शहरं
Join us  
Trending Stories
1
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
2
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
3
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
4
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
5
२७ वर्षांपूर्वी दया नायक यांनी केलेल्या एन्काउंटरचा बदला घेतला; पुतण्याने 'त्या' खबऱ्याला शोधून संपवलं
6
रेकॉर्ड ब्रेकर KL राहुल! हिटमॅन रोहित, विराटला जमलं नाही ते या पठ्ठ्यानं करुन दाखवलं
7
क्रूरतेचा कळस! दात तोडले, डोकं फोडलं अन् शेवटी... ब्लॉक केल्याच्या रागातून २ मुलांच्या आईला संपवलं
8
बघून धक्का बसेल! कारमधून चक्क सहा जनावरांची तस्करी, अपघातामुळे फुटले बिंग; एका गायीचा मृत्यू
9
KL Rahul Fastest Century : १२ धावांवर कॅच सुटला! मग KL राहुलनं ठोकली विक्रमी सेंच्युरी
10
नीचभंग विपरीत धनयोग: ६ राशींना चांगले दिवस, नोकरीत यश-प्रगती; अडकलेले पैसे मिळतील, लाभ काळ!
11
“इतिहास, अध्यात्म, विकास अन् नारीशक्तीचा महासंगम!”; DCM एकनाथ शिंदे यांचे नवे विकास मॉडेल
12
बापरे! बेन स्टोक्सचा चेहरा सर्जरीनंतर पूर्णच बदलून गेला, पहिली झलक पाहताच फॅन्सना बसेल धक्का
13
भाजपा नेत्यांची धाकधूक वाढली! जोशी, केचेंना पुन्हा संधी की पोतदार, सोले, कोठेकर, भेंडे, तिवारी; विधान परिषदेवर कुणाला संधी?
14
सकाळी फ्रेश अन् दुपारी चेहरा निस्तेज, केसही खराब? ऑफिसमधील AC ठरतोय तुमच्या सौंदर्याचा शत्रू
15
खरेच मध्यरात्री उद्धव ठाकरेंशी भेट झाली का? CM देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
16
जेवणाचा डबा द्यायला गेली अन् आगीत जळून खाक झाली... भंगाराच्या गोदामात मृत्यूचं तांडव! ४ जणांचा मृत्यू
17
इस्लामाबादमध्ये युद्धाचा फैसला! ट्रम्प यांचे दूत अन् इराणचे मंत्री आमनेसामने; जगात शांतता प्रस्थापित होणार?
18
"माझ्या कानाखाली मारण्याच्या मुद्द्यावरून हरभजनने १ कोटी कमावले"; श्रीसंतचा गंभीर आरोप
19
भोंदू मनोहर भोसलेचा मुक्काम वाढला; माढा न्यायालयाने सुनावली तीन दिवसाची पोलीस कोठडी
20
Rohit Pawar : "शिवछत्रपतींचा अवमान करणाऱ्या बागेश्वरवर महाराष्ट्रात बंदी घाला,अन्यथा..."; रोहित पवार आक्रमक
Daily Top 2Weekly Top 5

मानवत कृषी उत्पन्न बाजार समितीवर प्रशासक नियुक्तीचा आदेश रद्द

By admin | Updated: February 18, 2015 00:13 IST

मानवत कृषी उत्पन्न बाजार समितीवर प्रशासक नियुक्तीचा आदेश रद्द

मानवत कृषी उत्पन्न बाजार समितीवर प्रशासक नियुक्तीचा आदेश रद्द
औरंगाबाद : मानवत कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान संचालक मंडळ बरखास्त करून तेथे प्रशासक नियुक्तीचा २७ डिसेंबर २०१४ रोजीचा जिल्हा उपनिबंधकांचा आदेश औरंगाबाद खंडपीठाने रद्दबातल ठरविला.
मानवत कृषी उत्पन्न बाजार समितीवर प्रशासक नियुक्त करण्याचे आदेश जिल्हा उपनिबंधकांनी २७ डिसेंबर २०१४ रोजी काढले होते. या आदेशाला कृउबाचे चेअरमन पंढरीनाथ मुंजाजीराव चोखट यांनी ॲड. आर. जे. निर्मल यांच्यामार्फत खंडपीठात आव्हान दिले होते. या याचिकेवर न्यायमूर्ती आर. एम. बोर्डे आणि न्यायमूर्ती सुनील पी. देशमुख यांच्यासमोर १२ फेब्रुवारी रोजी सुनावणी झाली. कोणतेही कारण न सांगता जिल्हा उपनिबंधकांनी संचालक मंडळ बरखास्त करून कृउबावर प्रशासक नियुक्त केला. संचालक मंडळाचा कालावधी जानेवारी २०१४ मध्ये संपला आहे. असे असले तरी शासनाने लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमुळे संचालक मंडळास मुदतवाढ दिलेली आहे. संचालक मंडळ पंचवार्षिक निवडणुका घेण्यास तयार आहे. उभय पक्षांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने याचिका मंजूर केली आणि कृउबावर प्रशासक नियुक्त करण्याचे उपनिबंधकांचे आदेश रद्दबातल केले. पुढील निवडणुका होईपर्यंत संचालक मंडळाला पदावर राहण्यास परवानगी दिली.
वेतन सोडून दुसरा खर्च नको
कर्मचार्‍यांच्या वेतनाशिवाय कोणताही खर्च करण्यास संचालक मंडळास खंडपीठाकडून मनाई करण्यात आली आहे. शिवाय धोरणात्मक निर्णय घेण्यासही मज्जाव करण्यात आला आहे. उपनिबंधकांच्या परवानगीने ते आवश्यक तो खर्च करू शकतात, असेही खंडपीठाने निकालात नमूद केले आहे.