शहरं
Join us  
Trending Stories
1
सांगलीत काँग्रेसनं केला उद्धव ठाकरेंचा गेम?; निवडणुकीनंतरचं स्नेहभोजन वादात
2
निवडणुकीत हरवले ४५ हजार कोटींचे मराठवाड्याचे पॅकेज; प्रचारातही कुणी शब्द काढला नाही
3
“इंडिया आघाडीचे सरकार आल्यास १०० दिवसांत इलेक्टोरल बॉण्डचा तपास करणार”: अरविंद केजरीवाल
4
पश्चिम बंगालमध्ये राडा! भाजपाच्या महिला कार्यकर्त्याच्या मृत्यूनं तणाव; TMC वर आरोप
5
IPL 2024: दोन वर्ष, दोन जिव्हारी लागणारे पराभव... एकाच मैदानाने दोन वेळा तोडलं Virat Kohli चं स्वप्न
6
Smriti Irani : "CM हाऊसमध्ये स्वाती मालीवाल यांच्याशी गैरवर्तन, केजरीवाल गप्प का?"; स्मृती इराणींचं टीकास्त्र
7
Rajkummar Rao : "आता तो माझ्या आयुष्याचा..."; राजकुमार राव आईच्या आठवणीत आजही करतो दर शुक्रवारी व्रत
8
"न्याय झाल्यासारखा दिसला पण पाहिजे"; मतांच्या आकडेवारीवरुन सुप्रिया सुळेंची निवडणूक आयोगाला विनंती
9
बुडालेल्या लोकांना शोधायला गेलेल्या SDRF पथकाची बोट उलटली; तीन जवानांचा मृत्यू
10
Gold Silver Price 23 May: सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण, एकाच दिवसात सोनं ₹१२८९, चांदी ₹३४७६ स्वस्त 
11
...म्हणून मला भारतीय संघाचा कोच व्हायचं नाही; Ricky Ponting नं सांगितलं कारण
12
"... तो रिपोर्ट खोटा आणि निराधार," कोळसा पुरवठा घोटाळ्याच्या आरोपावर Adani Groupचं स्पष्टीकरण
13
"पैसे देऊन गर्दी करतात", मोदींच्या विधानावर सपा नेत्याचा संताप; म्हणाले, "भाजपाचे बादशाह..."
14
Aadhar Card : १४ जूननंतर जुने आधार कार्ड खरोखरच निरुपयोगी होईल का? जाणून घ्या संपूर्ण सत्य
15
Tata Safari Review: टाटाची सफारी, चिखलात घातली, डोंगरात पळविली, १००० किमी चालवली; मायलेज, फिचर्स कशी वाटली...
16
राजकुमार रावचा 'गजगामिनी वॉक' पाहून पोट धरुन हसाल, 'हीरामंडी'च्या बिब्बोजानची केली कॉपी
17
१७ हंगाम अन् ६ संघ! Dinesh Karthik च्या IPL कारकिर्दीला पूर्णविराम
18
“काही नेत्यांची कीव येते”; पुणे पोर्शे अपघात प्रकरणी वसंत मोरेंचे रोखठोक भाष्य, दिला इशारा
19
भारत सरकारने सत्या नडेलांना ठोठावला लाखोंचा दंड! दोन महिन्यांत पैसे भरण्याचे आदेश
20
Fact Check: प्रशांत किशोर यांनी भाजपामध्ये प्रवेश केला? व्हायरल होत असलेले पत्र आहे खोटे!

भाजप नेत्याचे मॉडेलसोबत आक्षेपार्ह स्थितीतील फोटो व्हायरल, उडाली एकच खळबळ!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 08, 2021 8:02 PM

भाजपच्या युवा मोर्चाचे नेते विकास दुबे यांचा एका मॉडेलसोबतचा आक्षेपार्ह परिस्थितीतील फोटो सध्या सोशल मीडियात प्रचंड व्हायरल होत आहे.

भाजपच्या युवा मोर्चाचे नेते विकास दुबे यांचा एका मॉडेलसोबतचा आक्षेपार्ह परिस्थितीतील फोटो सध्या सोशल मीडियात प्रचंड व्हायरल होत आहे. त्यामुळे कानपूर येथे भाजपच्या गोटात मोठी अस्वस्थता पसरली आहे. विकास दुबे हे कानपूर-बुंदेलखंड विभागाचे भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष आहेत. व्हायरल झालेले फोटो दोन वर्षांपूर्वीचे असल्याचं सांगितलं आहे. विकास दुबे काठमांडू येथे पर्यटनासाठी गेलेले असताना त्यांनी एका मॉडेलसोबत आक्षेपार्ह स्थितीत फोटो काढल्याचं सांगितलं जात आहे. फोटोतील मॉडेल कॉलगर्ल असल्याचंही म्हटलं जात आहे. एका बारमध्ये हा फोटो टिपण्यात आला आहे. 

विकास दुबे यांच्यासोबत कानपूरमध्ये ड्युटी करत असलेला एक पोलीस अधिकारी आणि दुबे यांचे काही राजकीय मित्र परिवार नेपाळ येथे गेले होते. एका बारमध्ये असताना व्हिडिओ चित्रीकरण करण्यात आलं. यात विकास दुबे एका मॉडेलसोबत अश्लिल पद्धतीनं वर्तन करत असल्याचं दिसून येत आहे. फोटो व्हायरल झाल्यानं कानपूरमध्ये बरीच चर्चा रंगली आहे. याबाबत पक्षात वरीष्ठ नेत्यांकडे याबाबत तक्रार केली गेल्याचंही सांगण्यात आलं आहे. पण विकास दुबे यांच्याबाबत कुणीही साक्ष देण्यास तयार नसल्यानं त्यांच्यावर पक्षांतर्गत कारवाई अद्याप करण्यात आलेली नाही, असंही सांगण्यात येत आहे. 

भाजप युवामोर्चाचे कानपूर-बुंदेलखंड विभाग अध्यक्ष विकास दुबे, नारायण सिंग भदौरिया आणि विभाग उपाध्यक्ष संदीप ठाकूर यांच्या मैत्रीची फार चर्चा होती. पण आता तिघांमध्ये फूट पडली आहे. नुकतंच नारायण सिंग यांच्या वाढदिवसाच्या पार्टीवर पोलिसांनी धाड टाकली होती. संदीप ठाकूर यांच्या सांगण्यावरुनच ही कारवाई करण्यात आल्याचा आरोप केला गेला होता. त्यानंतर नारायण सिंग भदौरिया यांनी संदीप ठाकूर यांच्याबाबतची पोलखोल करण्यास सुरुवात केली. संदीप ठाकूर यांनी आपलं राजकीय वजन वापरुन त्यांच्यावर असलेले अनेक गुन्हे रफादफा करुन टाकल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यानंतर आता विकास दुबे यांचे अश्लिल अवस्थेतील फोटो व्हायरल होत आहेत. 

विकास दुबे यांच्याकडे १७ जिल्ह्यांचं नेतृत्वकानपूर-बुंदेलखंड विभागाअंतर्गत एकूण १७ जिल्ह्यांचा समावेश आहे. याचा भाजप प्रभारी म्हणून विकास दुबे कार्यरत आहेत. त्यांच्यावर अनेक आरोप असतानाही २०१८ साली पुन्हा एकदा दुबे यांना विभाग अध्यक्ष म्हणून नियुक्त करण्यात आलं होतं. विकास दुबे यांच्यावर अनेक गुन्ह्यांची नोंद आहे. यात खुनाचा प्रयत्न, अवैध पद्धतीनं शस्त्रास्त्र बाळगणे अशा गंभीर गुन्ह्यांचा समावेश आहे.  

टॅग्स :BJPभाजपाVikas Dubeyविकास दुबे