काश्मिरात पुन्हा फडकले पाकिस्तान व इसिसचे झेंडे

By Admin | Updated: October 30, 2015 22:13 IST2015-10-30T22:13:04+5:302015-10-30T22:13:04+5:30

जम्मू-काश्मिरात श्रीनगरच्या जामिया मशीद आणि आजूबाजूच्या भागात शुक्रवारी पुन्हा एकदा इस्लामिक स्टेट आॅफ इराक अँड सिरिया अर्थात इसिस या अतिरेकी

Pakistan and Isis flags again in Kashmir | काश्मिरात पुन्हा फडकले पाकिस्तान व इसिसचे झेंडे

काश्मिरात पुन्हा फडकले पाकिस्तान व इसिसचे झेंडे

श्रीनगर : जम्मू-काश्मिरात श्रीनगरच्या जामिया मशीद आणि आजूबाजूच्या भागात शुक्रवारी पुन्हा एकदा इस्लामिक स्टेट आॅफ इराक अँड सिरिया अर्थात इसिस या अतिरेकी संघटनेचे आणि पाकिस्तानचे झेंडे फडकले. हे झेंडे फडकवणारे युवक आणि पोलिसांत जोरदार संघर्ष उडाला. या युवकांनी पोलिसांवर दगडफेक केली. जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराचे नळकांडे फोडत पाण्याचा मारा केला.
जामिया मशिदीत शुक्रवारची नमाज अदा केली गेल्यानंतर लगेच चेहरा झाकलेल्या युवकांचा एक गट रस्त्यावर उतरला आणि त्याने पाकिस्तान, इसिस तसेच जैश ए मोहम्मद या अतिरेकी संघटनांचे झेंडे फडकवणे सुरू केले. याशिवाय जमाद-उद-दवाचा प्रमुख हाफिज सय्यद आणि हिज्बुल मुजाहिदीनचा म्होरक्या सय्यद सल्लाहुद्दीन यांचे पोस्टर्सही झळकवले. (वृत्तसंस्था)

Web Title: Pakistan and Isis flags again in Kashmir