Operation Sindoor : काहींचे हात तुटले, तर काहींना गंभीर दुखापत झाली, असीम मुनीर यांनी पाकिस्तानी सैनिकांची अवस्था दाखवली
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2025 13:24 IST2025-05-13T13:24:07+5:302025-05-13T13:24:32+5:30
Operation Sindoor : भारतीय लष्कराने राबवलेल्या 'ऑपरेशन सिंदूर' मोहिमेमध्ये पाकिस्तानी लष्कराचे मोठे नुकसान झाले आहे.

Operation Sindoor : काहींचे हात तुटले, तर काहींना गंभीर दुखापत झाली, असीम मुनीर यांनी पाकिस्तानी सैनिकांची अवस्था दाखवली
Operation Sindoor ( Marathi News ) : पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव निर्माण झाला. पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारतीय लष्कराने 'ऑपरेशन सिंदूर' अंतर्गत पाकिस्तानमधीव नऊ दहशतवादी तळांवर हल्ले केले. या हल्ल्यात अनेक दहशतवाद्यांचा खात्मा झाला. यानंतर पाकिस्तान सीमेवरुन सतत गोळीबार सुरू होता. या गोळीबाराला भारतीय सैन्यानेही प्रत्युत्तर दिले.
पाकिस्तानने केलेला एअरबेस उडवल्याचा दावा; PM मोदी तिथेच पोहोचले, सैनिकांशी साधला संवाद
या तणावामध्ये पाकिस्तान आतापर्यंत आपल्या देशाचे कोणतेच नुकसान झाले नसल्याचा दावा करत होता. दरम्यान, आता पाकिस्तानी सैनिक मोठ्या प्रमाणात जखमी असल्याची माहिती समोर आली आहे. पाकिस्तानी लष्कराचे जनरल मुनीर यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये ते पाकिस्तानी सैनिकांना रुग्णालयात भेट देत असल्याचे समोर आले आहे. यामुळे पोकिस्तानी सैन्याचं काहीच नुकसान न झाल्याचा दावा फोल ठरला आहे.
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये भारतीय सैन्याकडून दारूण पराभव झाल्यानंतर, पाकिस्तानी सैन्याचे जनरल असीम मुनीर आपला अहंकार दाखवण्यासाठी सैनिकांना भेटण्यासाठी रुग्णालयात पोहोचले. त्यांचा व्हिडिओही व्हायरल झाला होता. पाकिस्तानी सैन्य मोठ्या प्रमाणात रुग्णालयात उपचार घेत आहे. कोणाचा हात तुटला आहे तर कोणाला गंभीर दुखापत झाल्याचे व्हिडीओमध्ये दिसतंय.
हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. भाजपाच्या नेत्यांनीही शेअर केला आहे.
सोमवारी पाकिस्तानचा लष्कर प्रमुख मुनीर म्हणाला की, पाकिस्तानचे सशस्त्र दल दृढनिश्चयी आहेत आणि "कोणतीही शत्रुत्वाची योजना" त्यांचा निर्धार कमकुवत करू शकत नाही. भारतीय लष्कराच्या हल्ल्यात जखमी झालेल्या सैनिक आणि नागरिकांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी रावळपिंडीतील कम्बाइंड मिलिटरी हॉस्पिटलला भेट देताना जनरल मुनीर यांनी हे वक्तव्य केले. लष्कराने जारी केलेल्या निवेदनानुसार, त्यांनी जखमी जवानांची भेट घेतली.
पाकिस्तान का सेना प्रमुख अस्पतालों में जा जाकर घायल सैनिकों से मिल रहा है , जो भारत के बहादुर जवानों की मार खाकर पड़े हैं pic.twitter.com/qAUrCOECgj
— Laxmikant bhardwaj (@lkantbhardwaj) May 13, 2025