शहरं
Join us  
Trending Stories
1
‘होर्मुझ’बाबत भारताचे मोठे पाऊल, केंद्र सरकारचा मेगा प्लान ठरला; तेल संकटातून दिलासा मिळेल?
2
"पुढची २० वर्षे सुरक्षित झाली"; शरद पवारांनी PM मोदींचे कौतुक केल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीसांकडून जोरदार स्वागत
3
Top Marathi News LIVE Updates: गॅस पाईपलाईन असूनही अर्ज केला नाही तर सिलेंडर बंद होणार! छगन भुजबळांचा ग्राहकांना इशारा
4
"PM मोदी जगात भारताची प्रतिष्ठा जपण्याचं काम करताहेत", शरद पवारांकडून पंतप्रधानांच्या कामाचं कौतुक, काय बोलले?
5
PM मोदींकडून जॉर्जिया मेलोनी यांना 'मेलोडी' भेट! इटलीच्या पंतप्रधान व्हिडिओ शेअर करत म्हणाल्या...
6
"आई, ते माझ्या खोलीत पंखा टांगतायत..."; ट्विशा शर्मा, दीपिका नागर अन् आता पलक रजकचा करुण अंत
7
देशांतर्गत क्रिकेट गाजवलं, आयपीएलमध्ये चमकले; आता थेट भारतीय संघात निवड, कोण आहेत 'हे' ४ खेळाडू!
8
रोजचं पोहे-पराठे खाऊन कंटाळलात? नाश्त्याला द्या 'हेल्दी ट्विस्ट'; झटपट बनवा मऊसूत 'बीट इडली'
9
Indian Railway आता Logo बदलणार, मंत्रालयाचा होकार; नवे काय पाहायला मिळेल, डिझाइन कसे असेल?
10
राज्यात पेट्रोल-डिझेलचा एक महिन्याचा साठा; इंधन टंचाईवर छगन भुजबळांची टेन्शन वाढवणारी माहिती
11
Khushboo Patani : Video - "बेटी विदा नहीं, कुर्बान हुई, गप्प बसणारे आई-वडीलही जबाबदार"; खुशबू पाटनीचा संताप
12
होर्मुझ संकटानंतर आता थेट हिंद महासागरात हायव्होल्टेज ड्रामा; इराणचा १० लाख बॅरलचा ऑइल टँकर केला जप्त!
13
Pune Crime: पुण्यात थरारक फायरिंग; टोळी युद्धातून एकावर गोळीबार, वनराज आंदेकर खून प्रकरणाशी दुवा
14
Vastu Tips: नोकरी-व्यवसायात हवीये मोठी झेप? 'या' ५ वास्तू टिप्स नक्की वापरुन पहा
15
मोठा खुलासा! इराणविरुद्धच्या युद्धात अमेरिकेची किती विमानं उद्ध्वस्त झाली? थक्क करणारा आहे आकडा; पाहा संपूर्ण यादी
16
Jinping on Iran War: इराण युद्ध थांबवण्यासाठी चीनचा पुढाकार, शी जिनपिंग यांनी दिला चार मुद्द्यांचा प्रस्ताव
17
अधिक मास २०२६: १ मंत्र ११ वेळा जपा, अशक्यही शक्य होईल; स्वामी सेवा तारेल, अद्भूत अनुभव येईल!
18
Twisha Sharma : ट्विशा शर्माचा कॉल कट होण्यापूर्वी आईने ऐकलेला आवाज; गच्चीवर तासाभरात नेमकं काय घडलं?
19
"खेळाडूंच्या वैयक्तिक आयुष्यावर बोलू नका, फक्त क्रिकेटवर लक्ष द्या" रियान पराग समालोचकांवर भडकला!
20
दुचाकीच्या धडकेनंतर लक्झरी बसने घेतला पेट, बाळापूर शेगाव मार्गावरील घटना
Daily Top 2Weekly Top 5

देशातील केवळ ३१ शहरे १० वर्षांत झाली 'स्मार्ट'; महाराष्ट्रात फक्त पुणे, सोलापूर शहरांचा समावेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2026 06:57 IST

डिसेंबर २०२५पर्यंतच्या आकडेवारीनुसार, या प्रकल्पांतर्गत सुमारे दहा वर्षात ५९,३८५ कोटी रुपये खर्च झाले आहेत.

नवी दिल्ली-  देशातील १०० शहरांना 'स्मार्ट सिटी'मध्ये रूपांतरित करण्यासाठी २०१६मध्ये पाच वर्षांसाठी एक प्रकल्प सुरू करण्यात आला होता. मात्र, दहा वर्षे उलटून गेली आणि प्रकल्पाची मुदत तीन वेळा वाढवूनही केवळ ३१ शहरेच 'स्मार्ट' बनू शकली आहेत. त्यामध्ये महाराष्ट्रातील पुणे, सोलापूर या दोन शहरांचा समावेश आहे. तर, आणखी २६ शहरांना 'स्मार्ट' होण्यासाठी काही काळ लागणार आहे.

माहितीचा अधिकार अंतर्गत दाखल केलेल्या अर्जाच्या उत्तरात केंद्रीय गृहनिर्माण मंत्रालयाने सांगितले की, स्मार्ट सिटीचे ४३ शहरांमधील प्रकल्प जवळपास पूर्ण झाले आहेत, तर २६ शहरांमध्ये हे प्रकल्प पूर्ण होण्यासाठी अजून वेळ लागणार आहे. डिसेंबर २०२५पर्यंतच्या आकडेवारीनुसार, या प्रकल्पांतर्गत सुमारे दहा वर्षात ५९,३८५ कोटी रुपये खर्च झाले आहेत.

अंतिम टप्प्यात असलेली शहरे अन् प्रकल्प संख्या
औरंगाबाद (२ प्रकल्प), कल्याण-डोंबिवली (३), नाशिक (२), पिंपरी-चिंचवड (१), ठाणे (२), विशाखापट्टणम (२), गुवाहाटी (१), भागलपूर (१), पणजी (४), अहमदाबाद (१), गांधीनगर (२), सिमला (३), जम्मू (४), बंगळुरू (१), दावणगेरे (१), हुबळी-धारवाड (२), कोच्ची (२), कावारट्टी (४), तिरुवअनंतपूरम (३), ग्वाल्हेर (४), सागर (२), उज्जैन (३), इम्फाळ (४), शिलाँग (३). स्मार्ट सिटी मोहिमेसाठी २८ राज्ये आणि ८ केंद्रशासित प्रदेशांमधील शहरे निवडली होती.

'स्मार्ट सिटी' ठरलेली ३१ शहरांची नावे अन् पूर्ण झालेले प्रकल्प
आगरतळा (७७ प्रकल्प), आग्रा (६२), अटल नगर (५२), बरेली (८८), भोपाळ (८२), चंडीगड (२७), कोईबतूर (७२), दाहोद (३६), इरोड (५५), इंदूर (२३१), जबलपूर (१३०), झाशी (७८), कोहिमा (४०), मदुराई (१६), मुरादाबाद (४१), पाटणा (३४), पुणे (५५), राजकोट (७१), रांची (२६), सालेम (११४), शिवमोग्गा (११२), सोलापूर (४९), सूरत (८७), तुतिकोरिन (७५), तिरुचिरापल्ली (८३), तिरुनेलवेली (८१), त्रिप्पूर (२८), तुमकुरू (२१७), उदयपूर (१४३), वडोदरा (५२), वाराणसी (११७). या ३१ स्मार्ट शहरांमध्ये सर्वाधिक खर्च ज्या शहरांवर झाला आहे, त्यामध्ये इंदूर, त्रिप्पुर, सूरत, वाराणसी, भोपाळ आणि राजकोट यांचा समावेश आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Only 31 Cities Became 'Smart' in 10 Years; Pune, Solapur Included

Web Summary : India's Smart City project, initiated in 2016, has transformed only 31 of 100 cities despite multiple extensions. Maharashtra's Pune and Solapur are among the completed projects. The initiative, costing ₹59,385 crore, nears completion in 43 cities, with 26 still underway.
टॅग्स :BJPभाजपाSmart Cityस्मार्ट सिटी