"ऑपरेशन सिंदूर केवळ 'स्थगित' केलंय, संपलेलं नाही"; PM मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम

By विराज भागवत | Updated: May 12, 2025 20:53 IST2025-05-12T20:53:20+5:302025-05-12T20:53:56+5:30

Operation Sindoor PM Modi India vs Pakistan: आम्ही आमच्या पद्धतीने अन् अटी-शर्तीवरच प्रत्युत्तर देत राहू, असे मोदी म्हणाले

"Operation Sindoor is not over it has only been suspended PM Modi slams Pakistan sponsored terrorism | "ऑपरेशन सिंदूर केवळ 'स्थगित' केलंय, संपलेलं नाही"; PM मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम

"ऑपरेशन सिंदूर केवळ 'स्थगित' केलंय, संपलेलं नाही"; PM मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम

Operation Sindoor PM Modi India vs Pakistan: भारतानेपाकिस्तानमधीलदहशतवाद्यांच्या तळावर आणि सैन्यांच्या तळांवर केलेली ऑपरेशन सिंदूरची कारवाई ही केवळ स्थगित केली आहे, हे ऑपरेशन संपलेले नाही. येत्या काळात आम्ही पाकिस्तानच्या प्रत्येक कारवाईवर लक्ष ठेवू आणि ते कशाप्रकारे वागतात यावर आमची प्रतिक्रिया अवलंबून असेल. भारताची तिन्ही सैन्यदल आणि इतर सर्व सहकारी अलर्ट मोडवर आहेत, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तान आणि दहशतवादाला सज्जड दम भरला. आज मोदींनी व्हिडीओ संदेशाद्वारे देशाला संबोधित केले. त्यावेळी ते बोलत होते.

"सर्जिकल स्ट्राइक आणि एअर स्ट्राइक नंतर ऑपरेशन सिंदूर ही भारताची दहशतवादा विरोधातील नवी निती आहे ऑपरेशन सिंदूर मुळे दहशतवादा विरोधातील लढ्यात एक नवा बेंचमार्क सेट करण्यात आला आहे. भारतावर दहशतवादी हल्ला झाला तर सडेतोड उत्तर मिळेल आम्ही आमच्या पद्धतीने आणि आमच्या अटी शर्तीवर प्रत्युत्तर देऊ. दहशतवादाची पाळीमुळे उकडून काढण्यासाठी जंगल पछाडू. कोणत्याही प्रकारची अण्वस्त्र संदर्भातील धमकी भारत खपवून घेणार नाही. अणवस्त्रांच्या आडून सुरू असलेल्या दहशतवादावर भारत वेळोवेळी कठोर प्रहार करत राहील. आम्ही दहशतवादी आणि ज्यांच्या कृपेने दहशतवाद सुरू आहे, त्या आकांना वेगवेगळ्या पद्धतीची ट्रीटमेंट देणार नाही," असे मोदींनी खडसावून सांगितले.

"पाकिस्तानचा दहशतवादाला पाठिंबा देणारा चेहरा जगासमोर आला, ज्यावेळी मारल्या गेलेल्या दहशतवादांच्या अंत्ययात्रेत पाकिस्तानचे मोठमोठे अधिकारी उपस्थित राहिले. देशाने पुरस्कृत केलेला दहशतवाद असल्याचा हा सर्वात मोठा पुरावा आहे. आम्ही भारताच्या नागरिकांचा सुरक्षेसाठी कायम अशा पद्धतीचे कठोर पावले उचलत राहू. पाकिस्तानला आपण युद्धभूमीत कायमच धूळ चारली आहे त्यात ऑपरेशन सिंदूर हा एक नवा उच्चांक भारताने गाठला आहे आम्ही वाळवंटापासून ते डोंगराळ भागापर्यंत सर्वत्र आपल्या सामर्थ्याचे दर्शन घडवून आणले आणि त्यासोबतच नव्या युगातील युद्धजन्य परिस्थितीतही आपले सामर्थ्य दाखवून दिले," असेही मोदी म्हणाले.

Web Title: "Operation Sindoor is not over it has only been suspended PM Modi slams Pakistan sponsored terrorism

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.