सोनिया गांधी, राहुल यांना नोटिसा

By Admin | Updated: August 28, 2016 00:15 IST2016-08-28T00:15:01+5:302016-08-28T00:15:01+5:30

नॅशनल हेरॉल्ड खरेदी प्रकरणात भाजपाचे खा. सुब्रमण्यम स्वामी यांनी नव्याने केलेल्या अपिलात काँग्रेस पक्ष आणि असोसिएट प्रेस यांचे काही दस्तावेज मागितले असून, त्यासंदर्भात दिल्ली

Notices to Sonia Gandhi, Rahul | सोनिया गांधी, राहुल यांना नोटिसा

सोनिया गांधी, राहुल यांना नोटिसा

नवी दिल्ली : नॅशनल हेरॉल्ड खरेदी प्रकरणात भाजपाचे खा. सुब्रमण्यम स्वामी यांनी नव्याने केलेल्या अपिलात काँग्रेस पक्ष आणि असोसिएट प्रेस यांचे काही दस्तावेज मागितले असून, त्यासंदर्भात दिल्लीच्या महानगर दंडाधिकाऱ्यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्यासह सहा जणांना त्यांचे म्हणणे सादर करण्यासाठी नोटिसा काढल्या आहेत. मोतीलाल व्होरा, आॅस्कर फर्नांडिस, सुमन दुबे, सॅम पित्रोदा यांचा त्यात समावेश आहे. या सहाही जणांनी दोन आठवड्यात आपले म्हणणे सादर करायचे असून, स्वामी यांच्या अर्जावरील पुढील सुनावणी ४ आॅक्टोबर रोजी होणार आहे.

Web Title: Notices to Sonia Gandhi, Rahul