'नेहरूंनी पाकिस्तानला मदत केली होती', 'सिंधू जल' करारावरुन पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2025 13:24 IST2025-08-19T13:20:03+5:302025-08-19T13:24:45+5:30
पहलगाम हल्ल्यानंतर 'सिंधू जल' करार चर्चेत आला. भारत सरकारने ऑपरेशन सिंदूरच्या अगोदर सिंधू जल करार रद्द केला. यानंतर भारताने पाकिस्तानमधील दहशतवादी तळांवर हल्ले केले.

'नेहरूंनी पाकिस्तानला मदत केली होती', 'सिंधू जल' करारावरुन पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
पहलगाम हल्ल्यानंतर 'सिंधू जल' करार चर्चेत आला. भारत सरकारने ऑपरेशन सिंदूरच्या अगोदर सिंधू जल करार रद्द केला. यानंतर भारताने पाकिस्तानमधील दहशतवादी तळांवर हल्ले केले. या हल्ल्यानंतर दोन्ही देशांमध्ये तणाव निर्माण झाला होता. दरम्यान, आता सिंधू जल करारावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरु यांच्यावर टीका केली. 'संसद किंवा त्यांच्या मंत्रिमंडळाला विश्वासात न घेता पाकिस्तानसोबत करार सिंधू जल करार केल्याचा आरोप केला.
'नेहरूंनी देशाच्या हिताच्या किंमतीवर आपली प्रतिमा उजळवण्यासाठी हे केले, ८० टक्क्यांहून अधिक पाणी पाकिस्तानला वापरण्याची परवानगी देण्यात आली, असंही मोदी म्हणाले.
पापा की परी... सावधान! स्कुटरच्या हँडलमधून साप निघाला साप, तरुणीने उडीच मारली...
'तसे झालेच नाही'
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, त्यांचे सरकार त्या काळातील पापे धुवत आहे, नेहरूंनी नंतर एका सहकाऱ्याला सांगितले की त्यांना विश्वास आहे की हा करार पाकिस्तानसोबतच्या इतर समस्या सोडवण्यास मदत करेल, परंतु तसे झाले नाही.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतील एनडीए संसदीय पक्षाच्या बैठकीत ही टीका केली. या दरम्यान त्यांनी एनडीएचे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार सीपी राधाकृष्णन यांचाही सत्कार केला. याशिवाय, त्यांनी विरोधी पक्षांसह सर्व पक्षांना एकमताने राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपती करण्याचे आवाहन केले.
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन
पंतप्रधान मोदी आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यात फोनवर चर्चा झाली आहे. पंतप्रधान मोदींनी स्वतः त्यांच्या एक्स हँडलवर याबद्दल माहिती दिली. विशेष म्हणजे, अलिकडेच पुतिन आणि अमिरेकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची अलास्कात भेट झाली. त्या भेटीकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागून होते. आता त्या भेटीनंतर पुतिन यांनी थेट पीएम मोदींना फोन केल्यामुळे सर्वांच्या भूवया उंचावल्या आहेत.
पीएम मोदींनी त्यांच्या एक्स पोस्टमध्ये लिहिले की, "आताच मित्र राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्याशी फोनवर चर्चा केली. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्याशी अलास्कामध्ये झालेल्या अलिकडील भेटीची आणि चर्चेची माहिती दिल्याबद्दल पुतिन यांचे आभार. भारताने युक्रेन संघर्षाचे शांततापूर्ण मार्गाने निराकरण करण्याचे सातत्याने आवाहन केले आहे आणि या संदर्भातील सर्व प्रयत्नांना पाठिंबा दिला आहे. येणाऱ्या काळात देवाणघेवाणीची अपेक्षा करतो," असे मोदींनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले.