"किती नुकसान झालं, किती दहशतवादी मारले गेले हे समजलं असतं तर…’’, काँग्रेस खासदार इम्रान मसूद यांचं मोठं विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2025 16:32 IST2025-05-07T16:16:22+5:302025-05-07T16:32:05+5:30

Operation Sindoor :

Operation Sindoor :"If only we had known how much damage was done, how many terrorists were wanted...", Congress MP Imran Masood's big statement | "किती नुकसान झालं, किती दहशतवादी मारले गेले हे समजलं असतं तर…’’, काँग्रेस खासदार इम्रान मसूद यांचं मोठं विधान

"किती नुकसान झालं, किती दहशतवादी मारले गेले हे समजलं असतं तर…’’, काँग्रेस खासदार इम्रान मसूद यांचं मोठं विधान

गेल्या महिन्यात पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ भारतीय पर्यटकांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर काल रात्री भारतीय सैन्य दलाने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळांवर तुफानी एअर स्ट्राईक करत ददहशवादी आणि पाकिस्तानला जबर दणका दिला आहे. या कारवाईनंतर देशभरातून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, काँग्रेसचे नेते आणि उत्तर प्रदेशमधील सहारनपूरचे खासदार इम्रान मसूद यांनी या एअर स्ट्राईकबाबत मोठं विधान केलं आहे. 

इम्रान मसूद म्हणाले की, पाकिस्तानवर एअरस्ट्राईक करणाऱ्या भारतीय लष्कराला सलाम, अशाच प्रकारे प्रत्युत्तर देण्याची आवश्यकता होती. मात्र किती दहशतवादी मारले गेले आणि किती नुकसान झाले, याचीही माहिती घोषणा करून दिली पाहिजे. तेव्हा आमचं काळीज थंड होईल.आम्ही वारंवार सांगिलं आहे की, आम्ही सरकारसोबत आहोत. तसेच दहशतवाद्यांना चोख प्रत्युत्तर दिलं गेलं पाहिजे.

ते पुढे म्हणाले की, आम्ही सरकारला स्पष्टच सांगितलं होतं की, यावेळी केवळ सारवासारव चालणार नाही. दहशतवाद्यांविरोधात कठोर कारवाई झालीच पाहिजे. आता ती कारवाई झाली आहे. त्यासाठी लष्कराला सलाम. ज्यांनी पहलगाम येथे हल्ला केला. त्या दहशतवाद्यांच्या तळांवरचे किती दहशतवादी या हल्ल्यात मारले गेले पाहिजेत, याचीही माहिती समोर आली पाहिजे. तेव्हाच मनाला शांतात मिळेल, असे त्यांनी सांगितले.

इम्रान मसूद पुढे म्हणाले की, दहशतवाद पूर्णपणे नष्ट होईपर्यंत आपण आत थांबता कामा नये. दहशतवादाला मुळापासून संपवलं पाहिजे. जेणेकरून आपल्या देशात दहशतवादी हल्ला करण्याची हिंमत कुणीही करू शकणार नाही. 

Web Title: Operation Sindoor :"If only we had known how much damage was done, how many terrorists were wanted...", Congress MP Imran Masood's big statement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.