शहरं
Join us  
Trending Stories
1
अग्निमित्रा पॉल यांना दिल्लीतून बोलावणे...! पश्चिम बंगालच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची चर्चा, अमित शाह निवडणार... 
2
Top Marathi News Live: पश्चिम बंगालमध्येही भाजपाचे धक्कातंत्र? मुख्यमंत्रिपदासाठी 'दिल्ली पॅटर्न'?
3
६ राज्ये, १९ जिल्हे आणि ८३ लाख लोकांना थेट फायदा; ₹२३,४०० कोटींमध्ये रेल्वे करणार 'हे' महत्त्वाचं काम
4
पाकिस्तानला अमेरिकेचा मोठा धक्का! सुरक्षेच्या कारणास्तव दूतावास कायमचा बंद केला
5
नसरापूर प्रकरण: …तर राज ठाकरेंवर दाखल होऊ शकतो गुन्हा, असीम सरोदेंचा दावा
6
'प्रोजेक्ट फ्रीडम' बंद, होर्मुझमधील जहाजांना यापुढे सुरक्षा देणार नाही; ट्रम्प यांची मोठी घोषणा
7
'राजा शिवाजी'मध्ये विद्या बालनच्या जागी दिसली असती 'ही' अभिनेत्री, मात्र दिला नकार; कारण...
8
डॉ. संग्राम पाटील यांचा यूकेमध्ये जाण्याचा मार्ग मोकळा; हायकोर्टाने दिला दिलासा, काय म्हटलं?
9
प्रसिद्ध अभिनेत्रीने सांगितलं इंडस्ट्रीतलं वास्तव, म्हणाली, "किसींग सीनला नकार, थकलेले मानधन..."
10
ममता बॅनर्जी राजीनामा देणार नाहीत, निवडणूक आयोगाने नोटिफिकेशन जारी केले; भाजप सत्ता कशी स्थापन करणार?
11
Palghar Crime: अघोरी पूजेसाठी बोलावले अन् १३ वर्षाच्या मुलीवर भोंदूबाबाने केला बलात्कार, पालघर हादरले
12
Samudrik Shastra: गालावरची खळी: केवळ सौंदर्य की भाग्याचं लक्षण? सामुद्रिक शास्त्र काय सांगते?
13
Multibagger Stock : १ लाखाचे बनले ३ कोटी रुपये; या शेअरनं दिला ३१०००% पेक्षा अधिक रिटर्न, एकेकाळी ₹१० पेक्षा कमी होती किंमत
14
आसाम, बंगालमधील विजयानंतर भाजपा ‘या’ राज्यात ऑपरेशन लोटसच्या तयारीत? बड्या नेत्याने दिले संकेत
15
पंजाबमध्ये हायअलर्ट! जालंधरनंतर अमृतसरमध्येही स्फोट; लष्करी तळ आणि BSF मुख्यालयाजवळ खळबळ
16
ममतांचा किल्ला कसा भेदला? काय होता विजयाचा फॉर्म्युला? भाजपचे चाणक्य अमित शाह यांच्या प्लॅनची ‘इनसाइड स्टोरी’
17
पश्चिम बंगालमध्ये मोठा राडा! भाजपने मध्यरात्री हॉग मार्केटमधील तृणमूल काँग्रेसचे कार्यालय पाडले, बुलडोझर आणला अन्...
18
तामिळनाडूत विजय होणार मुख्यमंत्री; काँग्रेसची पाठिंबा देण्याची तयारी, पण त्याबदल्यात काय हवं?
19
पाकिस्तान नौदलाने मदतीसाठी काश्मीर जहाज पाठविले! अरबी समुद्रात अडकलेल्या ७ भारतीय खलाशांची केली मदत
20
आजचे राशीभविष्य ६ मे २०२६: आर्थिक गुंतवणुकीसाठी अनुकूल दिवस, धनलाभ होण्याची शक्यता
Daily Top 2Weekly Top 5

पान २ : कॅडर नियमांचे खुलेआम उल्लंघन

By admin | Updated: May 5, 2015 01:21 IST

आयपीएसच्या जागी जीपीएस

आयपीएसच्या जागी जीपीएस
पणजी : कॅडर नियमांप्रमाणे जिल्हा पोलीस अधीक्षक आणि मुख्यालय पोलीस अधीक्षक या पदांवर आयपीएस अधिकार्‍यांची नियुक्ती करण्याची आवश्यकता असताना गोव्यात खुलेआम या नियमाचे उल्लंघन चालू आहे.
कॅडर नियमांनुसार जिल्हा अधीक्षक, गुन्हा अन्वेषण विभागाचे (सीआयडी) अधीक्षक आणि पोलीस मुख्यालयाचे अधीक्षक हे आयपीएस अधिकारीच असणे आवश्यक आहे. गोव्यात सीआयडीचे अधीक्षक आयपीएस अधिकारी आहेत; परंतु उत्तर गोवा आणि दक्षिण गोवा पोलीस अधीक्षक, तसेच मुख्यालय अधीक्षक ही पदे गोवा पोलीस सेवेतील (जीपीएस) अधिकारी आहेत. हे कॅडर नियमांचे उल्लंघन असून अशी उल्लंघने मागील कित्येक वर्षांपासून चालूच आहेत. मध्यंतरी काही ठराविक काळासाठी एखादा जिल्हा अधीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात येते; परंतु ती काही काळापुरती मर्यादित असते. नंतर लगेच त्यांची उचलबांगडी केली जाते.
काही काळासाठी विजय सिंग हे उत्तर गोव्याचे अधीक्षक होते; परंतु त्यांची नंतर उचलबांगडी करण्यात आली. त्यानंतर प्रियंका कश्यप या एक वर्ष उत्तर गोव्याच्या अधीक्षक म्हणून होत्या. त्यांचीही नंतर उचलबांगडी करण्यात आली आणि गोवा पोलीस सेवेतील अधिकारी उमेश गावकर यांची नियुक्ती करण्यात आली. दक्षिण गोव्याने तर अलीकडच्या काळात एकही आयपीएस अधीक्षक पाहिलेला नाही.
पणजी पोलीस मुख्यालय अधीक्षक पद हे आयपीएससाठी आहे. असे असतानाही मुख्यालय अधीक्षक हे कायम गोवा पोलीस सेवेतील अधिकारीच नेमण्यात आले आहेत.
गोव्यातील चार पदे ही आयपीएस वाल्यांसाठी आहेत आणि सद्यस्थितीत गोव्यात चार आयपीएस अधिकारी आहेतही. पोलीस उपमहानिरीक्षक म्हणून जबाबदारी वाहत असलेले के. के. व्यास हे अधीक्षक पदाचेच अधिकारी आहेत. केवळ ते डीआयजी म्हणून पदभार वाहत आहेत. प्रियंका कश्यप, कार्तिक कश्यप आणि आत्माराम देशपांडे हे इतर तीन आयपीएस अधिकारी आहेत.

(बॉक्स)
राजकीय हस्तक्षेप नडतो
पोलीस स्थानकात कोण निरीक्षक असावा याची शिफारस सत्ताधारी पक्षाचे स्थानिक आमदार करतात आणि जिल्हा अधीक्षक कोण असावा हे जिल्‘ातील मंत्री लोक ठरवितात, ही गोष्ट काही लपून राहिली नाही. निदान कोण अधीक्षक नसावा हे तरी मंत्री निश्चितपणे ठरवितात, ही वस्तुस्थिती आहे.