Operation Sindoor : 'आधी जीव वाचवा, चौक्या नंतर बांधू'; भारतीय सैन्याच्या कारवाईला घाबरून पाकिस्तानी कमांडर मशिदीत लपला होता

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2025 10:57 IST2025-05-21T10:52:52+5:302025-05-21T10:57:06+5:30

Operation Sindoor : 'ऑपरेशन सिंदूर'वेळी कुपवाडा जिल्ह्यातील तंगदार सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेपलीकडे लिपा व्हॅली येथे भारतीय सैन्याने दिलेला जोरदार प्रत्युत्तर पाकिस्तानी सैन्याला आयुष्यभर लक्षात राहिल.

Operation Sindoor Save lives first, build posts later Pakistani commander hid in mosque, fearing Indian army action | Operation Sindoor : 'आधी जीव वाचवा, चौक्या नंतर बांधू'; भारतीय सैन्याच्या कारवाईला घाबरून पाकिस्तानी कमांडर मशिदीत लपला होता

Operation Sindoor : 'आधी जीव वाचवा, चौक्या नंतर बांधू'; भारतीय सैन्याच्या कारवाईला घाबरून पाकिस्तानी कमांडर मशिदीत लपला होता

Operation Sindoor :  'ऑपरेशन सिंदूर'वेळी कुपवाडा जिल्ह्यातील तंगदार सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेपलीकडे लिपा व्हॅली येथे भारतीय सैन्याने दिलेला जोरदार प्रत्युत्तर पाकिस्तानी सैन्याला आयुष्यभर लक्षात राहिल. 

लष्कराच्या चिनार कॉर्प्सच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, नियंत्रण रेषेवर दोन्ही बाजूंनी जोरदार गोळीबार सुरू असताना, लिपा व्हॅलीमध्ये तैनात असलेल्या पाकिस्तानी सैन्याच्या ७५ व्या इन्फंट्री ब्रिगेडचे कमांडर आघाडी सोडून आपला जीव वाचवण्याचा प्रयत्न करत होते.
 
गोळीबारादरम्यान आम्ही रेडिओ संदेश आणि शत्रूच्या इतर संपर्कांच्या आधारे आम्हाला कळले की पाकिस्तानी सैन्याचा कमांडर एका मशिदीत लपून बसला होता. यावेळी तो आपल्या सैनिकांना त्यांचे प्राण वाचवण्याचे निर्देश देत होता. एका इंटरसेप्टेड मेसेजमध्ये, पाकिस्तानी कमांडरने त्याच्या सैनिकांना सांगितले, 'आधी जीव वाचवा, चौक्या नंतर तयार करता येतील.'

नौदलाला आज असे जहाज मिळणार, जगात कोणत्याही नौदलाकडे नाही; पाचव्या शतकातील आरमाराची ताकद जगभ्रमंतीला निघणार...

भारतीय लष्कराच्या चिनार कॉर्प्सच्या अधिकाऱ्यांनी मंगळवारी तंगदार येथे पत्रकारांना माहिती दिली. ते म्हणाले, नियंत्रण रेषेच्या पलीकडे असलेल्या लिपा व्हॅलीमधील पाकिस्तानी लष्कराची पायाभूत सुविधा पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहे. आम्ही त्यांच्या किमान तीन चौक्या, एक शस्त्रास्त्र डेपो, एक इंधन साठवण सुविधा आणि तोफखाना, इतर लक्ष्यांसह पूर्णपणे नष्ट केले आहेत.

पाकिस्तानी सैन्याला त्यांच्या नष्ट झालेल्या पायाभूत सुविधा पुन्हा बांधण्यासाठी किमान आठ ते दहा महिने लागतील. पाकिस्तानी सैन्याने आमच्या नागरी आणि लष्करी प्रतिष्ठानांना लक्ष्य करण्यासाठी ड्रोन आणि क्षेपणास्त्रांसह तोफखान्याचा वापर केला. नागरिकांच्या घरांव्यतिरिक्त, आमचे इतर कोणतेही मोठे नुकसान झालेले नाही.

स्वदेशी आकाशदीप रडार प्रणाली आली कामाला

चिनार कॉर्प्सच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, आमच्या स्वदेशी आकाशदीप रडार सिस्टीमने पाकिस्तानचा हवाई हल्ला हाणून पाडण्यात उत्कृष्ट कामगिरी केली आहे. शत्रूचा नाश झाला असला तरी, आपली लष्करी पायाभूत सुविधा अबाधित आहे. लिपा व्हॅलीमध्ये, भारतीय सैन्याने फक्त पाकिस्तानी सैन्याच्या त्या आस्थापनांचे मोठे नुकसान केले आहे. हे पाकिस्तानी सैन्यासाठी सर्वात महत्वाचे होते.

'भारतीय सैन्याने १.३ च्या प्रमाणात प्रत्युत्तर दिले, म्हणजेच पाकिस्तानने केलेल्या प्रत्येक शस्त्रसंधी उल्लंघनासाठी भारतीय सैन्य तिप्पट जोरदार हल्ला करेल.

तंगदार येथील रहिवासी गुलाम कादीर म्हणाले की, ८ ते १० मे दरम्यान पाकिस्तानी सैन्याने आमच्या घरांना लक्ष्य केले. आपल्या सैन्याने त्याला दिलेल्या प्रत्युत्तरानंतर, तो पुन्हा कधीही हल्ला करण्याचे धाडस करणार नाही. सीमेपलीकडे खूप नुकसान झाले आहे.

Web Title: Operation Sindoor Save lives first, build posts later Pakistani commander hid in mosque, fearing Indian army action

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.