शहरं
Join us  
Trending Stories
1
ना कलिंगड, ना बिर्याणी...पायधुनीतील 'त्या' चौघांच्या मृत्यूचं खरं कारण अखेर समोर!
2
कोण आहेत तामिळनाडूचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर? बहुमत असून सत्तास्थापनेत पेच; देशाचे लागले लक्ष
3
नुसतं सोनंच नाही, तर खाणीतून सोनं काढणंही महागलं! इराण युद्धामुळे डिझेल-स्फोटकांचे दर भडकले; पाहा काय आहे गणित
4
मोठी बातमी! नांदेड ग्रामीण पोलिसांनी उद्ध्वस्त केला शस्त्रांचा महाअड्डा; तब्बल ४,७९६ शस्त्रे जप्त
5
बाप रे! काव्या मारनच्या SRH संघाचा कर्णधार पॅट कमिन्सला ११३ कोटींची ऑफर; मेगा डीलसाठी तो IPL सोडणार?
6
४० रोडरोमिओंना अद्दल घडवणारी लेडी सिंघम; सरपंचाची लेक झाली धडाकेबाज IPS ऑफिसर
7
“विद्यार्थ्यांची फसवणूक करणाऱ्या संस्थांवर फौजदारी गुन्हे दाखल करा”: चंद्रकांत पाटील
8
चिराग पासवान यांनी मांडली वेगळी चूल...! पंजाबमध्ये सर्व जागा लढविण्याची घोषणा
9
यंदा शनि जयंती कधी आहे? दर्श भावुका अमावास्या अन् सौभाग्य योग; पाहा, महत्त्व अन् मान्यता
10
Mumbai Watermelon Case: कलिंगड प्रकरणात नवा ट्विस्ट, चौघांचा बुचकळ्यात टाकणारा 'ब्लड रिपोर्ट'; काय समोर आलं?
11
ऑपरेशन सिंदूरदरम्यान, पाकिस्तानचे ११ तळ उडवले, १३ विमाने पाडली, तसेच..., वर्षभरानंतर तिन्ही सैन्यदलांनी आकडाच सांगितला    
12
IPL 2026: युनिव्हर्स बॉस ख्रिस गेलचा 'तो' विक्रम इतिहासजमा, पंजाबच्या कूपर कॉन्लीची रेकॉर्ड ब्रेक इनिंग!
13
भयंकरच घडलं! सात वर्षांपूर्वी केला होता प्रेमविवाह; सिरीशाला पतीने रिक्षा स्टॅण्डवरच संपवले 
14
तमिळनाडूत सस्पेन्स संपला! 'विजय' सरकारला राज्यपालांचा हिरवा कंदील; जाणून घ्या कधी होणार शपथविधी
15
देशातील १३ राज्यांत वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; ताशी ६० किमी वेगाने वाहणार वारे
16
Astro Tip: पैशांची कमतरता भासतेय? शुक्रवारी आवर्जून करा 'हे' ५ उपाय; लक्ष्मी होईल प्रसन्न 
17
क्रिकेट विश्वावर शोककळा! विराट कोहलीचा जुना सहकारी अमनप्रीत सिंग गिलचे वयाच्या ३६ व्या वर्षी निधन
18
मार्कशीटमधील खाडाखोड कळली अन् बापाची सटकली; ९ वर्षांच्या मुलीला क्रूरपणे संपवलं, नंबर १ चा होता अट्टहास
19
रंगांचा खेळ! रेड, ग्रीन तर माहितीय पण फूड पॅकेजिंगवरील ब्लू, येलो मार्कचा नेमका अर्थ काय?
20
१०,००० किमी मारक क्षमता, अनेक बडे देश टप्प्यात, अग्नी-६ सुपर क्षेपणास्त्र तयार, भारत जगाला दाखवणार ताकद
Daily Top 2Weekly Top 5

'प्रत्येक घरातून एक व्यक्ती, प्रत्येक गावातून १० महिला', शेतकऱ्यांकडून ट्रॅक्टर रॅलीची तयारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2021 13:24 IST

26 January Kisan Tractor March : शेतकर्‍यांच्या ट्रॅक्टर रॅलीच्या पार्श्वभूमीवर दिल्ली पोलिसांनी सर्वोच्च न्यायालयात अर्ज दाखल केला आहे.

ठळक मुद्दे'22-23 जानेवारीला पंजाब, हरियाणा, राजस्थान, उत्तर प्रदेश आणि इतर राज्यांतील शेतकरी ट्रॅक्टर रॅलीत सामील होतील'

नवी दिल्ली : कृषी कायद्याच्या विरोधात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनांतर्गत 26 जानेवारी रोजी दिल्लीत शेतकरी ट्रॅक्टर रॅली काढण्याच्या तयारीत आहेत. दिल्ली पोलिसांनी शेतकऱ्यांची ही ट्रॅक्टर रॅली थांबवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाला सांगितले आहे. मात्र, शेतकरी आपल्या निर्णयावर ठाम असल्याचे सांगण्यात येत आहे. ही ट्रॅक्टर रॅली यशस्वी करण्यासाठी शेतकरी तयारीला लागले आहेत. यासाठी प्रत्येक घरातील एक व्यक्ती आणि प्रत्येक खेड्यातील किमान 10 महिलांनी या रॅलीत सहभागी व्हावे, असे आवाहन शेतकरी नेत्यांनी केले आहे.

आतापर्यंतच्या योजनेनुसार, आम्ही सर्वांना आवाहन केले आहे की, अधिकाधिक लोकांनी या रॅलीत सहभागी व्हावे. 22-23 जानेवारीला पंजाब, हरियाणा, राजस्थान, उत्तर प्रदेश आणि इतर राज्यांतील शेतकरी ट्रॅक्टर रॅलीत सामील होतील आणि दिल्लीच्या दिशेने जातील, असे शेतकरी नेते हरिंदर सिंग म्हणाले. तसेच, जे दिल्लीला जाऊ शकत नाहीत त्यांनी आपल्या शहरांमध्ये व खेड्यांमध्ये ट्रॅक्टर रॅली काढली पाहिजे, जेणेकरून सरकारला मेसेज पाठवता येईल. याशिवाय, आम्ही 6 ते 20 जानेवारी दरम्यान शेतकरी जागृती पखवाडा साजरा करीत आहोत, ज्याअंतर्गत सर्व शेतकऱ्यांना जागरूक केले जात आहे, असे हरिंदर सिंग यांनी सांगितले.

दुसरीकडे, शेतकर्‍यांच्या ट्रॅक्टर रॅलीच्या पार्श्वभूमीवर दिल्ली पोलिसांनी सर्वोच्च न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. यामध्ये 26 जानेवारीला शेतकर्‍यांनी ट्रॅक्टर रॅली काढू नये, असे म्हटले आहे. या अर्जावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. याबाबत शेतकरी नेते हरिंदरसिंग म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाकडे आमचे लक्ष आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर संयुक्त किसान मोर्चाची बैठक होईल, ज्यामध्ये अंतिम निर्णय घेण्यात येईल. याचबरोबर, बुधवारी लोहबत्तीच्या आगीत कृषी विधेयकाच्या प्रती जाळण्याचे नियोजन शेतकऱ्यांनीनी केले आहे. शेतकरी आंदोलनात सहभागी नेत्यांनी असे म्हटले आहे की, जो कोणी लोहारी साजरा करेल तो विधेयकाची प्रत जाळेल.
 

टॅग्स :Farmer strikeशेतकरी संपFarmerशेतकरी