शहरं
Join us  
Trending Stories
1
Arvind Kejriwal : "भाजपा अमित शाहांना पंतप्रधान बनवणार, योगींना 2 महिन्यांत हटवणार"; केजरीवालांची भविष्यवाणी
2
महाराष्ट्राच्या राजकारणात राज ठाकरेंचे स्थान काय? फोडाफोडीच्या आरोपांवरुन पवारांची बोचरी टीका
3
दारु घोटाळ्यात १५ दिवसांसाठी जेलमधून आलेल्या अरविंद केजरीवालांवर विश्वास का ठेवायचा? - काँग्रेस
4
भारतीय फुटबॉलचा नायक सुनील छेत्रीची निवृत्तीची घोषणा; झाला भावूक
5
बाप्पाच्या मिरवणुकीत बंदुक काढली, तुम्हाला आत टाकणारच; आदित्य ठाकरेंचा सरवणकरांना इशारा
6
जेट एअरवेजच्या नरेश गोयलांच्या पत्नीचे निधन; तिच्याच आजारपणामुळे मिळालेला जामीन
7
'दुनियादारी' फेम अभिनेता पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटून भारावला, म्हणाला - "आयुष्यातला मौल्यवान क्षण.."
8
"लोकसभा निवडणुकीनंतर सर्वात आधी पाकिस्तानात जाणार मोदी"; पाकिस्तानी मीडियाचा मोठा दावा
9
'हे काय शहाणपणाचे लक्षण नाही'; पंतप्रधान मोदींच्या रोड शोवरुन शरद पवारांची टीका
10
हादरवणारी घटना! एकतर्फी प्रेमातून २१ वर्षीय युवतीची हत्या; पहाटे घरात घुसून हल्ला
11
तिरडीवर बसून निवडणूक अर्ज भरायला पोहचला उमेदवार; स्मशानभूमीत उघडलं कार्यालय
12
Income Tax विभागानं सुरू केली नवी सुविधा, कोट्यवधी लोकांना होणार 'हा' फायदा
13
४ जूननंतर पुन्हा एकदा उबाठा, शरद पवारांचा पक्ष फुटणार; भाजपा नेत्याचा दावा
14
'भारत चंद्रावर पोहोचला, आमच्याकडे गटारी...; पाकिस्तानी खासदाराने आपल्याच देशाला दाखवला आरसा
15
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात, अनेक दिवसांनंतर IT शेअर्समध्ये तेजी
16
Video: ऐश्वर्या रायच्या हाताला दुखापत, तरी Cannes Film Festival मध्ये होणार सहभागी
17
आता कोव्हॅक्सिनचे साईड इफेक्ट्स समोर आले; केस गळती, त्वचा विकार आणि मासिक पाळीच्या समस्या...
18
TATA Sonsच्या पहिल्या महिला डायरेक्टर, ज्यांच्याकडून जेआरडी टाटाही घ्यायचे सल्ला; रतन टाटांशी 'हे' आहे नातं
19
VIDEO: १६० किमी वेग असताना सुरु केलं इन्स्टाग्राम लाईव्ह; मुंबईला येताना अपघातात कारचा चेंदामेंदा
20
२३ दिवस उलटूनही 'तारक मेहता' फेम सोढीचा काहीच पत्ता नाही, वडील म्हणाले- "मुलाची वाट पाहून..."

...अन्यथा आम्ही भाजपाचा पाठिंबा घेऊ- जेडीयू

By admin | Published: July 17, 2017 4:48 PM

राष्ट्रपती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विरोधकांपासून वेगळी चूल मांडलेला जनता दल युनायटेड पक्ष राष्ट्रीय जनता दलाशी फारकत घेण्याची शक्यता आहे.

ऑनलाइन लोकमतबिहार, दि. 17 - राष्ट्रपती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विरोधकांपासून वेगळी चूल मांडलेला जनता दल युनायटेड पक्ष राष्ट्रीय जनता दलाशी फारकत घेण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांपासून दोन्ही पक्षांत आरोप-प्रत्यारोप झडले असून, त्यांच्यातील वाद चव्हाट्यावर आलाय. त्यामुळे महाआघाडी फुटीच्या उंबरठ्यावर आहे. मात्र त्याच वेळी बिहारमधील भाजपाचे ज्येष्ठ नेते सुशील मोदी यांनी मध्यावधी निवडणुकांसाठी भाजपा तयार नसल्याचं स्पष्ट केलं आहे. दुसरीकडे जनता दल युनायटेडच्या एका आमदारानं नितीश कुमार यांना राष्ट्रीय जनता दलाशी काडीमोड घेण्याचा सल्ला दिला आहे. भाजपासोबत जनता दल युनायटेडचे चांगले संबंध होते. सद्यस्थितीत नितीश कुमार यांना लहानग्यांसोबत सरकार चालवावं लागतं आहे. तसेच लालूप्रसाद हे बदली आणि बढतीसाठी नितीश कुमार यांच्यावर दबाव टाकतात. भाजपा बिहारमध्ये नितीशकुमार यांच्यासारखीच भ्रष्टाचाराच्या विरोधात असून, उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांच्या राजीनाम्यावर ठाम आहे. सुशीलकुमार मोदी म्हणाले, मध्यावधी निवडणुका घेण्यासाठी पक्ष तयार नाही, त्याचा बिहार राज्याला कोणताही फायदा होणार नाही. भाजपाचा युती तोडण्यावर विश्वास नाही, या सर्व प्रकरणात संसदीय समिती निर्णय घेईल.

अधिक वाचा

बिहारमध्ये सरकार वाचवण्यासाठी सोनिया गांधींचा नितीश कुमारांना फोनलालू प्रसाद यादव गोत्यात! सीबीआयने दाखल केला गुन्हामिशा नसताना मी भ्रष्टाचार कसा केला? तेजस्वी यादवलालू प्रसाद यादव कंसाचे वंशज - बाबा रामदेव

सध्या २४३ सदस्य असलेल्या बिहार विधानसभेत राष्ट्रीय जनता दलाचे ८०, संयुक्त जनता दलाचे ७१, काँग्रेसचे २७ आणि भाजपाचे ५३ आमदार आहेत.  दरम्यान, जेडीयू आणि आरजेडीमधील वाद मिटवण्यासाठी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनीही मध्यस्थी केली आहे. बिहारमधील महागठबंधनचे सरकार वाचवण्यासाठी सोनिया गांधी यांनी आज बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालू प्रसाद यादव यांच्याशी फोनवरुन चर्चा केली. 

 

नितीश कुमारांनी या प्रकरणी कणखर भूमिका घेत तेजस्वी यादव संबंधी निर्णय घेण्यासाठी लालुंना चार दिवसांचा अल्टिमेटम दिला आहे. आपल्या सरकारची प्रतिमा स्वच्छ असावी असा नितीश कुमारांचा आग्रह आहे. त्यामुळे तेजस्वी यादव यांनी मंत्रिमंडळात राहू नये असे त्यांचे मत आहे. पण तेजस्वी यादव मंत्रिपदाचा राजीनामा देणार नाहीत अशी भूमिका राजदने घेतली आहे. त्यामुळे बिहारमधील जदयू-राजद-काँग्रेस महाआघाडीचे सरकार अडचणीत सापडले आहे.