ँस्मार्ट सिटी: महापालिकेच्या साासाठी अनेक संस्थांचा पुढाकार महापालिका व फिक्की यांच्यात सामंजस्य करार
By admin | Updated: September 4, 2015 21:54 IST
पुणे: केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी योजनेच्या पहिल्या टप्प्यात पुणे शहराचा समावेश झाल्यानंतर शहरातील उद्योग, व्यावसायिकांमध्ये आता याची चांगली चर्चा सुरू झाली आहे. या योजनेसाठी महापालिकेला सहकार्य करण्याची तयारी फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स ॲण्ड इंडस्ट्रीज (फिक्की) यांनी दाखवली असून तसा सामजंस्य करार आज करण्यात आला.
ँस्मार्ट सिटी: महापालिकेच्या साासाठी अनेक संस्थांचा पुढाकार महापालिका व फिक्की यांच्यात सामंजस्य करार
पुणे: केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी योजनेच्या पहिल्या टप्प्यात पुणे शहराचा समावेश झाल्यानंतर शहरातील उद्योग, व्यावसायिकांमध्ये आता याची चांगली चर्चा सुरू झाली आहे. या योजनेसाठी महापालिकेला सहकार्य करण्याची तयारी फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स ॲण्ड इंडस्ट्रीज (फिक्की) यांनी दाखवली असून तसा सामजंस्य करार आज करण्यात आला.आयुक्त कुणाल कुमार व फिक्कीचे जनरल सेक्रेटरी डॉ. ए. दिदारसिंग यांनी महापालिका कार्यालयात आज या करारावर स्वाक्षरी केली. स्मार्ट सिटी अंतर्गत महापालिकेच्या वतीने विविध उपक्रम राबवण्यात येणार आहेत. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था, सार्वजनिक आरोग्य, घनकचरा व्यवस्थापन, पाणी पुरवठा, शिक्षण, पावसाळी गटारे अशा विविध क्षेत्रात महापालिकेला काम करावे लागणार आहे. या सर्व उपक्रमांना आवश्यक ते सहकार्य फिक्कीच्या वतीने करण्यात येईल. यात प्रामुख्याने आर्थिक नियोजन, अर्थसा उपलब्ध होण्याच्या दृष्टिने मार्गदशन, कायदेशीर सल्ला याचा समावेश आहे.दिदारसिंग यांनी सांगितले की पुणे शहराचा नावलौकिक वाढवण्यासाठी स्मार्ट सिटी योजनेचा चांगला उपयोग होणार आहे. या कामात शहरातील सर्वानीच महापालिकेला सा करण्याची गरज आहे. ही गरज ओळखूनच फिक्कीने सहकार्याचा हात पुढे केला आहे. अशा प्रकारचा करार करणारी पुणे महापालिका ही देशातील पहिलीच महापालिका आहे असे आयुक्त कुणाल कुमार यांनी यावेळी सांगितले. याचप्रकारे सहकार्याचे आणखी हात पुढे आल्यानंतर पुणे या योजनेत देशस्तरावर दिपवाणारी कामगिरी करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी महापालिका उपायुक्त अनिल पवार, जेएनएनयुआर चे प्रमुख आशिष अगरवाल तसेच फिक्कीचे पदाधिकारी अनुप साबळे, वैशाली देशमुख, मौसुमी रॉय, अब्बास रावत आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)