शहरं
Join us  
Trending Stories
1
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
2
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
3
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
4
लोकसभेच्या जागा आता ८५० हाेणार? महिला आरक्षणासाठीही केंद्राचे पाऊल, १३१ व्या घटनादुरुस्तीचा सरकारचा प्रस्ताव
5
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
6
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
7
‘तार्किक विसंगती’ हा शब्दप्रयोग फक्त बंगालमध्ये वापरला जातो, ममता बॅनर्जींचा आरोप
8
पश्चिम बंगालमध्ये २९४ मतदारसंघांत २,९२६ जणांचे भवितव्य पणाला, दोन टप्प्यात होणार मतदान
9
होर्मुझमधील युद्ध ठरेल अमेरिकेसाठी ‘वॉटरलू’?
10
कुंकी चौधरीच्या आईची हिमंता सरमांविरुद्ध तक्रार, अपमानजनक टिप्पणी केल्याचा आरोप
11
प्रत्येक कुटुंबाला १० लाखांचा आरोग्य विमा : राहुल गांधी
12
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
13
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
14
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
15
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
16
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
17
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
18
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
19
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
20
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
Daily Top 2Weekly Top 5

पान १ - आयआयटी

By admin | Updated: December 3, 2014 22:35 IST

दीपालीला फेसबुकककडून

दीपालीला फेसबुकककडून
१ कोटी ४२ लाखांची ऑफर
पाच जणांची निवड : आयआयटीच्या विद्यार्थ्यांचे पगार कोटींच्या घरात
मुंबई : फेसबुकसारख्या सोशल नेटवर्क साइट्सने मुंबई आयआयटीच्या विद्यार्थ्यांना चक्क गलेलठ्ठ पगाराच्या नोकर्‍या देऊ केल्या आहेत. सोमवारी झालेल्या कॅम्पस इंटरव्ह्यूमध्ये फेसबुकने मुंबई आयआयटीच्या दीपाली अडलखा, वेदरत्न दीक्षित, रोहन दास, आस्था अग्रवाल आणि राहुल सिंघल या पाच विद्यार्थ्यांची निवड केली आहे. विशेष म्हणजे, दीपाली अडलखा या विद्यार्थिनीला फेसबुकने चक्क वार्षिक १ कोटी ४२ लाखांची नोकरी देऊ केली आहे.
आयआयटीकडून मिळालेल्या माहितीनुसार, फेसबुक, गुगल, मायक्रोसॉफ्ट, बोस्टन कन्सल्टिंग ग्रुप, ब्लॅकस्टोन, सॅमसंग, ओरॅकल, लिंक्डइन, मॉर्गन स्टॅन्ले आणि शेलसारख्या नामांकित कंपन्यांनी विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेतल्या. पहाटे चार वाजल्यापासून मध्यरात्री दोन वाजेपर्यंत तब्बल ३७ कंपन्यांनी आयआयटीच्या विद्यार्थ्यांमधील टॉपर्सच्या मुलाखती घेतल्या. महत्त्वाचे म्हणजे, गेल्या वर्षी पहिल्या दिवशी ४०० विद्यार्थ्यांच्या मुलाखती झाल्या होत्या. या वर्षी मुलाखतींचा आकडा ५५० वर पोहोचला. विद्यार्थीवर्गाला प्रत्येकी ८० अर्ज करण्याची मर्यादा घालण्यात आली होती. परिणामी प्रत्येक कंपनीकडे दाखल होणार्‍या अर्जांची संख्या घटून ती ८००हून ३०० वर आली होती.
मुंबई आयआयटीमधून सर्वाधिक रकमेच्या पगाराची नोकरी पटकावणार्‍या दीपाली अडलखा हिच्याशी संपर्क साधला असता तिने सांगितले की, फेसबुकने माझे सोमवारी तब्बल प्रत्येकी एक तासाचे तीन इंटरव्ह्यू घेतले. त्यात विचारण्यात आलेले प्रश्न साधे, सोपे आणि सरळ असले तरी गोंधळात घालणारे होते. या मुलाखतींनंतर त्यांनी माझी निवड केली. माझा पगार वार्षिक १ कोटी ४२ लाख असला तरी बेसिक पेमेंट ६५ लाख एवढे आहे. (प्रतिनिधी)
----
विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेणार्‍या कंपन्यांमध्ये आंतरराष्ट्रीय कंपन्यांची संख्या अधिक असून, पहिल्या पंधरावड्यात मुलाखतींचा पहिला टप्पा होणार आहे.