शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
2
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
3
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
4
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
5
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
6
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
7
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
8
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
9
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
10
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
11
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
12
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
13
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
14
Latest Marathi News LIVE Updates: देशातील महिला बघताहेत, त्यांच्या रस्त्यातील अडथळा कोण आहेत? अमित शाहांचा घणाघात
15
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
16
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
17
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
18
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
19
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
20
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
Daily Top 2Weekly Top 5

आता बीआयएफआर गाशा गुंडाळणार !

By admin | Updated: April 13, 2015 05:53 IST

नियोजन आयोगाचा गाशा गुंडाळल्यानंतर मोदी सरकारने आता औद्योगिक व वित्तीय पुनर्रचना मंडळही (बीआयएफआर) गुपचूप मोडीत काढायला घेतले आहे.

हरीश गुप्ता, नवी दिल्लीनियोजन आयोगाचा गाशा गुंडाळल्यानंतर मोदी सरकारने आता औद्योगिक व वित्तीय पुनर्रचना मंडळही (बीआयएफआर) गुपचूप मोडीत काढायला घेतले आहे. मंडळाचे अध्यक्ष भवानी सिंग मीना यांनी अचानक राजीनामा दिल्याने वित्तीय अडचणींमुळे आजारी पडलेल्या उद्योगांचे पुनरुज्जीवन करण्यासाठी ४० वर्षांपूर्वी स्थापन केली गेलेली ही संस्था बंद पडल्यात जमा आहे.मीना हे भारतीय प्रशासकीय सेवेतील (आयएएस) महाराष्ट्र तुकडीचे ज्येष्ठ अधिकारी असून, ‘बीआयएफआर’वर येण्यापूर्वी ते पोलाद खात्याचे सचिव होते. त्यांची ही नेमणूक आधीच्या संपुआ सरकारने केली होती. मुदत संपण्याच्या बऱ्याच आधी गेल्या महिन्यात त्यांनी अचानक अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. मंडळावर आता जे. पी. दुआ व एस. सी. सिन्हा हे दोन सदस्य आहेत. मीना यांच्याप्रमाणे त्यांनीही राजीनामा न देणे, हे या सर्व घडामोडींमागची उत्कंठा वाढविणारे आहे. विश्वसनीय सूत्रांनुसार असे समजते की, दुआ व सिन्हा यांनी स्वत:हून राजीनामा देण्यास नकार दिला असून, सरकारला हवे तर आम्हाला पदावरून दूर करावे, असे त्यांनी वित्तमंत्री अरुण जेटली यांच्या कार्यालयास कळविले आहे. यामुळे आता सरकारला असे निर्देश देणे भाग पडले आहे की, ‘बीआयएफआर’ने यापुढे कोणत्याही आजारी उद्योगाचे नवे प्रकरण दाखल करून घेऊ नये. तसेच प्रलंबित असलेले काम लवकरात लवकर संपवावे अथवा वित्त मंत्रालयाकडे पाठवून द्यावे. मंडळावर नवा अध्यक्ष नेमण्याचाही सरकारचा इरादा नाही.सूत्रांनुसार ‘बीआयएफआर’चा गाशा गुंडाळण्याचे सरकारने ठरविले आहे. ‘बीआयएफआर’ने आजारी ठरविलेल्या उद्योगांची संख्या ७००च्या घरात आहे व त्यांच्याकडील बँकांची कर्जे व सरकारी देणी ३ लाख कोटी रुपयांच्या आसपास आहेत. आजारपणाचे लेबल लागले की या कर्ज आणि सरकारी देण्यांमध्ये सवलत मिळते व परतफेडीचे नवे वेळापत्रक ठरविले जाते.पर्यायी व्यवस्थेअभावी पोकळीअशा प्रकारे ‘बीआयएफआर’चे कामकाज अचानक बंद होण्याने पोकळी निर्माण होणार आहे. सरकार ‘बीआयएफआर’ गुंडाळायला निघाले आहे, पण त्याची जागा घेणारे न्यायाधिकरण अद्याप कागदावरच आहे.