पाकने आता स्वत:ला आतंकिस्तान म्हणावे : हुसेन

By Admin | Updated: September 24, 2016 06:00 IST2016-09-24T06:00:05+5:302016-09-24T06:00:05+5:30

संयुक्त राष्ट्र आमसभेच्या व्यासपीठाचा पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी दुरुपयोग केला

Pakistan should now call himself a militant: Hussein | पाकने आता स्वत:ला आतंकिस्तान म्हणावे : हुसेन

पाकने आता स्वत:ला आतंकिस्तान म्हणावे : हुसेन


नवी दिल्ली- संयुक्त राष्ट्र आमसभेच्या व्यासपीठाचा पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी दुरुपयोग केला असून पाकिस्तानने जम्मू आणि काश्मीरचे स्वप्न बघणे सोडून द्यावे, असे भाजपाने शुक्रवारी म्हटले. पाकिस्तान हाच दहशतवादाचे मूळ असून त्याने आता स्वत:ला ‘आतंकिस्तान’ म्हणावे, असे पक्षाचे प्रवक्ते शाहनवाज हुसेन यांनी म्हटले. पाकिस्तानने स्वत:च्या देशातील प्रश्नांकडे लक्ष द्यावे, असे हुसेन यांनी म्हटले. हिजबुल मुजाहिदीनचा अतिरेकी बुऱ्हान वनी याचा गौरव केल्याबद्दल शरीफ यांच्यावर हुसेन यांनी जोरदार टीका केली. शरीफ यांनी संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेचे व्यासपीठ काश्मीर प्रश्नासाठी वापरून आपला खरा रंग दाखविला. शरीफ हे अतिरेकी हाफीज सईदसारखे बोलत आहेत, असे ते म्हणाले. पाकिस्तानने जम्मू आणि काश्मीरचे स्वप्न बघणे सोडून देऊन बलुचिस्तान कसे वाचवता येईल याचा विचार करावा, असे हुसेन म्हणाले. भाजपच्या राष्ट्रीय परिषदेची तीन दिवसांची बैठक येथे शुक्रवारी सुरू झाली.

Web Title: Pakistan should now call himself a militant: Hussein