The number of males and females of the project-wise tigers will be known | प्रकल्पनिहाय वाघांच्या नर-मादींची संख्या कळणार

प्रकल्पनिहाय वाघांच्या नर-मादींची संख्या कळणार

भावेश ब्राह्मणकर 

नवी दिल्ली : देशातील प्रत्येक व्याघ्र प्रकल्पात किती नर आणि मादी वाघ आहेत हे पहिल्यांदाच समजणार आहे. राष्ट्रीय व्याघ्र प्राधिकरणाच्यातर्फे (एनटीसीए) काही दिवसातच ते जाहीर केले जाईल. देशात ३२ व्याघ्र कॉरिडॉर असून, त्यांचा वापर वाघ कसा करतात, हेही प्रथमच स्पष्ट होणार आहे.
गेल्या वर्षी २०१८च्या व्याघ्रगणनेचे आकडे जाहीर करण्यात आले. त्यानुसार ५० व्याघ्र प्रकल्पांत २९६९ वाघ आहेत. ही संख्या जगातील वाघांच्या तुलनेत
७५ टक्के आहे. दर चार वर्षांनी व्याघ्र गणना केली जाते. गणनेचे आकडे जाहीर केल्यानंतर प्राधिकरणाकडून अहवाल प्रसिद्ध केला जातो. त्यानुसार कुठल्या प्रकल्पात किती वाघ आहेत हे स्पष्ट होते. यंदा मात्र प्रत्येक व्याघ्र प्रकल्पात किती नर व मादी वाघ आहेत हे घोषित केले जाईल. त्यांचे फोटोही सोबत दिले जातील, अशी माहिती प्राधिकरणाचे अतिरिक्त महासंचालक डॉ. अनुप कुमार नायक यांनी ‘लोकमत’ला दिली.
यंदा गणनेत अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर झाला.

संरक्षणाला चालना
च्एका व्याघ्र प्रकल्पातून दुसऱ्या प्रकल्पात जाण्यासाठी वाघ ज्या मार्गाचा वापर करतात. असे ३२ मार्ग (कॉरिडॉर) निश्चित करुन त्यांना कायदेशीर संरक्षण देण्यात आले आहे.
च्या मार्गांचा वापर कसा करतात, हेही प्राधिकरण जाहीर करणार आहे. त्यामुळे वाघांच्या स्थलांतराचा मागही समजेल. त्यामुळे या मार्गांच्या संरक्षणालाही चालना दिली जाईल.
 

Web Title: The number of males and females of the project-wise tigers will be known

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.