बाळगणाऱ्या पंकजा मुंडेंना बोलघेवडेपणाची किंमत चुकवावी लागू शकते. परळी विधानसभा मतदारसंघातील त्यांचे मताधिक्य २००९ च्या तुलनेत २०१४ च्या निवडणुकीत घटल्याचे ऐकून भाजप संसदीय मंडळाच्या सदस्यांना धक्काच बसला. शिवसेनेने उमेदवार दिला नसतानाही त्यांचे मताधिक्य कमी झाले. २००९ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी ९६ हजार मते मिळवत ३६ हजार मताधिक्क्याने विजय नोंदविला होता. त्यावेळी काँग्रेसच्या प्रतिस्पर्ध्याला ६० हजार मते मिळाली होती. गोपीनाथ मुंडे यांचे जूनमध्ये अपघाती निधन झाल्यानंतर सहानुभूतीच्या लाटेवर मते मागूनही यावेळी पंकजा यांचे मताधिक्य कमी होऊन २५ हजारांवर आले. विशेष म्हणजे यावेळीही त्यांना ९६ हजार मतेच मिळाली. काँग्रेस व राष्ट्रवादी स्वतंत्र लढूनही पंकजा यांना मतविभाजनाचा लाभ उचलता आला नाही. दुसरीकडे त्यांच्या धाकट्या भगिनी डॉ. प्रीतम मुंडे यांनी बीड लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत विक्रमी सात लाख मतांनी विजयी होत इतिहास रचला.