शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी शिकलीच पाहिजे; पण भाषेच्या नावावर हिंसा नको: फडणवीस
2
1st May Changes : एलपीजी सिलिंडरचे दर ते क्रेडिट कार्ड, युपीआय ते एटीएम; आजपासून काय काय बदललं? थेट खिशावर होणार परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०१ मे २०२६: प्रकृतीची काळजी घ्या, आजारपणावर खर्च होण्याची शक्यता!
4
मुंबई-पुणे मिसिंग लिंकची गिनीज बुकमध्ये नोंद; महाराष्ट्र दिनी आज होणार लोकार्पण, प्रवास आणखी वेगात
5
मतदान आटोपताच महागाईचा भडका, गॅस सिलेंडरच्या किमतीत थेट ९९३ रुपयांची वाढ, नवे दर आजपासून लागू
6
तेल तापल्याने रुपयाची विक्रमी वाताहत! सर्वसामान्यांवर महागाईचं संकट; जीवनावश्यक वस्तू महागणार
7
राज्यात आजपासून डिजिटल जनगणना; प्रथमच ‘स्व-गणना’चा पर्याय उपलब्ध, स्व-गणना कशी कराल?
8
नाट्यमय घडामोडींनंतर विधान परिषदेच्या १० जागा बिनविरोध; महायुतीला ९ तर मविआला १ जागा
9
रात्रही ‘ताप’दायक, महिनाभर वाढता उकाडा; चंद्रपूरात सर्वाधिक उष्ण तापमानाची नोंद
10
महापालिकेची उदासीनता, ना मदत, ना दिलासा! महापाैर, उपमहापाैर कुणीही घटनास्थळी जाऊ शकले नाहीत
11
७० टनाची क्रेन उचलण्यासाठी पालिकेची १३ टनाची क्रेन; वाहतूक कोलमडली, नेमकी चूक कुणाची?
12
मूठभरांमुळे मराठा समाजाला आरक्षण नाकारणे अयोग्य; राज्य सरकारचा हायकोर्टात युक्तिवाद
13
चिंताजनक! सरकारी तिजोरी खोला अन् रुपयाच्या घसरणीचे दुष्परिणाम रोखा, अन्यथा...
14
"महाराष्ट्राचे पाऊल निरंतर प्रगतीच्या दिशेनेच..."; मुख्यमंत्र्यांनी दाखवलं आश्वासक राज्याचं चित्र
15
अत्यंत धोकादायक! पाकमध्ये फुग्यात गॅस भरून होतोय स्वयंपाक; हा प्रकार म्हणजे चालता-फिरता बॉम्ब
16
१० पायऱ्या चढायला ४० वर्षे लागतात, तेव्हा...; विधान परिषदेसाठी भाजपानं 'यांनाच' संधी का दिली?
17
शनिवारी, रविवारी मध्यरात्री मेगाब्लॉक; मध्य रेल्वे सेवा पूर्णत: बंद राहणार, मेल-एक्स्प्रेसना फटका
18
इराणची नाकेबंदी सुरूच, ट्रम्प यांचा 'नवा प्लॅन'; संघर्ष पुन्हा चिघळण्याची चिन्हे
19
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
20
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

काय सांगता? विमानावर मधमाशांचा हल्ला, फ्लाईट एक तास लेट!

By श्रीकृष्ण अंकुश | Updated: December 1, 2020 19:47 IST

एअरलाईनशी संबंधित प्रवक्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना रविवारी सायंकाळी आणि सोमवारी सकाळच्या सुमारास घडली. दोनही दिवस अशाच प्रकारची घटना घडली.

कोलकाता - असे कधी होऊ शकते का, की एखाद्या विमानावरच मधमाशांनी हल्ला केला? मात्र, असे झाले आहे. टीओआय ने दिलेल्या वृत्तानुसार, कोलकाता येथील विस्तारा एअरलाईनच्या दोन विमानांसोबत असे झाले. या विमानावर मधमाशा एऊन बसल्या. एवढेच नाही, तर त्यांनी खिडकीचा भाग पूर्णपणे व्यापून टाकला होता.

विमानाला एक तास उशीर -एअरलाईनशी संबंधित प्रवक्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना रविवारी सायंकाळी आणि सोमवारी सकाळच्या सुमारास घडली. दोनही दिवस अशाच प्रकारची घटना घडली. या विमानावर एवढ्या मधमाशा जमा झाल्या होत्या, की त्यांना हटवण्यासाठी बराच वेळ गेला आणि मेहनतही करावी लागली.

वॉटर जेट स्प्रेचा वापर -या विमानावर मोठ्या प्रमाणावर मधमाशा बसल्या होत्या. यांना हटविण्यासाठी अक्षरशः वॉटर जेट स्प्रेचा वापर करण्यात आला. यामुळे जे विमान सायंकाळी 5:30 वाजता निघणार होते त्याला उशीर झाला आणि ते 6:30 वाजता टेकऑफ झाले.

दुसऱ्या दिवशीही अशीच घटना -येथे दुसऱ्या दिवशीही पुन्हा अशीच घटना पाहायला मिळाली. यावेळीही विस्ताराचे ग्राउंड स्टॉफ कर्मचारी हैराण झाले. अखेर, पुन्हा वॉटर जेटच्या मदतीने या मधमाशांना काढण्यात आले. हे विमान पोर्ट ब्लेअर येथे जाणार होते. याची वेळ होती. 10:30. मात्र, हे विमानही एक तास लेट झाले आणि 11:30ला निघाले. 

काही पायलट मंडळींनी दिलेल्या माहितीनुसार, जोवर मधमाशा दूर होत नाहीत, तोवर पायलट विमान उडवू शकत नाही. यामुळे एखाद्यावेळी मोठा अपघातही होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

कसल्याही प्रकारचे पोळ नाही -कोलकाता एअरपोर्टचे डायरेक्टर कौशिक भट्टाचार्य यांनी दिलेल्या माहितीनुसार, अशा घटना सातत्याने वाढत आहेत. मधमाशांनी एखादे पोळ तर तयार केले नाही, याची पाहणी एअरपोर्ट ग्राउंड आणि टर्मिनल बिल्डिंगमध्ये केली जात आहे. मात्र, अद्याप कुठल्याही प्रकारचे पोळ आढळून आलेले नाही. या स्थलांतर करणाऱ्या मधमाशा असाव्यात अशी शक्यताही वर्तवली जात आहे. 

टॅग्स :airplaneविमानwest bengalपश्चिम बंगाल