शहरं
Join us  
Trending Stories
1
“निवडणूक आयोग हा भाजपाची विस्तारित शाखा, फडणवीसांना वकील कुणी केले?”; संजय राऊतांची टीका
2
महाराष्ट्रात एकनाथ शिंदेंसोबत जे झालं, तसंच नितीश कुमारांसोबत होईल? बिहारमध्ये चर्चांना उधाण, पण...
3
विराट कोहलीने ८० कोटीच्या बंगल्याची भावाला दिली 'पॉवर ऑफ अटॉर्नी'? काय आहे हा दस्तऐवज?
4
VIRAL : बाब्बो! ९३व्या वर्षी बाबा झाला हा व्यक्ती; बायको ५६ वर्षांनी लहान! लगेच दुसऱ्या बाळाचाही विचार केला सुरू
5
IND vs AUS : "ज्यावेळी तुम्ही हार मानता..." किंग कोहलीची पोस्ट चर्चेत; जाणून घ्या सविस्तर
6
थकलेले चेहरे, कंटाळवाणा मूड.. विराट-रोहितसह सारेच हैराण! ऑस्ट्रेलियात पोहचण्याआधी काय घडलं?
7
एकनाथ शिंदेंच्या गडाला भाजपा सुरूंग लावणार?; ठाण्यात स्वबळावर लढण्याची तयारी, इच्छुकांची शाळा
8
जगातील नकाशात कुठे आहे रहस्यमय 'टोरेंजा' देश?; महिलेचा पासपोर्ट पाहून खळबळ, व्हिडिओ व्हायरल
9
TVS ने लॉन्च केली पहिली दमदार अ‍ॅडव्हेंचर टूरिंग बाईक; जाणून घ्या फीचर्स अन् किंमत...
10
पहिल्याच दिवशी ६०० रुपयांच्या पार पोहोचला 'हा' शेअर; २७% प्रीमिअमसह बंपर लिस्टिंग, तुमच्याकडे आहे?
11
आम्ही आधी आमच्या देशाचा विचार करू; डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'त्या' दाव्यावर भारताची स्पष्टोक्ती
12
बर्फामुळे रस्त्यावर भयानक थरार! एका क्षणात १३० हून अधिक गाड्यांचा चक्काचूर; ‘हा’ व्हिडीओ तुम्ही पाहिला का?
13
डोनाल्ड ट्रम्प ज्या देशावर चिडतात, त्यालाच भारत देणार 'आकाश' मिसाइल; अमेरिकेला दिला झटका
14
कर्जदाराचा मृत्यू झाल्यास बँक कर्जाची वसुली कशी करते? गृह, कार आणि पर्सनल लोनचे नियम काय सांगतात?
15
ऑस्ट्रेलियाला जाण्यापूर्वी विराट कोहलीने या व्यक्तीच्या नावावर केली मालमत्ता, किती कोटींची संपत्ती?
16
कर्तव्यनिष्ठेला सलाम! पोलिओ लसीकरणासाठी 'आशा वर्कर'ची २८ किमीची पायपीट, मुलांसाठी धडपड
17
जीएसटी 2.0: घरगुती फराळावर जीएसटी कपातीचा किती फायदा झाला? पहाल तर शॉक व्हाल....
18
'या' ५ घटनांचा उल्लेख करत राहुल गांधींनी निशाणा साधला; म्हणाले, “मोदी हे ट्रम्प यांना घाबरतात”
19
PM मोदींच्या वाढदिवसाला सुरु केलेल्या १० योजना बंद? अंबादास दानवे आक्रमक; शिंदेंना करुन दिली 'बाळासाहेबां'ची आठवण
20
कतारने पुन्हा एकदा दाखवली आपली ताकद! एका फोनवर थांबवलं पाक-अफगाणिस्तानचं युद्ध 

‘एनडीएमध्ये सर्व काही आलबेल नाही, जागावाटप सूत्रावर नाराजी’

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2025 08:08 IST

रालोमोचे प्रमुख उपेंद्र कुशवाह नाराज, अमित शाह यांनी त्यांना चर्चेसाठी दिल्लीला बोलावले

- एस. पी. सिन्हालोकमत न्यूज नेटवर्कपाटणा : बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीएच्या जागावाटप सूत्रावर नाराजी व्यक्त करत राष्ट्रीय लोक मोर्चा (रालोमो) प्रमुख उपेंद्र कुशवाह यांनी म्हटले आहे की, एनडीएमध्ये काहीही आलबेल नाही. दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी त्यांना चर्चेसाठी दिल्लीला बोलावले आहे.एनडीएमधील पक्षाच्या भविष्यातील भूमिकेवर चर्चा करण्यासाठी रालोमो प्रमुखांनी बुधवारी दुपारी पाटणा येथील पक्ष कार्यालयात आपत्कालीन बैठकीची घोषणा केली होती. ही बैठक अचानक पुढे ढकलण्यात आली.

कुशवाह यांनी एक्सवर लिहिले की, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांच्याशी चर्चा करण्यासाठी दिल्लीला जावे लागत आहे. त्यामुळे, आज पाटणा येथील कॅम्प ऑफिसमध्ये पक्षाच्या सहकाऱ्यांसोबत होणारी बैठक तात्काळ पुढे ढकलण्यात आली आहे.रालोमोने एनडीएकडे २४ जागा मागितल्या होत्या आणि त्यांना किमान दुहेरी आकडी जागा जिंकण्याची आशा होती. कुशवाह यांनी सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट लिहिली. त्यांनी म्हटले आहे की, घोषित जागांची संख्या अपेक्षांची पूर्तता करीत नाही, परंतु कार्यकर्त्यांनी धीर धरावा. या पोस्टमुळे असंतोषाची चर्चा सुरू झाली. कुशवाह यांना अतिरिक्त जागा किंवा राजकीय पद दिले जाण्याची शक्यता आहे. 

मी लढणार नाही, प्रशांत किशोर यांची घोषणाजन सुराज पक्षाचे संस्थापक प्रशांत किशोर यांनी बुधवारी एक मोठी राजकीय घोषणा केली, ज्यात त्यांनी आगामी बिहार विधानसभा निवडणूक न लढवण्याचा निर्णय जाहीर केला. पक्षाच्या हितासाठी आणि संघटना मजबूत करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.त्यांनी असेही म्हटले की, जर जनसुराज पक्ष १५० पेक्षा कमी जागा जिंकला तर तो पराभव मानला जाईल. आमचा पक्ष बिहार निवडणुकीत जिंकला तर त्याचे राष्ट्रीय राजकारणावर दूरगामी परिणाम होतील. त्यांच्या या निर्णयावर भाजप व राजदने टीका केली आहे. स्थिती आपल्या बाजूने नाही, हे कळाल्यानेच  हा निर्णय घेतल्याचे भाजपने म्हटले आहे. 

जद(यु)कडून ५७ उमेदवारांना तिकिटेपाटणा : जनता दल (युनायटेड) ने बुधवारी बिहार विधानसभा निवडणुकीसाठी ५७ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. यामध्ये अनुभव आणि सामाजिक यांचे संतुलन राखत अनेक विद्यमान मंत्री, वरिष्ठ नेते आणि प्रमुख व्यक्तींवर विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. या यादीत विजय कुमार चौधरी, श्रवण कुमार, मदन साहनी, रत्नेश सदा आणि महेश्वर हजारी यांचा समावेश आहे. पक्षाने या सर्व विद्यमान मंत्र्यांवर विश्वास कायम ठेवला आहे. यात प्रमुख माजी मंत्री श्याम रजक आणि बलाढ्य नेते अनंत कुमार सिंह आहेत. 

English
हिंदी सारांश
Web Title : NDA Discord: Seat Allocation Discontent, Kushwaha Summoned to Delhi for Talks

Web Summary : NDA faces seat-sharing issues in Bihar; RLSP chief Kushwaha expresses discontent. Amit Shah summons him to Delhi for discussions. Prashant Kishor won't contest. JDU announced 57 candidates.
टॅग्स :Bihar Assembly Election 2025बिहार विधानसभा निवडणूक २०२५BJPभाजपाAmit Shahअमित शाह