Padma Awards 2022: जग जिंकणाऱ्या भारतभूषणांचा सन्मान; सत्या नडेला आणि सुंदर पिचाई यांना 'पद्मभूषण'

By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2022 08:42 PM2022-01-25T20:42:14+5:302022-01-25T20:42:14+5:30

काँग्रेसचे नेते आणि जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री गुलाम नबी आझाद यांनाही पद्मभूषण.

Padma Awards 2022 Padma Honors For Microsoft Satya Nadella Googles Sundar Pichai | Padma Awards 2022: जग जिंकणाऱ्या भारतभूषणांचा सन्मान; सत्या नडेला आणि सुंदर पिचाई यांना 'पद्मभूषण'

Padma Awards 2022: जग जिंकणाऱ्या भारतभूषणांचा सन्मान; सत्या नडेला आणि सुंदर पिचाई यांना 'पद्मभूषण'

Next

नवी दिल्ली: प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्र सरकारने पद्म पुरस्कारांची (Padma Awards) घोषणा केली. गुगलचे सीईओ (Google CEO) सुंदर पिचाई आणि मायक्रोसॉफ्टचे प्रमुख सत्या नडेला (Microsoft Satya Nadela) यांना पद्मभूषण पुरस्कारानं गौरवण्यात येणार आहे. याशिवाय काँग्रेसचे नेते आणि जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री गुलाम नबी आझाद यांचाही पद्मभूषण पुरस्कारनं सन्मान केला जाणार आहे.

काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद यांना पद्मभूषण, बंगालचे माजी मुख्यमंत्री बुद्धदेव भट्टाचार्जी यांना पद्मभूषण, माजी गृहसचिव राज राजीव महर्षी यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. याशिवाय भारत बायोटेकचे संस्थापक कृष्ण लीला आणि त्यांच्या पत्नीला पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. त्याचबरोबर नीरज चोप्रा यांना पद्मश्रीने सन्मानित करण्यात येणार आहे.


पद्मविभूषण पुरस्कारासाठी ४ नावांची घोषणा करण्यात आली आहे. त्यातील ३ पुरस्कारकर्त्यांचा मरणोत्तर सन्मान आहे. पद्मविभूषण पूरस्कारांमध्ये दिवंगत माजी सीडीएस जनरल बिपीन रावत, भाजपाचे दिवंगत नेते कल्याण सिंह, राधेश्याम खेमका तर प्रभा अत्रे यांनाही पद्मविभूषण पुरस्कारानं गौरवण्यात आले आहे. पद्म पुरस्कारांमध्ये महाराष्ट्रातील १० रत्नांचा सन्मान करण्यात आला आहे. त्यात सर्वोच्च असा पद्मविभूषण पुरस्कार प्रभा अत्रे यांना घोषित करण्यात आला आहे. त्यानंतर नारायण चंद्रशेखरन, सायरस पूनावाला यांना पद्मभूषण पुरस्कारानं गौरवण्यात आलं आहे. त्याचसोबत महाराष्ट्रातील खालील मान्यवरांना पद्मश्री पुरस्काराचा बहुमान मिळाला आहे.

Web Title: Padma Awards 2022 Padma Honors For Microsoft Satya Nadella Googles Sundar Pichai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.