शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
2
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
3
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
4
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
5
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
6
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
7
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
8
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
9
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
10
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
11
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
12
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
13
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
14
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
15
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
16
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
17
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
18
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
19
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
20
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
Daily Top 2Weekly Top 5

सरकारच्या अजेंडय़ावर आता व्याजदर कपात

By admin | Updated: July 29, 2014 23:29 IST

सातत्याने झालेल्या व्याजदरवाढीचा फटका विकासाला बसल्याचे दिसून आल्यानंतर, आता थेट सरकारने या मुद्यात लक्ष घालण्याचे संकेत दिले आहेत.

नवी दिल्ली : जागतिक आर्थिक मंदी आणि देशांतर्गत महागाई या दोहोंवर मात करण्यासाठी वापरण्यात आलेल्या व्याजदरवाढीच्या अस्त्रमुळे भारतीय अर्थव्यवस्था तरली असली तरी आता सातत्याने झालेल्या व्याजदरवाढीचा फटका विकासाला बसल्याचे दिसून आल्यानंतर, आता थेट सरकारने या मुद्यात लक्ष घालण्याचे संकेत दिले आहेत. 
व्याज दरवाढीचा मुद्दा हा पूर्णपणो भारतीय रिझव्र्ह बँकेच्या अखत्यारीतील असला तरी, आणि त्यावर सरकारचे कोणतेही नियंत्रण नसले तरी या मुद्यावर ऊहापोह करण्यासाठी केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली येत्या 31 जुलै रोजी देशातील सर्व सरकारी बँकांच्या मुख्याधिका:यांसोबत एक बैठक घेणार आहेत. उपलब्ध माहितीनुसार, या बैठकीत प्रामुख्याने व्याजदर कपात किंवा अधिकाधिक कर्ज वितरणासाठी ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी बँकांच्या पातळीवर काय नियोजन शक्य आहे, याचा तसेच व्याजदराचे स्वरूप व रचना कशी असावी, नियमित टप्प्यांत त्यात काय व कसा बदल करता येईल, यावर बँकिंग क्षेत्रतल्या तज्ज्ञांची मते वित्तमंत्री जाणून घेणार आहेत. 
नवे सरकार विराजमान झाल्यानंतर प्रथमच वित्तमंत्री थेट सरकारी बँकांच्या मुख्याधिका:यांशी संवाद साधणार आहेत. त्यामुळे व्याजदरासोबतच, बँकांची थकीत कज्रे, कृषी क्षेत्रला होणारा वित्तपुरवठा, तसेच वित्तीय समायोजनाचे धोरण यावरही व्यापक चर्चा अपेक्षित आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)
 
4वित्तीय समायोजनाचे धोरण सुरू राहणार असल्याचे मोदी सरकारनेही स्पष्ट केले आहे. मात्र, हे धोरण राबविताना नव्या सरकारची त्यातील भूमिका किंवा दिशा कशी असेल, याची माहिती वित्तमंत्री या बैठकीत स्पष्ट करणार असल्याचे समजते. 
 
4संपुआ सरकारने वित्तीय समायोजनाच्या धोरणांतर्गत देशाच्या कानाकोप:यात वित्तीय सेवा पोहोचविण्याच्या दृष्टीने पावले उचलली होती.