शहरं
Join us  
Trending Stories
1
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
2
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
3
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
4
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
5
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
6
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
7
परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?
8
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
9
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
10
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
11
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
12
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
13
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
14
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
15
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
16
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
17
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
18
उडू शकत नाही तरीही ऑस्ट्रेलियन 'इमू' एवढ्या लांब अयोध्येत कसा पोहोचला?; वन विभागही हैराण
19
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
20
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
Daily Top 2Weekly Top 5

दुचाकी अपघातात एकाचा मृत्यू

By admin | Updated: December 13, 2015 00:07 IST

काटोल : दुचाकी स्लिप झाल्याने मागे बसलेल्या तरुणाचा जागीच मृत्यू झाला तर आरोपी दुचाकीचालक गंभीर जखमी झाला. जखमीवर नागपूर येथील मेयो रुग्णालयात उपचार सुरू आहे. अपघाताची ही घटना रविवारी (दि.६) रात्री ८ वाजताच्या सुमारास काटोल पोलीस ठाण्याच्या हद्दीतील डोंगरगाव शिवारात घडली.

काटोल : दुचाकी स्लिप झाल्याने मागे बसलेल्या तरुणाचा जागीच मृत्यू झाला तर आरोपी दुचाकीचालक गंभीर जखमी झाला. जखमीवर नागपूर येथील मेयो रुग्णालयात उपचार सुरू आहे. अपघाताची ही घटना रविवारी (दि.६) रात्री ८ वाजताच्या सुमारास काटोल पोलीस ठाण्याच्या हद्दीतील डोंगरगाव शिवारात घडली.
प्रदीप रामचंद्र ढोणे (३३, रा. सावनेर) असे मृत तरुणाचे नाव आहे तर राजकुमार भगवान मोरे, असे आरोपी दुचाकीचालकाचे नाव आहे. आरोपी राजकुमार याने आपली एमएच-४०/एम-५१७६ क्रमांकाची दुचाकी निष्काळजीपणे चालवून भरधाव पळविली. यात दुचाकी स्लिप झाल्याने त्याच्या दुचाकीवर मागे बसलेला तरुण खाली पडून गंभीर जखमी झाल्याने त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर आरोपी दुचाकीचालक हा जखमी झाला.
या प्रकरणी फिर्यादी निर्मला कृष्णाजी ढोले (६५, रा. वरुड, जि. अमरावती) यांच्या तक्रारीवरुन काटोल पोलिसांनी आरोपी दुचाकीचालकाविरुद्ध भादंवि कलम २७९, ३०४ (अ) अन्वये गुन्हा नोंदविला आहे. पुढील तपास हवालदार दीक्षित करीत आहेत.
....
पादचारी वृद्धेस चिरडले
भिवापूर : अज्ञात वाहनचालकाने पादचारी वृद्ध महिलेस जबर धडक दिल्याने वृद्धेचा मृत्यू झाला. ही घटना भिवापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मानोरा शिवारात शुक्रवारी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास घडली.
अनुबाई अर्जुन भारणे (७२, रा. उमरेड) असे मृत वृद्धेचे नाव आहे. अनुबाई ही मानोरा शिवारातील रस्त्याने पायी जात होती. दरम्यान, अज्ञात वाहनाने तिला जोरदार धडक दिली. यात गंभीर जखमी झाल्याने तिचा घटनास्थळीच मृत्यू झाला. या प्रकरणी भिवापूर पोलिसांनी अज्ञात वाहनचालकाविरुद्ध भादंवि कलम २७९, ३०४ (अ) नुसार गुन्हा नोंदवून आरोपी वाहनचालकाचा शोध सुरू केला आहे. पुढील तपास हवालदार कोडापे करीत आहेत. (तालुका प्रतिनिधी)