पाकिस्तानच्या कुरापती सुरूच

By Admin | Updated: October 9, 2016 05:02 IST2016-10-09T05:02:12+5:302016-10-09T05:02:12+5:30

पाकिस्तानच्या कुरापती अजूनही सुरूच आहेत. जम्मू-काश्मीरमधील शोपिया जिल्ह्यातील पोलीस चौकीवर शुक्रवारी रात्री हल्ला केला. त्यात एक पोलीस ठार तर दोघे जखमी झाले.

Pakistan's curse continues | पाकिस्तानच्या कुरापती सुरूच

पाकिस्तानच्या कुरापती सुरूच

- सुरेश डुग्गर,  श्रीनगर
पाकिस्तानच्या कुरापती अजूनही सुरूच आहेत. जम्मू-काश्मीरमधील शोपिया जिल्ह्यातील पोलीस चौकीवर शुक्रवारी रात्री हल्ला केला. त्यात एक पोलीस ठार तर दोघे जखमी झाले. शनिवारी सकाळी पाक सैन्याने जम्मूजवळील नियंत्रण रेषेवर गोळीबार करून शस्त्रसंधीचे पुन्हा उल्लंघन केले. पूंछमधील मेंढर सेक्टरमध्ये पाक सैन्याने गोळीबार सुरू केला. भारतीय सैन्यानेही प्रत्युत्तरादाखल जोरदार गोळीबार केला. त्यात एक जवान जखमी झाला.
आतापर्यंत २५ वेळा उल्लंघन
उरी येथील लष्कराच्या मुख्यालयावर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात २0 जवान शहीद झाले होते. यानंतर बारामुल्लामध्येही ४६, रायफलच्या कॅम्पवर हल्ला केला होता. त्यात एक जवान शहीद झाला होता.
गुरुवारीही हंदवाडामध्ये ३0 राष्ट्रीय रायफल्सच्या तळावर दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. त्याला चोख प्रत्युत्तर देत जवानांनी तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. त्याच दिवशी आणखी चार दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला.
सर्जिकल स्ट्राइक्सनंतर पाकिस्तानने २५ वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आहे. पाकिस्तानी दहशतवाद्यांच्या घुसखोरीचे व हल्ल्यांचे सर्व प्रयत्न भारतीय जवानांनी उधळून लावले आहेत.

Web Title: Pakistan's curse continues