"प्रत्येक व्यक्ती 'शंकराचार्य' होऊ शकत नाही, सपाला पूजा करायची असेल तर करावी..."; काय म्हणाले मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2026 20:51 IST2026-02-13T20:51:02+5:302026-02-13T20:51:40+5:30

"नैतिकतेसंदर्भात बोलणाऱ्यांनी प्रथम स्वतःच्या वर्तनाचा विचार करायला हवा," असेही योगी आदित्यनाथ यावेळी म्हणाले.

Not everyone can be a Shankaracharya if SP wants to worship him, then he should What did Chief Minister Yogi Adityanath say | "प्रत्येक व्यक्ती 'शंकराचार्य' होऊ शकत नाही, सपाला पूजा करायची असेल तर करावी..."; काय म्हणाले मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ?

"प्रत्येक व्यक्ती 'शंकराचार्य' होऊ शकत नाही, सपाला पूजा करायची असेल तर करावी..."; काय म्हणाले मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ?

प्रत्येक व्यक्ती शंकराचार्य होऊ शकत नाही आणि कुणालाही पीठाचे आचार्य म्हणून वातावरण खराब करण्याचा अधिकार नाही. "मर्यादांचे पालन सर्वांनाच करावे लागेल," असे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी म्हटले आहे. तसेच, "जर ते शंकराचार्य असतील तर वाराणसीमध्ये लाठीचार्ज का झाल आणि एफआयआर का दाखल करण्यात आला? असा प्रश्नही योगी आदित्यनाथ यांनी केला. एवढेच नाही तर, "नैतिकतेसंदर्भात बोलणाऱ्यांनी प्रथम स्वतःच्या वर्तनाचा विचार करायला हवा," असेही योगी आदित्यनाथ यावेळी म्हणाले.

एक मर्यादित व्यक्ती कधीही असे आचरण करू शकत -
योगी म्हणाले, "साडेचार कोटी भाविक उपस्थित असलेल्या ठिकाणी सुरक्षा सर्वोपरी. भाविक ज्या मार्गाने बाहेर पडत आहेत, त्याच मार्गाने आत जाण्याचा प्रयत्न केल्यास चेंगराचेंगरी होऊ शकते. एक जबाबदार आणि मर्यादित व्यक्ती कधीही अशा प्रकारचे आचरण करू शकत नाही, असे सांगत त्यांनी प्रशासकीय नियमांचे समर्थन केले."

सपाला पूजा करायची असेल तर करावी -
योगी आदित्यनाथ म्हणाले, "जर समाजवादी पक्षाच्या (सपा) सदस्यांना एखाद्याची पूजा करायची असेल तर त्यांनी ती करावी, परंतु सरकार मर्यादित लोकांचे आहे आणि कायद्याच्या राज्यावर विश्वास आहे. सुव्यवस्था राखणे आणि भाविकांची सुरक्षा ही सरकारची प्राथमिकता आहे." दरम्यान, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या विधानांवर प्रतिक्रिया देताना समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव तीव्र हल्ला चढवला. ते म्हणाले, "मुख्यमंत्री 'बनावट योगी' आहेत. उत्तर प्रदेशचे सध्याचे मुख्यमंत्री सर्वाधिक जातीयवादी आणि अलोकतांत्रिक आणि असंस्कृत आहेत," 

नेमका वाद काय? -
मौनी अमावस्येच्या दिवशी, शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद, त्यांच्या सुमारे २०० समर्थकांसह, प्रयागराज येथील संगमात स्नान करण्यासाठी रथ आणि पालखीवरून जात होते. त्यानी बॅरियर तोडून रथ पुढे नेल्यामुळे तीन तास गोंधळ उडाला होता. प्रशासनाने रोखल्याचा आरोप शंकराचार्यांनी केला, तर सुरक्षिततेसाठी ही कारवाई आवश्यक असल्याचे सरकारने स्पष्ट केले होते.
 

Web Title : हर कोई शंकराचार्य नहीं बन सकता: यूपी सीएम योगी आदित्यनाथ

Web Summary : योगी आदित्यनाथ ने कहा कि हर कोई शंकराचार्य नहीं बन सकता, वाराणसी की घटना के दौरान की गई कार्रवाइयों की आलोचना की। उन्होंने भीड़भाड़ वाले आयोजनों में सुरक्षा को प्राथमिकता देते हुए प्रशासनिक नियमों का बचाव किया। उन्होंने समाजवादी पार्टी की प्रथाओं पर भी टिप्पणी की, कानून और व्यवस्था पर जोर दिया।

Web Title : Not everyone can be Shankaracharya: UP CM Yogi Adityanath.

Web Summary : Yogi Adityanath stated that not everyone can be Shankaracharya, criticizing actions during a Varanasi incident. He defended administrative rules, prioritizing safety at crowded events. He also commented on Samajwadi Party's practices, emphasizing law and order.