शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! मध्यपूर्वेत इराणनं अमेरिकेची कंबर मोडली; ८ देशांतील लष्करी तळ उद्ध्वस्त, रडारपासून विमानांपर्यंत सर्वकाही नष्ट!
2
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
3
शत्रूचा कर्दनकाळ! भारताचे 'अग्नी-६' अमेरिकेपर्यंत पोहोचणार? जगातील कोण कोणते देश निशाण्यावर येणार? ताकद पाहून चक्रावून जाल
4
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
5
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
6
भुसावळातील भीषण आग; सहा घरे जळून खाक; चार बकऱ्यांचा होरपळून मृत्यू
7
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
8
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
9
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
10
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
11
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
12
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
13
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
14
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
15
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
16
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
17
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
18
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
19
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
20
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
Daily Top 2Weekly Top 5

Operation All Out : अनंतनागमध्ये लष्कराकडून चार दहशतवाद्यांना कंठस्नान

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2018 13:41 IST

ऑपरेशन ऑल आऊट मोहीम अधिक तीव्र केल्यानंतर लष्कराने शुक्रवारी सकाळी अजून चार दहशतवाद्यांना कंठस्नान घातले आहे

श्रीनगर - काश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांविरोधातील ऑपरेशन ऑल आऊट मोहीम अधिक तीव्र केल्यानंतर लष्कराने शुक्रवारी सकाळी अजून चार दहशतवाद्यांना कंठस्नान घातले आहे. अनंतनाग जिल्ह्यातील  श्रीगुफारा भागात सकाळपासून सुरू असलेल्या चकमकीमध्ये लष्कराने या चार दहशतवाद्यांना ठार केले असून,  या चकमकीत एक पोलीस कर्मचारी शहीद झाला आहे, तर दोन नागरिक जखमी झाले आहेत.

जम्मू काश्मीरचे डीजीपी एस. पी. वैद्य यांनी या चकमकीविषयी माहिती देताना सांगितले की, या परिसरात तीन ते चार दहशतवादी लपून बसल्याची माहिती आम्हाला मिळाली. त्यानंतर पहाटेपासून या चकमकीस सुरुवात झाली. आतापर्यंत तीन दहशतवाद्यांचे मृतदेह सापडले असून, या चकमकीत एका पोलीस कर्मचाऱ्याला वीरमरण आले आहे. तसेच दोन नागरिक जखमी झाले आहेत."

 

 रमजानचा महिना आटोपल्यावर शस्त्रसंधी मागे घेतल्यानंतर तसेच जम्मू-काश्मीरमध्ये राज्यपाल राजवट लागू झाल्यानंतर लष्कराच्या दहशतवाद्यांविरोधातील मोहिमेला अधिकच धार आली आहे. अनंतनाग जिल्ह्यातील श्रीगुफारा परिसरात दहशतवादील लपून बसल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर शुक्रवारी सकाळी  लष्कराने शोधमोहीम सुरू केली. या मोहिमेदरम्यान लष्कराने चार दहशतवाद्यांना घेरले. त्यानंतर सुरू झालेल्या चकमकीत लष्कराने चार दहशतवाद्यांना ठार केले.

 

दरम्यान, पुलवामा जिल्ह्यातील त्राल येथे दोन दिवसांपूर्वीच लष्कर आणि जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या दहशतवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत लष्कराने तीन दहशतवाद्यांना ठार केले होते. त्यांच्याकडून एके-47 आणि अन्य दारुगोळा जप्त करण्यात आला होता. 

टॅग्स :operation all outऑपरेशन ऑल आऊटIndian Armyभारतीय जवानJammu Kashmirजम्मू-काश्मीरterroristदहशतवादी