पद्मावती वाद : कंगणा राणौतने नाकारलं दीपिकाला समर्थन ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2017 11:48 IST2017-12-05T11:46:35+5:302017-12-05T11:48:42+5:30

पद्मावती सिनेमावरून सुरू असलेल्या वादामुळे सिनेसृष्टीतील अनेक कलाकारांनी सिनेमाला समर्थन दर्शविलं आहे.

Padmavati row: Kangana Ranaut declines support to Deepika Padukone? | पद्मावती वाद : कंगणा राणौतने नाकारलं दीपिकाला समर्थन ?

पद्मावती वाद : कंगणा राणौतने नाकारलं दीपिकाला समर्थन ?

ठळक मुद्देपद्मावती सिनेमावरून सुरू असलेल्या वादामुळे सिनेसृष्टीतील अनेक कलाकारांनी सिनेमाला समर्थन दर्शविलं आहे. अभिनेत्री दीपिका पादूकोणला जीवे मारण्याची धमकी आल्यानंतर सिनेनिर्मात्यांनी दीपिकाच्या सुरक्षेसाठी एक याचिका तयार करून त्यावर बॉलिवूडमधील अनेक बड्या सेलिब्रेटींच्या सह्या घेतल्या आहेत.

मुंबई-  अभिनेत्री दीपिका पादूकोण हीचा पद्मावती हा सिनेमाला गेल्या महिन्याभरापासून वाद-विवादांनी घेलं आहे. सिनेमावरून वाढत्या वादामुळे दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांनी सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीखही पुढे ढकलली. पद्मावती सिनेमावरून सुरू असलेल्या वादामुळे सिनेसृष्टीतील अनेक कलाकारांनी सिनेमाला समर्थन दर्शविलं आहे. अभिनेत्री दीपिका पादूकोणला जीवे मारण्याची धमकी आल्यानंतर सिनेनिर्मात्यांनी दीपिकाच्या सुरक्षेसाठी एक याचिका तयार करून त्यावर बॉलिवूडमधील अनेक बड्या सेलिब्रेटींच्या सह्या घेतल्या आहेत. अभिनेत्री जया बच्चन, शबाना आझमी, कतरिना कैफ, आलिया भट्ट, विद्या बालन आणि अनुष्का शर्मा या अभिनेत्रींनी दीपिकाच्या सुरक्षेच्या मुद्द्यावर तयार करण्यात आलेल्या याचिकेवर सह्या केल्या. पण या याचिकेवर सही करायला अभिनेत्री कंगणा राणौतने नकार दिल्याचं समजतं आहे. ही याचिका जेव्हा कंगणाकडे सहीसाठी गेली तेव्हा तिने दीपिकाला समर्थन द्यायला स्पष्ट नकार दिल्याचं वृत्त मीड डे ने दिलं आहे. 

कंगणा राणौतच्या या कृतीमुळे सिनेसृष्टीतील सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. पण कंगणाने असं वागण्यामागचं कारणंही सगळ्यांना माहिती आहे. पहिलं महत्त्वाचं कारण म्हणजे, दीपिका पादूकोण आणि कंगणा राणौत या दोघींमध्ये घट्ट मैत्री नाही आणि दुसरं कारण म्हणजे कंगणा राणौत जेव्हा अभिनेता ऋतिक रोशनविरोधात कायदेशीर लढाई लढत होती तेव्हा तिला बॉलिवूडमधील कुणीही समर्थन दाखविलं नाही. एका प्रसिद्ध वेबासाईटच्या वृत्तानुसार 'दीपिका बचाव' याचिकेवर सही करायला कंगणाने स्पष्ट शब्दात नकार दिला. त्यामुळे सगळ्यांनीच आश्चर्य व्यक्त केलं आहे. 

दीपिका आणि कंगणामधील कोल्ड वॉर याआधीही चर्चेचा विषय राहीलं आहे. दीपिका पादूकोणला हॅपी न्यू इयर या सिनेमासाठी पुरस्कार मिळाला होता. पण तिने पुरस्कार सोहळ्यातच तो पुरस्कार कंगणाला तिच्या क्वीन या सिनेमातील अभिनयासाठी समर्पित केला. पण दीपिकाची ही कृती कंगणाला खटकली होती. दीपिकाला अभिनयाचं कौतुक करायचं होतं, तर ती सगळ्यांसमोर न करता वैयक्तिकपणे करू शकली असती,असं कंगणाचं मत होतं. अभिनेत्री कंगणा राणौत सध्या मणिकर्णिका या राणी लक्ष्मीबाईंवर आधारीत सिनेमाचं शूटिंग करते आहे. 

Web Title: Padmavati row: Kangana Ranaut declines support to Deepika Padukone?