शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
2
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
3
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
4
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
5
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
6
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
7
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
8
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
9
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
10
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
11
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
12
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
13
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
14
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
15
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका
16
लहान सीमारेषा क्रिकेटला साजेशी नाही; अश्विन : आयपीएलमध्ये सातत्याने उभारला जातोय धावडोंगर
17
छोट्या क्रिकेट मैदानांकडे दुर्लक्ष करू नका; सरफराझ खानने नवोदित क्रिकेटपटूंना दिला सल्ला
18
दीर्घ फलंदाजीचा अभाव; हार्दिक, जडेजाच्या खराब फॉर्मची चिंता
19
इंग्लंडचा संघ निवडण्यासाठी ‘एआय’चा वापर
20
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...

आता घरबसल्या स्मार्टफोनद्वारे बनवता येणार रेशन कार्ड, केवळ या कागदपत्रांची आवश्यकता

By ऑनलाइन लोकमत | Published: August 07, 2020 9:29 AM

'वन नेशन वन कार्ड' धोरणाच्या घोषणेनंतर कुठल्याही राज्यातील व्यक्ती देशातील कुठल्याही भागात जाऊन स्वस्तात रेशन घेऊ शकते. मात्र तुमच्याकडे रेशनकार्ड नसेल तर आता चिंता करण्याची गरज नाही.

नवी दिल्ली - देशात 'वन नेशन वन कार्ड' धोरण लागू झाल्यानंतर आता रेशन कार्ड असणे हे अत्यंत आवश्यक बनले आहे. रेशन कार्डचा उपयोग केवळ स्वस्तातील धान्य घेण्यासाठीच नव्हे तर ओखळपत्र म्हणूनसुद्धा होतो. 'वन नेशन वन कार्ड' धोरणाच्या घोषणेनंतर कुठल्याही राज्यातील व्यक्ती देशातील कुठल्याही भागात जाऊन स्वस्तात रेशन घेऊ शकते. मात्र तुमच्याकडे रेशनकार्ड नसेल तर आता चिंता करण्याची गरज नाही. आता तुम्ही घरबसल्या आपल्या स्मार्टफोनच्या मदतीने ऑनलाइन रेशनकार्डसाठी अप्लाय करून रेशनकार्ड बनवू शकता. यासाठी सर्व राज्यांनी आपापली संकेतस्थळे बनवली आहेत. तुम्ही ज्या राज्यातील रहिवासी आहात त्या राज्याच्या संकेतस्थळावर जाऊन तुम्ही रेशनकार्डसाठी अर्ज करू शकता.रेशन कार्डसाठीच्या पात्रतेच्या अटी पुढीलप्रमाणे आहेत- रेशनकार्ड बनवणारी व्यक्ती भारताची नागरिक असावी- त्या व्यक्तीकडे कुठल्याही अन्य राज्याचे रेशन कार्ड असता कामा नये- ज्याच्या नावे रेशनकार्ड बनवायचे आहे त्याचे वय १८ वर्षांपेक्षा अधिक असावे- १८ वर्षांखालील मुलांचे नाव हे आई-वडिलांच्या रेशनकार्डमध्ये समाविष्ट करावे-एका कुटुंबात कुटुंबप्रमुखाच्या नावे रेशनकार्ड असते- रेशनकार्डमध्ये नाव समाविष्ट असलेल्या व्यक्तीचा कुटुंबप्रमुखाशी जवळचा संबंध असावा- कुटुंबातील व्यक्तीच्या नावाचा त्यापूर्वी अन्य कुठल्याही रेशनकार्डमध्ये समावेश नसावाअसा करा अर्ज-रेशन कार्ड बनवण्यासाठी सर्वप्रथम आपल्या राज्याच्या संकेतस्थळावर जा- त्यानंतर Apply online for ration Card या लिंकवर क्लीक करा- रेशन कार्ड बनवण्यासाठी ओळखपत्र म्हणून आधार कार्ड, मतदार ओळखपत्र, पासपोर्ट, हेल्थ कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स यांचा वापर करता येऊ शकेल- रेशनकार्डसाठी अर्ज करण्याचे शुल्क हे ५ रुपयांपासून ते ४५ रुपयांपर्यंत आहे- अर्ज केल्यानंतर शुल्क भरा आणि अर्ज सबमिट करा- त्यानंतर फिल्ड व्हेरिफिकेशन झाल्यानंतर तुमचा अर्ज योग्य असेल तर तुमचे रेशनकार्ड तयार होईही कागदपत्रे असणे आवश्यकरेशनकार्ड बनवण्यासाठी ओळखपत्र म्हणून आधारकार्ड, मतदार ओळखपत्र, पासपोर्ट, हेल्थ कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, पासपोर्ट, सरकारने जारी केलेले कुठलेही ओळखपत्र तसेच पॅनकार्ड, पासपोर्ट साईझ फोटो, उत्पन्नाचा दाखला, पत्त्याचा पुरावा म्हणून, वीजबिल, टेलिफोन बिल, बँक स्टेटमेंट पासबूक या कागदपत्रांचा वापर करता येऊ शकतो.

इतर महत्त्वाच्या बातम्या

वुहानमधील ९० टक्के कोरोनामुक्त रुग्णांची फुप्फुसे झाली खराब, अभ्यासातून समोर आली धक्कादायक माहिती

रक्षाबंधनाच्या मुहुर्तावर स्वस्तात सोने खरेदीची संधी, मोदी सरकारच्या या योजनेमुळे होणार सर्वसामान्यांची चांदी

टाइम कॅप्सुल म्हणजे नेमकं काय? जमिनीत पुरून ठेवण्यामागे असतो हा उद्देश

पंधरा गोळ्या झेलूनही हा वीर जवान लढला, अन् टायगर हिलवर तिरंगा फडकला 

अमेरिकेला मिळाली कोरोनावरील लस, खरेदी केले १० कोटी डोस

घरी राहिल्यानेही कमी होत नाही कोरोनाच्या संसर्गाचा धोका, संशोधकांचा धक्कादायक खुलासा

कोरोनाविरोधात लस विकसित करण्याच्या ऑक्सफर्डच्या मोहिमेचं या महिलेनं केलं नेतृत्व, अवघ्या काही महिन्यांत असं मिळवलं यश

कोरोनावरील लस विकसित करण्याच्या शर्यतीत आहेत 'या' सात भारतीय कंपन्या, काहींनी घेतलीय संशोधनात आघाडी

coronavirus: धक्कादायक! कोरोनाच्या रिपोर्टमध्ये केले गोलमाल, डॉक्टर झाला मालामाल

टॅग्स :IndiaभारतGovernmentसरकार