अमेरिका आणि इस्राइलने इराणविरोधात सुरू केलेलं युद्ध, त्यामुळे आखाती देशांमध्ये निर्माण झालेली तणावपूर्ण परिस्थिती आणि इराणनं होर्मुझच्या सामुद्रधुनीची केलेली नाकेबंदी यामुळे जगभरात इंधन टंचाई जाणवू लागली आहे. याची झळ भारतालाही बसत असून, काही ठिकाणी पुढच्या काही दिवसांत देशाकडील पेट्रोल आणि डिझेलचे साठे संपणार अशा अफवा पसरत असल्याने चिंतीत झालेल्या लोकांकडून पेट्रोलपंपांवर रांगा लावून पेट्रोल खरेदी केले जात आहे. जम्मू काश्मीरमध्येही अनेक ठिकाणी अशा रांगा लागल्या असून, या रांगांवरून राज्याचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी लोकांना सक्त ताकिद दिली आहे.
याबाबत जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुला यांनी सांगितले की, नुकत्याच झालेल्या आढावा बैठकीमध्ये सद्यस्थितीत पेट्रोल, डिझेल आणि एलपीजी सिलेंडरची कुठलीही टंचाई नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. राज्य आणि केंद्र सरकारकडून परिस्थितीतवर सातत्याने लक्ष ठेवण्यात येत आहे. तसेच एलपीजी, पेट्रोल आणि डिझेलचे रेशनिंग करण्याचे किंवा वापर कमी करण्याचे कुठलेही आदेश देण्यात आलेले नाहीत.
ओमर अब्दुल्ला पुढे म्हणाले की, जेव्हा सरकारकडून अधिकृतरीत्या माहिती दिली जाते, तेव्हा लोक त्यावर लक्ष देत नाहीत. मात्र सोशल मीडियावर पसरत असलेल्या अफवांवर विश्वास ठेवतात. सध्याच्या परिस्थितीत अशा अफवांना बळी पडून पेट्रोल पंपांवर रांगा लावू नका कारण त्यामुळे विनाकारण परिस्थिती बिघडू शकते. त्यामुळे सोशल मीडियावरील अफवांना बळी पडून पेट्रोल पंपांवर रांगा लावणाऱ्या सर्व नागरिकांना माझं आवाहन आहे की, असे करू नका. जर परिस्थिती अशीच राहिली तर अशा अफवा पसरणे बंद होत नाही तोपर्यंत मी काही दिवसांसाठी पेट्रोल पंप बंद करण्याचे आदेश देईन, असा इशाराही ओमर अब्दुला यांनी दिला.
Web Summary : Amid fuel shortage rumors, Jammu and Kashmir's CM assures sufficient supplies. He urged citizens to avoid panic buying, threatening temporary petrol pump closures if rumors persist. Situation monitored by state & central govt.
Web Summary : ईंधन की कमी की अफवाहों के बीच, जम्मू-कश्मीर के मुख्यमंत्री ने पर्याप्त आपूर्ति का आश्वासन दिया। उन्होंने नागरिकों से दहशत में खरीदारी से बचने का आग्रह किया और अफवाहें जारी रहने पर अस्थायी रूप से पेट्रोल पंप बंद करने की धमकी दी। स्थिति पर राज्य और केंद्र सरकार द्वारा निगरानी रखी जा रही है।