NSG कमांडो केरळमध्ये पोहोचणार; गृहमंत्री अमित शहांचं मुख्यमंत्र्यांशी फोनवरुन बोलणं

By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2023 12:56 PM2023-10-29T12:56:40+5:302023-10-29T13:25:56+5:30

अमित शहा यांनी केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांच्याशी फोनवरुन संवाद साधला.

NSG commandos to reach Kerala; Home Minister Amit Shah talking to Chief Minister over phone pinrai vijayan | NSG कमांडो केरळमध्ये पोहोचणार; गृहमंत्री अमित शहांचं मुख्यमंत्र्यांशी फोनवरुन बोलणं

NSG कमांडो केरळमध्ये पोहोचणार; गृहमंत्री अमित शहांचं मुख्यमंत्र्यांशी फोनवरुन बोलणं

नवी दिल्ली - देशातील केरळ राज्यात बॉम्बस्फोट झाल्याने पोलीस विभागातील यंत्रणा हादरली आहे. केरळमधील एर्नाकुलमच्या कलामासेरी येथील एका प्रार्थना सभेवेळी झालेल्या बॉम्बस्फोटात एक जण ठार तर 3० जण जखमी झाले आहेत. त्यापैकी, ७ जणांची प्रकृती गंभीर असल्याचे समजते. प्रार्थना सभेमध्ये एकामागोमाग एक असे तीन स्फोट झाले. या घटनेची माहिती मिळताच एनआयएची टीम रवाना झाली आहे. त्यानंतर, देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांच्याशी फोनवरुन संवाद साधला. तसेच, एनएसजी कमांडोही घटनास्थळी पोहचतील, असे सांगितले. 

अमित शहा यांनी केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांच्याशी फोनवरुन संवाद साधला. यावेळी, केरळमधील प्रार्थना स्थळाजवळील सभागृहात झालेल्या बॉम्बस्फोटाची माहिती घेत सद्यस्थितीचा आढावाही घेतला. तसेच, एनआआयए आणि एनएसडी कमांडोंनाही घटनास्थळी पोहोचण्याचे व तपास करण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान, हॉलच्या मध्यभागी हा स्फोट झाला. मला तीन स्फोटांचे आवाज ऐकू आले. मी मागे होतो. तेथे धुराचे लोट होते. एका महिलेचाही मृत्यू झाल्याचे मी ऐकले आहे, असे प्रत्यक्षदर्शीने माध्यमांना सांगितले आहे. याप्रकरणी, दहशतवादी हल्ल्याची शक्यता देखील पडताळून पाहिली जात आहे. 

मुख्यमंत्र्यांनी दिली माहिती

या स्फोटांवर मुख्यमंत्री पिनराई विजयन यांचीही प्रतिक्रिया आली आहे. ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे. आम्ही घटनेचा तपशील गोळा करत आहोत. एर्नाकुलममध्ये सर्व उच्चपदस्थ अधिकारी उपस्थित आहेत. डीजीपी घटनास्थळी जात आहेत. सध्या एकाचा मृत्यू झाला असून दोन जणांची प्रकृती चिंताजनक आहे. काहींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, असे विजयन म्हणाले. 

एनआयएचे पथक रवाना

एनआयएचे ४ अधिकाऱ्यांचे पथक घटनास्थळी जाण्यास कोचीहून निघाले आहे. कन्व्हेन्शन सेंटरमध्ये आयोजित तीन दिवसीय कार्यक्रमाचा आज शेवटचा दिवस होता. स्फोटाच्या वेळी १००-१५० लोक तिथे हजर होते. सकाळी ९ च्या सुमारास हे स्फोट झाल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. 

Web Title: NSG commandos to reach Kerala; Home Minister Amit Shah talking to Chief Minister over phone pinrai vijayan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.