शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
4
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
5
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
6
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
7
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
8
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
9
एक-एक वर्षासाठी पंतप्रधानपदाचे वाटप ; ‘इंडिया’चे हेच समीकरण : पंतप्रधान मोदी
10
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
11
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
12
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
13
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
14
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
15
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
16
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
17
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
18
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
19
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
20
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप

शेतकऱ्यांचा अवमान करणारे विधान केल्याप्रकरणी कंगनाविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Published: October 09, 2020 11:29 PM

Kangana Ranaut News : शेतकऱ्यांचा अवमान करणारे वक्तव्य केल्या प्रकरणी कंगना राणौतविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश कर्नाटकमधील तुमकूर येथील एका न्यायालयाने दिले आहेत.

बंगळुरू - कृषी कायद्यांना विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांचा अवमान करणारे वक्तव्य केल्या प्रकरणी कंगना राणौतविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश कर्नाटकमधील तुमकूर येथील एका न्यायालयाने दिले आहेत. वकील रमेश नाईक यांच्याकडून देण्यात आलेल्या तक्रारीच्या आधारावर प्रथम वर्ग न्याय दंडाधिकाऱ्यांनी क्याथासांद्रा पोलीस ठाण्यातील पोलिसांना कंगनाविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.न्यायालयाने सांगितले की, तक्रारदारांनी सीआरपीसी कलम १५५(३) अंतर्गत अर्ज करून तपासाती मागणी केली आहे. नाईक हेसुद्धा क्याथासांद्र येथील रहिवासी आहेत. त्यांनी कंगनाविरोधात गुन्हेगारी खटल्याबाबत सांगितले की, न्यायालयाने अधिकार क्षेत्रात येणाऱ्या पोलीस ठाण्याला कंगनाविरोधात गुन्हा दाखल करून तपास करण्याचे आदेश दिले आहेत.

केंद्र सरकारने आणलेल्या कृषिविधेयकांना राज्यसभेत मंजुरी मिळाल्यानंतर पंजाबमध्ये शेतकऱ्यांनी तीव्र आंदोलनास सुरुवात केली होती. त्यानंतर कृषीविषयक विधेयकांविरोधात पंजाबमध्ये निदर्शने करणाऱ्या शेतकऱ्यांना अभिनेत्री कंगना रानौत हिनेट्विटमध्ये दहशतवादी संबोधल्याचा आरोप झाला होता. नागरिकत्व दुरुस्ती कायद्यामुळे एकाचेही नागरिकत्व गेलेले नसताना याच दहशतवाद्यांनी त्या कायद्याविरोधात हिंसाचार माजविला होता, अशी मुक्ताफळे कंगनाने उधळली होती.

 

 

टॅग्स :Kangana Ranautकंगना राणौतCourtन्यायालयFarmerशेतकरीPoliceपोलिस