ऑपरेशन सिंदूरमुळे मिळाला बुस्ट, आशिया पॉवर इंडेक्समध्ये भारताची लष्करी रँकिंग वाढली!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2025 01:33 IST2025-11-29T01:33:10+5:302025-11-29T01:33:59+5:30
या क्रमवारीत भारताला 'मेजर पॉवर' (Major Power) चा दर्जा मिळाला आहे...

ऑपरेशन सिंदूरमुळे मिळाला बुस्ट, आशिया पॉवर इंडेक्समध्ये भारताची लष्करी रँकिंग वाढली!
भारताने प्रतिष्ठित एशिया पॉवर इंडेक्समध्ये तिसरा क्रमांक पटकावला असून, या क्रमवारीत त्याला 'मेजर पॉवर' (Major Power) चा दर्जा मिळाला आहे. 'ऑपरेशन सिंदूर'मधील कामगिरीच्या आधारावर लोवी इन्स्टिट्यूटने केलेल्या अभ्यासात भारताला ही रँकिंग मिळाली आहे. 'सुपरपॉवर'चे पहिले दोन क्रमांक अनुक्रमे अमेरिका आणि चीनने कायम राखले आहेत. २०२४ मध्ये, भारताला ३८.१ च्या एकत्रित गुणांसह 'मिडिल पॉवर्स'मध्ये स्थान देण्यात आले होते. या वर्षीच्या अहवालात, भारताला १०० पैकी ४० गुण मिळाले आहेत.
या यादीत ३८.८ आणि ३२.१ गुणांसह जपान आणि रशिया अनुक्रमे चौथ्या आणि पाचव्या स्थानावर आहेत. तथापि, ७३.७ गुणांसह असलेल्या चीनच्या तुलनेत भारत अजूनही बराच मागे आहे. तर अमेरिका ८०.५ गुणांसह अव्वल स्थानावर आहे.
वाढलेल्या आर्थिक आणि लष्करी क्षमतेचा परिणाम -
तपशीलवार मूल्यांकनानुसार, आर्थिक (Economic) आणि लष्करी (Military) क्षमतांमधील वाढीमुळे भारताचा रँक वाढला आहे. 'इनवर्ड इन्व्हेस्टमेंट'मधील वाढीमुळे भारत आर्थिक दृष्ट्या नवव्या स्थानावर पोहोचला. आंतरराष्ट्रीय कनेक्टिव्हिटी, लीव्हरेज आणि तांत्रिक विकासामधून भारताचे भू-राजकीय (Geopolitical) महत्त्व वाढल्याचे इन्स्टिट्यूटने नमूद केले. याशिवाय, लष्करी क्षमतांमधील सातत्यपूर्ण वाढही त्यांनी अधोरेखित केली.
ऑपरेशन सिंदूरच्या कामगिरीचा प्रभाव -
मे २०२५ मध्ये सुरू झालेल्या 'ऑपरेशन सिंदूर' मधील भारताच्या कामगिरीमुळे तज्ज्ञांच्या मूल्यांकनावर प्रभाव पडला असावा. मात्र, या ऑपरेशनने भारताचा अलीकडील युद्ध अनुभव वाढला. मात्र, 'डिफेन्स नेटवर्क'च्या बाबतीत भारताची सर्वाधिक घसरण दिसली असून, रँक ११ व्या स्थानावर आला आहे (२०२४ च्या तुलनेत दोन रँकने खाली). फिलिपिन्स आणि थायलंडने भारताला मागे टाकले आहे.
NEW RESEARCH: The @LowyInstitute has today released the 2025 edition of the Asia Power Index, authored by @SusannahCPatton & @JackRSato, which measures resources and influence to rank the relative power of states in Asia.
— The Lowy Institute (@LowyInstitute) November 25, 2025
🌏Explore the Asia Power Index: https://t.co/v541RMGRitpic.twitter.com/B7oJIRVd6y
गुंतवणुकीच्या बाबतीत चीनला मागे टाकले -
इंडेक्सनुसार, अमेरिकेनंतर सर्वाधिक 'इनवर्ड इन्व्हेस्टमेंट' आकर्षित करण्यात भारताने चीनला मागे टाकले आहे. इन्स्टिट्यूटच्या निष्कर्षानुसार, संरक्षण भागीदारी (Defense Partnership) निर्माण करण्याच्या बाबतीत आव्हाने कायम असली तरी, अलीकडील लष्करी अनुभव आणि आर्थिक गतीमुळे भारताची प्रादेशिक स्थिती मजबूत झाली आहे.