शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

पाकची नवी खेळी; LoCजवळ 7 लाँच पॅड, 275 जिहादी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2019 12:34 IST

एलओसी (LoC) जवळ  पाकिस्तानने दहशतवादी तळ सुरू केल्याची खळबळजनक माहिती भारतीय गुप्तचर यंत्रणांनी दिली आहे.

नवी दिल्ली : केंद्र सरकारने जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम 370 रद्द केल्यानंतर पाकिस्तान सैरभैर झाला आहे. त्यामुळे पाकिस्तान आता चीनचा सहारा घेत पाकव्याप्त काश्मीरमध्ये भारताविरोधात कट रचण्याच्या प्रयत्नात आहे. एलओसी (LoC) जवळ  पाकिस्तानने दहशतवादी तळ सुरू केल्याची खळबळजनक माहिती भारतीय गुप्तचर यंत्रणांनी दिली आहे.

एलओसीजवळ पाकिस्ताने सात दहशतवादी लाँच पॅड सुरू केले आहेत. तसेच, 275 जिहादी सक्रिय आहेत. याशिवाय, जम्मू-काश्मीरमध्ये शांतता भंग करण्याच्या उद्देशाने अफगाण आणि पश्तून सैनिकांना देखील एलओसीजवळ तैनात करण्यात आले आहे.एका गुप्तहेर सुत्राने सांगितले की, पाकिस्तानकडून याआधीही सीमेपार दहशतवादी कारवायांसाठी अफगाण आणि पश्तून जिहादींचा  वापर करण्यात आला आहे. याआधी 1990 मध्ये पाकिस्तानने काश्मीरमध्ये हिंसा भडवण्यासाठी आणि दहशतवाद वाढवण्यासाठी परदेशी जिहादींचा वापर केला होता.

1990मध्ये पाकिस्तानने सर्वात आधी जिहादींचा वापर सीमेपार भारताविरोधात दहशतवाद पसरवण्यासाठी केला होता. भारताविरोधात काश्मीर खोऱ्यात प्रॉक्सी युद्ध छेडण्यासाठीच पाकिस्तानने हा प्रयत्न केला होता. भारताने याला प्रत्युत्तर दिल्यानंतर पाकिस्तानने आपल्या रणनीतीत बदल केला. आता पाकिस्तान पंजाब आणि पाकव्याप्त काश्मीरमधील लोकांचाच काश्मीरमध्ये हिंसा भडकवण्यासाठी वापर करत आहे.

दरम्यान, यासंबंधित काही महत्त्वाची कागदपत्रे 'टाइम्स ऑफ इंडिया'च्या हाती लागली आहेत. या कागदपत्रावरुन असे समजते की, पाकिस्तानी सेना आणि आयएसआय मिळून भारताविरोधात षडयंत्र आखण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरु आहेत. एलओसीजवळ पाकिस्तान जास्तीत जास्त दहशतवाद्यांना तयार करत आहे. तसेच, लाँचिंग पॅड तयार करण्याचे काम सुरु आहे. उत्तर काश्मीरच्या गुरेज सेक्टरमधून पाकिस्तान दहशतवाद्यांना भारतात घुसण्याच्या प्रयत्नात आहे.  

टॅग्स :terroristदहशतवादीPakistanपाकिस्तान