शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठी सक्तीवरून शिंदेसेनेत २ गट, संजय निरुपमांचा थेट विरोध; "७० टक्के रिक्षाचालक परप्रांतीय..."
2
Silver मध्ये २३०० रुपयांपेक्षा अधिक घसरण; Gold देखील झालं स्वस्त; पाहा काय आहेत सोन्या-चांदीची नवी किंमत?
3
TECH सेक्टरमध्ये खळबळ! Meta-Microsoft च्या प्लॅननं २३००० कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या धोक्यात
4
मुंबईत बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून ९ जण कोसळले, एकाची प्रकृती चिंताजनक 
5
Top Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
6
“संजय गायकवाडांवर गुन्हा दाखल करा”; विजय वडेट्टीवारांची मागणी, CM देवेंद्र फडणवीसांना पत्र
7
बेस्ट आहे Post Office ची ‘ही’ स्कीम; केवळ व्याजातून होईल ₹१२,००,००० पेक्षा जास्त कमाई
8
पहिले मुलांसाठी दिले ₹५२ हजार कोटी; आता रुग्णालयाला ६९०० कोटींचं दान, पाहा कोण आहे हे दांपत्य?
9
संशयास्पद हालचाली, RPF पथकाची पाळत; सिद्धेश्वर एक्सप्रेसमधील दरोड्याचा प्रयत्न हाणून पाडला
10
"तू मला आवडतेस, माझ्याकडे दैवी शक्ती..."; नाशिकच्या आणखी एका भोंदूबाबाचा कारनामा उघड
11
Stock Markets Today: शेअर बाजाराची घसरणीसह सुरुवात; सेन्सेक्स ४०० अंकांनी खाली, Pharma-IT शेअर्समध्ये मोठी विक्री
12
आजचे राशीभविष्य - २४ एप्रिल २०२६, शुभ फलदायी दिवस, नोकरी, व्यवसायात अनुकूल वातावरण राहील
13
IPL: इश्क वाला लव्ह! अनंत अंबानी - राधिका मर्चंट यांचा MI vs CSK मॅचमधील Cute Video चर्चेत
14
ना खेळपट्टी, ना कुठली सबब, हार्दिक पांड्याने 'या' खेळाडूंवर फोडलं मुंबईच्या पराभवाचं खापर
15
सीता नवमी २०२६: आयुष्यातील संकटांनी खचून गेलात? मग माता सीतेचा 'हा' एक गुण तुम्हाला उभारी देईल!
16
₹१४५ कोटींचा कथित FD घोटाळा आला समोर; ED चे अनेक ठिकाणी छापे, 'या' नामांकित बँकेत पैसे होते जमा
17
"जर दीदीने पैसे दिले असते तर..."; IRS अधिकाऱ्याच्या मुलीची हत्या करणाऱ्या आरोपीचा कबुलीनामा
18
Mumbai: देशातील ३५ टक्के गर्भश्रीमंत राहतात मायानगरी मुंबईत! 
19
Pune Water Shortage: पुण्याच्या पेठांमध्ये सकाळपासून पाणी नाही; पाण्यासाठी दुपारपर्यंत पाहावी लागणार वाट
20
लव्ह अफेअरचा दुर्दैवी अंत! २ तास गर्लफ्रेंडच्या ३ भावांनी मिळून बेदम मारले; बॉयफ्रेंडचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

पाकिस्तानचे ७ सैनिक ठार!

By admin | Updated: November 15, 2016 06:25 IST

पाकिस्तानच्या नियंत्रण रेषेवर भारतीय सैन्याच्या गोळीबारात आमचे ७ सैनिक मारले गेले असल्याचा दावा सोमवारी पाकिस्तानने केला आहे

इस्लामाबाद : पाकिस्तानच्या नियंत्रण रेषेवर भारतीय सैन्याच्या गोळीबारात आमचे ७ सैनिक मारले गेले असल्याचा दावा सोमवारी पाकिस्तानने केला आहे. भिम्बेर सेक्टरमध्ये रविवारी रात्री ७ सैनिक ठार झाल्याचे पाकिस्तानने म्हटले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, नियंत्रण रेषेवर शस्त्रसंधीचे उल्लंघन करून, विनाकारण गोळीबार करणाऱ्या पाकी जवानांना धडा शिकविण्यासाठी रविवारी रात्री भारताने जोरदार प्रत्युत्तर दिले. या वेळी भारताने तोफगोळ्यांचाही तुफानी मारा केला आणि रणगाडेविरोधी क्षेपणास्त्रही वापरले, असे कळते. मात्र भारतानेच शस्त्रसंधीचे उल्लंघन केल्याचा उलट्या बोंबा मारणे पाकने सुरू केले आहे. प्रत्यक्षात भारतीय सीमेवर सातत्याने शस्त्रसंधीचे उल्लंघन करून, कुरापती काढणाऱ्या पाकिस्तानला भारतीय जवान आक्रमकपणे प्रत्युत्तर देत आहेत. पाकिस्तानच्या गोळीबारातही भारताचे काही जवान शहीद झाले आहेत.

भारताचेही मोठे नुकसान?-पाकिस्तानचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ म्हणाले की, आमच्या सैनिकांनी भारतीय गोळीबाराला तोडीस तोड उत्तर दिले. त्यात भारतीय जवान निश्चितपणे मरण पावले आहेत. मात्र भारत ही माहिती लपवून ठेवत आहे.

उच्चायुक्तांना केले पाचारण-या घटनेनंतर पाकिस्तानच्या परराष्ट्र सचिवांनी इस्लामाबादमधील भारतीय उच्चायुक्त गौतम बंबावाले यांना पाचारण करून, भारतीय कृतीचा निषेध केला. याचे गंभीर परिणाम होतील, असा इशाराही सचिव ऐझाज चौधरी यांनी बंबावाले  यांना दिला. पाकचे लष्करप्रमुख  राहील शरीफ यांनी आपल्या जवानांना भारताच्या गोळीबाराला जशास तसे  उत्तर देण्याचे आदेश दिले आहेत. मृत जवानांना श्रद्धांजली वाहण्यासाठी रावळपिंडीला आलेल्या शरीफ यांनी आपल्या अधिकाऱ्यांना सांगितले की, भारतीय सैन्याला अजिबात भीक घालू नका. देशाचे संरक्षण हे आपले पहिले कर्तव्य आहे. (वृत्तसंस्था)