बोर्डाच्या सदस्यांच्या नावाचे राजपत्र अखेर प्रसिद्ध

By Admin | Updated: February 13, 2015 23:11 IST2015-02-13T23:11:16+5:302015-02-13T23:11:16+5:30

The official gazette of the board's name is finally known | बोर्डाच्या सदस्यांच्या नावाचे राजपत्र अखेर प्रसिद्ध

बोर्डाच्या सदस्यांच्या नावाचे राजपत्र अखेर प्रसिद्ध

>
इच्छुकांच्या आशा पल्लवित
पुणे : कँटोन्मेंट बोर्डाच्या सदस्यांच्या नावाचे अधिकृत राजपत्र प्रसिद्ध झाले असून आगामी आठवड्यात शपथविधी होणार आहे. भाजपच्या इच्छुकांची उपाध्यक्षपदासाठी नेत्यांकडे मनधरणी सुरू झाली आहे.
पुणे कँटोन्मेंटमध्ये भाजपचे ६ सदस्य निवडून आले असल्याने याच पक्षातील सदस्यापैकी कोणाला तरी उपाध्यक्षपदाची संधी मिळणार असल्याचे निश्चित आहे. आज राजपत्र प्रसिद्ध झाल्याची माहिती या इच्छुकांत वार्‍यासारखी पसरून त्यांच्या आशा पल्लवित झाल्या.
उपाध्यक्षपदी असलेली व्यक्ती इंग्रजीची जाणकार असावी असा एक निकष याबाबत आग्रही मानला जात आहे. बोर्डावर पुर्वी भाजपचे सदस्य निवडून आले व उपाध्यक्षही झाले. त्यामुळे महिलांना संधी मिळावी अशी एका गटाची मागणी आहे. भाजपचे स्थानिक नेतृत्व त्याबाबत कोणता निर्णय घेणार याकडे लक्ष आहे.

Web Title: The official gazette of the board's name is finally known