शहरं
Join us  
Trending Stories
1
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदान पाहून नेत्यांचं वाढलं टेन्शन; सभांना होते गर्दी, मात्र मत देताना लोकांचा हात आखडता
2
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
3
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
4
सांगलीच्या ‘करेक्ट’ कार्यक्रमामुळे राष्ट्रवादी काॅंग्रेसची घसरगुंडी !
5
प्रचाराच्या रणधुमाळीदरम्यान मुंबईतील भांडुपमधून तीन कोटींची रोकड जप्त, तपास सुरू
6
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
7
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
8
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
9
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा
10
ऐन निवडणुकीत बाजारातील पैसा गायब; अंगडियाचे दर भडकले !
11
ईश्वराप्पा यांच्या बंडाने शिवमोग्गात लढत रंगतदार; पक्षातून सहा वर्षासाठी हकालपट्टी
12
पूनम महाजन यांना डावलून निकमांना संधी; मुंबई उत्तर-मध्य मतदारसंघात चुरस वाढली
13
लढाई हट्टाची आणि अस्तित्वाची, नेत्यांची कसोटी; 'एकास एक' लढतीचे प्रयत्न फसले
14
काँग्रेसची सत्ता आली तर ओबींसीचे आरक्षण धर्माच्या नावावर वाटणार : पंतप्रधान मोदी
15
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
16
या झोपडीत राहतो लोकसभेचा उमेदवार, रावेरमधून लढणार; लोकांनी वर्गणी काढून भरले डिपॉझिट
17
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
18
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
19
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
20
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया

वरुण गांधी धरणार का काँग्रेसचा 'हात'? राहुल गांधी म्हणतात...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2019 3:50 PM

वरुण गांधी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा

ओदिशा: देशाच्या राजकारणातलं सर्वात मोठं कुटुंब असलेल्या गांधी घराण्यातील प्रियंका गांधींनी दोन दिवसांपूर्वी अधिकृतपणे राजकारणात प्रवेश केला. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रियंका गांधी-वाड्रा यांच्याकडे पक्षानं उत्तर प्रदेशच्या पूर्व भागाची जबाबदारी सोपवली. याशिवाय पक्षाच्या महासचिवपदीदेखील त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रियंका यांच्या राजकारणातील प्रवेशानंतर आता त्यांचे चुलत भाऊ वरुण गांधी भाजपा सोडून काँग्रेसचा हात धरणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. ओडिशा दौऱ्यात राहुल यांनी याबद्दलचा प्रश्नदेखील विचारण्यात आला. भाजपामध्ये नाराज असलेले वरुण गांधी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची सध्या राजकीय वर्तुळात आहे. त्याबद्दल ओदिशा दौऱ्यावर असलेल्या राहुल गांधींची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न पत्रकारांनी केला. त्यावर मी अशा चर्चा ऐकलेल्या नाहीत, असं उत्तर राहुल यांनी दिलं. राहुल यांनी काँग्रेसच्या अध्यक्षपदाची जबाबजारी स्वीकारल्यानंतरही वरुण गांधी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा जोरात होत्या. यानंतर आता प्रियंका गांधी राजकारणात सक्रीय झाल्यानंतर पुन्हा हीच चर्चा सुरू झाली आहे. गेल्या काही महिन्यांपासून वरुण गांधी पक्षाच्या नेतृत्त्वावर प्रचंड नाराज आहेत. त्यांनी सरकारच्या अनेक निर्णयांवर टीकादेखील केली आहे. याशिवाय रोहिंग्या मुस्लिमांच्या मुद्द्यावरुनही त्यांनी पक्षाच्या विरोधात भूमिका घेतली होती. 1980 मध्ये वरुण गांधी यांचे वडील संजय गांधी यांचा अपघाती मृत्यू झाला. त्यानंतर वरुण गांधी यांच्या आई मेनका गांधी यांनी काँग्रेसपासून दूर राहण्यास सुरुवात केली. 1988 मध्ये त्या जनता दलात गेल्या. त्यानंतर 2004 मध्ये त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. वरुण गांधीदेखील 2004 मध्ये भाजपामध्ये आले. 2009 मध्ये ते पिलीभीत लोकसभा मतदारसंघातून विजयी झाले. तर 2014 मध्ये ते उत्तर प्रदेशच्या सुलतानपूरमधून लोकसभेत गेले. वरुण गांधी त्यांच्या आक्रमक भाषणांसाठी ओळखले जातात.  

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसPriyanka Gandhiप्रियांका गांधीVarun Gandhiवरूण गांधी