पाकिस्तानने अमेरिका, चीनचे नाक कापले! भारताने जैसलमेरमध्ये आणखी एक एफ-१६ पाडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2025 22:58 IST2025-05-08T22:58:12+5:302025-05-08T22:58:45+5:30

India Pakistan War: लढाऊ विमानांनी पाकिस्तानच्या लाहोरकडे कूच सुरु केले असून जोरदार हल्ला चढविला आहे.  राजस्थान, पंजाब आणि जम्मूमध्ये पाकिस्तानचे ड्रोन, लढाऊ विमानांचे हल्ले रोखण्यात आले आहेत.

Operation Sindoor2.0: Pakistan has cut off the noses of America, China! India shoots down another F-16 in Jaisalmer | पाकिस्तानने अमेरिका, चीनचे नाक कापले! भारताने जैसलमेरमध्ये आणखी एक एफ-१६ पाडले

पाकिस्तानने अमेरिका, चीनचे नाक कापले! भारताने जैसलमेरमध्ये आणखी एक एफ-१६ पाडले

आज पाकिस्तानने भारतावर केलेल्या हल्ल्यात पाकिस्तानचे मोठे नुकसान झाले आहे. परंतू, यापेक्षा अमेरिका आणि चीनची मोठी नाचक्की झाली आहे. भारताने आज पाकिस्तानची अमेरिकेने दहशतवादाविरोदात लढण्यासाठी दिलेली दोन एफ १६ लढाऊ विमाने पाडली आहेत. एवढेच नाही तर चिनी बनावटीची दोन लढाऊ विमाने देखील पाडण्यात आली आहेत. सकाळपर्यंत हा आकडा वाढण्याची शक्यता आहे. 

सर्वात मोठी अपडेट म्हणजे पाकिस्तानचे टेहळणी विमान, कमांड सेंटरही त्यात असलेले AWACS विमान पाडण्यात आले आहे. लढाऊ विमानांनी पाकिस्तानच्या लाहोरकडे कूच सुरु केले असून जोरदार हल्ला चढविला आहे.  राजस्थान, पंजाब आणि जम्मूमध्ये पाकिस्तानचे ड्रोन, लढाऊ विमानांचे हल्ले रोखण्यात आले आहेत. आता प्रत्युत्तराची तयारी केली जात असून भारताची लढाऊ विमानांचा जथ्था पाकिस्तानवर हल्ल्यासाठी झेपावला आहे.  पाकिस्तानी लढाऊ विमानांच्या पायलटचे काय झाले याची माहिती अद्याप आलेली नाही, एका पायलटला ताब्यात घेण्यात आल्याचे समजते आहे. आजतकने याचे वृत्त दिले आहे.

भारताने लाहोरवर आकाशसह तीन प्रकारची मिसाईल डागण्यास सुरुवात केली आहे. पाकिस्तानने भारतीय सैन्याच्या ठिकाणांना लक्ष्य करून आगळीक केली आहे. यामुळे भारत आता पाकिस्तानविरोधात युद्धाची घोषणा करण्याची शक्यता आहे. दरम्यान, भारताने पाकिस्तानच्या हल्ल्यानंतर लाहोरवर मिसाईल डागली आहेत. पाकिस्तानकडून भारतीय सीमेवर सतत होत असलेल्या हल्ल्यांदरम्यान, यावेळी भारतीय सैन्याने अचूक प्रत्युत्तराची कारवाई सुरू केली आहे. दोन्ही बाजूंमध्ये तोफखाना आणि रॉकेटचा जोरदार मारा केला जात आहे. 

गुजरातमधील बनासकांठा जिल्ह्यातील सुईगम आणि वाव भागातील सीमावर्ती गावांमध्ये ब्लॅकआउट लागू करण्यात आला आहे. पंजाबमधील जालंधर येथील सुरानुसी ऑर्डनन्स फॅक्टरीला लक्ष्य करण्याचा प्रयत्न झाला आहे. जालंधर येथील आंबेडकर राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्थेजवळ ते रोखण्यात आले, ज्यामुळे मोठा हल्ला टळला. जम्मू-काश्मीरमधील उरी सेक्टरमध्ये पुन्हा एकदा जोरदार तोफांचा मारा सुरू आहे. 

Web Title: Operation Sindoor2.0: Pakistan has cut off the noses of America, China! India shoots down another F-16 in Jaisalmer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.