ओडिशा रेल्वे अपघात: भुवनेश्वरमधील एम्समध्ये आणखी ३९ मृतदेह आणले
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2023 06:02 IST2023-06-08T06:01:55+5:302023-06-08T06:02:44+5:30
सर्व अनोळखी मृतदेह शास्त्रोक्त पद्धतीने ओळखण्यासाठी एम्समध्ये जतन करण्यात आले आहेत.

ओडिशा रेल्वे अपघात: भुवनेश्वरमधील एम्समध्ये आणखी ३९ मृतदेह आणले
भुवनेश्वर : बालासोर रेल्वे दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या आणखी ३९ जणांचे मृतदेह येथील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत (एम्स) आणण्यात आले, जेणेकरून ओळख प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देता येतील.
अधिकाऱ्यांनी बुधवारी सांगितले की, बालासोर येथून आणलेले मृतदेह रविवारी शहरातील सहा रुग्णालयांत ठेवण्यात आले होते, परंतु प्रियजनांच्या शोधात ते विविध वैद्यकीय संस्थांना भेट देत असल्याने त्यांना अडचणी येत आहेत. ओडिशाचे मुख्य सचिव पी. के. जेना यांनी मंगळवारी संध्याकाळी सांगितले की, बालासोर रेल्वे अपघातातील मृतांची संख्या २८८ वर पोहोचली आहे. सर्व अनोळखी मृतदेह शास्त्रोक्त पद्धतीने ओळखण्यासाठी एम्समध्ये जतन करण्यात आले आहेत.
भरपाई लाटण्याचा प्रयत्न
रेल्वे अपघातातील मृताच्या नातेवाइकांना राज्य सरकार आणि रेल्वेने जाहीर केलेली नुकसान भरपाई मिळावी यासाठी पतीच्या मृत्यूचा खोटा दावा करणारी महिला सध्या फरारी झाली आहे.