शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ मे रोजी मतदान, महायुती वरचढ ठरणार
2
Latest Marathi News LIVE Updates: लोकसभेत सीमांकन विधेयकावर चर्चा सुरू, उद्या दुपारी ४ वाजता मतदान
3
परतवाडा व्हिडीओकांड ते बंगालमधील फसवणूक! अयान तनवीर आणि आनंदचे अनेक महिलांशी संबंध; धक्कादायक खुलासा
4
हाफिज सईदच्या खास माणसावर बेछुट गोळीबार; लष्करचा संस्थापक अमीर हमजा मृत्यूच्या दारात
5
“भारताच्या अर्ध्या लोकसंख्येत मुस्लिम महिलांचा समावेश होत नाही का?”; अखिलेश यादवांचा सवाल
6
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा पिण्यापूर्वी की नंतर... कधी पाणी पिणं ठरेल आरोग्यासाठी घातक?
7
जगातील फक्त १६ देशांमध्ये महिला राष्ट्राध्यक्षा; जागतिक राजकारणात किती आहे भागीदारी?
8
PPF मध्ये ₹१२,००० ची बचत तुम्हाला बनवू शकते कोट्यधीश, मिळणार हमखास परतावा; आणखी कोणते आहेत फायदे?
9
चैत्र अमावस्या २०२६: चैत्र अमावास्येला दुपारी १२ नंतर 'या' ७ राशींना सतर्कतेचा इशारा; पण का? वाचा!
10
"मी वैतागलो होतो, म्हणून आईला मारून टाकलं" मुलाचं ऐकून पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली!
11
तुमची एक चूक आणि FASTag होईल ब्लॅकलिस्ट; पटापट करा 'हे' काम; NHAI चे बँकांना महत्त्वाचे निर्देश
12
महागाई ३८ महिन्यांच्या उच्चांकावर! पश्चिम आशियातील युद्धाचा थेट परिणाम भारतीय नागरिकांवर
13
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
14
“भारताशी आमचे संबंध ५ हजार वर्ष जुने, युद्धानंतर आणखी मजबूत होणार”; इराणचे नेते थेट बोलले
15
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
16
Ashok Kharat : 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक
17
"त्यांनी भोंदूबाबाचा सगळा प्रकार संवेदनशीलतेने हाताळला..."; प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं केलं कौतुक
18
Rasikh Salam Dar: वय लपवलं, BCCI कडून २ वर्षांची बंदी; शिक्षकाचा मुलगा RCB साठी कसा बनला ‘कमबॅक किंग’?
19
इराणमध्ये पहिल्यांदाच महिलेला फाशीची शिक्षा; कोण आहे Bita Hemmati? तिच्यावर नेमका आरोप काय?
20
३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई
Daily Top 2Weekly Top 5

पाक कलाकारांना भारतात 'एन्ट्री' कायम

By admin | Updated: October 15, 2016 12:01 IST

पाकिस्तानी कलाकारांना भारतात काम करण्यासाठी मंजूर केलेला व्हिसा रद्द करण्याचा कोणताही निर्णय अद्याप तरी घेण्यात आलेला नाही, अशी माहिती गृहमंत्रालयातील सूत्रांनी दिली आहे.

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि.15 - 'पाकिस्तानी कलाकारांना भारतात काम करण्यासाठी मंजूर केलेला व्हिसा रद्द करण्याचा कोणताही निर्णय अद्याप तरी घेण्यात आलेला नाही', अशी माहिती गृहमंत्रालयातील एका वरिष्ठ अधिका-यांनी दिली आहे. उरी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव अधिक ताणले गेले आहेत. त्यामुळे पाकिस्तानची सर्व बाजूंनी कोंडी करण्याचाच एक भाग म्हणून पाकिस्तानी कलाकारांना भारतात काम करण्यासाठी बंदी घालण्यात आली आहे. मात्र पाकिस्तानी कलाकारांना मंजूर केलेला व्हिसा रद्द करण्याची केंद्र सरकारची सध्या कोणतीही योजना नाही, अशी माहिती समोर येत आहे.
 
उरी दहशतवादी हल्ल्याबाबत संताप व्यक्त करत 'महाराष्ट्र नवनिर्माण सेने'नेही पाकिस्तानी कलाकारांना ताबडतोड भारत सोडण्याचा इशारा दिला होता. तसेच 'पाकिस्तानी कलाकार असलेला एकही सिनेमा प्रदर्शित होऊ देणार नाही', अशी ठाम भूमिकाही मांडली. दरम्यान 'इंडियन मोशन पिक्चर्स प्रोड्युर्स असोसिएशन'नेही (इम्पा) पाकिस्तानी कलाकारांना भारतात काम करण्यावर बंदी घालण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाचे बॉलिवूडमधील काही जणांनी समर्थन केले आहे. मात्र, या निर्णयामुळे करण जोहरचा 'ए दिल है मुश्किल', शाहरुखचा 'रईस' सिनेमा अडचणीत सापडले आहेत. कारण सिनेमांमध्ये पाकिस्तानी कलाकार फवाद खान आणि माहिरा खानचा समावेश आहे. पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यामुळे सिनेमांच्या प्रदर्शनाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
आणखी बातम्या
18 सप्टेंबर रोजी उरी येथील भारतीय लष्कराच्या मुख्यालयावर पाकिस्तानी दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला केला. यात 20 जवान शहीद झाले. याचा बदला घेण्यासाठी भारतीय लष्कराने 27 आणि 28 सप्टेंबर रोजी पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून सर्जिकल स्ट्राईक करुन पाकिस्तानचे सैन्य आणि दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केले. भारताने वारंवार दहशतवादी हल्ला करणा-या पाकिस्तानला अद्दल घडवायचे ठरवले आहे, त्यासाठी पाकिस्तानची जागतिक पातळीवर कोंडी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.