"सिंदूर स्फोटक बनतं तेव्हा...’’ पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पाकिस्तानला पुन्हा इशारा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2025 13:49 IST2025-05-22T13:48:28+5:302025-05-22T13:49:49+5:30

Operation Sindoor: २२ तारखेला झालेल्या दहशतवादी हल्ल्याचं प्रत्युत्तर म्हणून आम्ही २२ मिनिटांत दहशतवाद्यांचे नऊ अड्डे उद्ध्वस्त केले. जेव्हा सिंदूर स्फोटकाचं रूप घेतं तेव्हा काय परिणाम होतात हे या हल्ल्यांच्या निमित्ताने जगाने आणि देशाच्या शत्रूंनी पाहिले,असे मोदी यांनी सांगितले.

Operation Sindoor: "When vermilion becomes explosive...", Prime Minister Narendra Modi warns Pakistan again | "सिंदूर स्फोटक बनतं तेव्हा...’’ पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पाकिस्तानला पुन्हा इशारा 

"सिंदूर स्फोटक बनतं तेव्हा...’’ पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पाकिस्तानला पुन्हा इशारा 

जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याला आज एक महिना पूर्ण झाला आहे. हा हल्ला झाल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली होती. त्या पार्श्वभूमीवर भारतीय सैन्य दलांनी ऑपरेशन सिंदूर राबवत या हल्ल्याचा बदला घेतला होता. या कारवाईत सुरुवातीला पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करण्यात आले. तर पाकिस्तानने प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केल्यावर पाकिस्तानमधील अनेक हवाई तळांना लक्ष्य करण्यात आले होते, त्यामुळे पाकिस्तानवर युद्धविरामासाठी विनवणी करण्याची वेळ आली होती. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑपरेशन सिंदूरदरम्यान, सैन्यदलांनी दाखवलेल्या शौर्याला अभिवादन करत पाकिस्तानला पुन्हा एकदा इशारा दिला आहे. जेव्हा सिंदूर स्फोटक बनतं तेव्हा काय होतं हे जगाने आणि पाकिस्तानने पाहिलंय, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

राजस्थानमधील बिकानेर येथे एका सभेसाठी आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येथील सभेला संबोधित करताना ऑपरेशन सिंदूरबाबत मोठं विधान केलं. ते म्हणाले की, पहलगाममध्ये ज्या गोळ्या झाडल्या गेल्या, त्यामुळे देशातील १४० कोटी देशवासियांच्या हृदयाला जखमा झाल्या होत्या. त्यानंतर प्रत्येक देशवासीयाने एकजूट होऊन दहशतवाद्यांना मातीत गाडण्याचा संकल्प केला होता. आज तुम्हा सर्वांच्या आशीर्वादाने आणि देशाच्या सैन्यदलांनी दाखवलेल्या शौर्यामुळे आम्ही तो संकल्प पूर्ण करण्यात यशस्वी ठरलो आहोत. आमच्या सरकारने तिन्ही सैन्य दलांना कारवाईसाठी पूर्ण सुट दिली होती. मग तिन्ही सैन्यदलांनी मिळून असं चक्रव्युह रचलं की ज्यामुळे पाकिस्तानला गुडघे टेकून शरणागती पत्करावी लागली, असे मोदी यांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले की, २२ तारखेला झालेल्या दहशतवादी हल्ल्याचं प्रत्युत्तर म्हणून आम्ही २२ मिनिटांत दहशतवाद्यांचे नऊ अड्डे उद्ध्वस्त केले. जेव्हा सिंदूर स्फोटकाचं रूप घेतं तेव्हा काय परिणाम होतात हे या हल्ल्यांच्या निमित्ताने जगाने आणि देशाच्या शत्रूंनी पाहिले,असे मोदी यांनी सांगितले. तसेच ऑपरेशन सिंदूरने तीन महत्त्वाचे संदेश दिले आहेत. पहिला म्हणजे जर कुठला दहशतवादी हल्ला झाला, तर आमचं लष्कर प्रत्युत्तर देईल. वेळ आणि पद्धतही लष्कराकडून ठरवलं जाईल. दुसरी बाब म्हणजे आम्ही अणुबॉम्बच्या भीतीला घाबरत नाही. तिसरी बाब म्हणजे दहशतवादी आणि त्यांना पाठीशी घालणारं सरकार यांना एकच मानलं जाईल. 

Web Title: Operation Sindoor: "When vermilion becomes explosive...", Prime Minister Narendra Modi warns Pakistan again

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.